डेली मन्ना
त्याच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार कसे व्हावे-२
Monday, 10th of April 2023
46
25
1244
Categories :
खरा साक्षीदार
आपण आपल्या शृंखले मध्ये पुढे जात आहोत की 'आपल्या प्रभु येशूच्या पुनरूत्थानाचे प्रभावी साक्षीदार कसे व्हावे".
त्याच्या पुनरुत्थानाचे प्रभावी साक्षीदार होण्याचा दुसरा मार्ग हा एक बदललेले जीवन आहे. तुम्ही पाहता आज येथे अनेक फसवे बोलणारे आहेत. परमेश्वर तुमच्या बोलण्यापेक्षा तुमच्या जीवन जगण्यात अधिक रुची ठेवतो. जगाचे लोक सुद्धा चार शुभवर्तमान-मत्तय, मार्क, लूक व योहान, वाचण्याअगोदर तुमचे शुभवर्तमान वाचतील. असे म्हणण्याचा माझ्या अर्थ काय आहे? याचा सरळपणे अर्थ हा आहे की तुम्ही जे म्हणत आहात ते विकत घेण्याअगोदर लोकांना प्रथम तुमच्यामध्ये बदल हा पाहावयास पाहिजे.
कदाचित तुम्हांमध्ये मद्या साठी अशक्तपणा आहे; सिगारेट ओढण्यासाठी अशक्तपणा आहे. त्यागोष्टी फेकून दया व त्यांच्याकडे परत जाऊ नका. ह्या सवयी पासून दूर राहण्यासाठी परमेश्वराला सामर्थ्य मागा. तुमच्या सभोवतालचे लोक तुमच्याकडे पाहतील व म्हणतील, "ह्या व्यक्तीला काय झाले. प्रत्येक सकाळी तो डुलत असे परंतु तो आता पवित्र आत्म्या द्वारे इतरांना हलवीत आहे. त्याच्याकडे काय आहे ते मला पाहिजे." हालेलुया!
जे सर्व जण हे वाचत आहेत त्या सर्वांना मला हे सांगावयास वाटते की, "सामान्य जीवन जगू नका, ख्रिस्त येशू मध्ये जे श्रेष्ठ जीवन उपलब्ध आहे ते जगण्याकडे जा. तुम्ही योसेफा प्रमाणे एस्तेर प्रमाणे श्रेष्ठ पदावर जाल व हजारो लोकांसाठी आशीर्वाद व्हाल. आपल्या सध्याच्या काळात एक बदललेले जीवन हे त्याच्या पुनरूत्थानाचे सामर्थ्य आपल्यामध्ये कार्यरत आहे याचा महान पुरावा आहे.
चर्च मधील लोक सुद्धा, जेव्हा ते कोणाद्वारे तरी दुखावले जातात, ते ताबडतोब चर्च बदलतात कारण ते विचार करतात की ते ज्या सध्याच्या चर्च मध्ये आहेत त्यापेक्षा ते अधिक उत्तम असेल. सत्य हे आहे, की सर्वत्र मनुष्य हा मनुष्यच आहे आणि परमेश्वर हा सर्वत्र परमेश्वरच आहे. म्हणून २०२० मध्ये, ते एका चर्च मध्ये आहेत, २०२२ मध्ये ते इतर कोणत्यातरी चर्च मध्ये आहेत आणि २०३० मध्ये ते जेथे पूर्वी होते त्या चर्च मध्ये पुन्हा येतात. तुम्हाला त्यांच्यासारखे होण्याची गरज नाही. इतरांच्या चुकांपासून- म्हणजे ज्ञाना पासून शिका. जेव्हा लोक तुम्हाला दुखवितात, त्यांना क्षमा करा. केवळ त्यांना प्रभूकडे मोकळे करा हे म्हणत, "येशू मुळे मी तुला क्षमा करतो." क्षमा करा व पुढे जा. तुमच्या बोलाविण्याच्या प्रकटीकरणास उशीर करू नका.
सध्याच्या दिवसात फारच विरळ आहे की कोणाला क्षमा करावयास वाटत असते. ते बदला घेण्यास पाहतात. 'तूं हे मला केले, आता मी तुला माझी दुसरी बाजू दाखवेन. बदला घेणे ही इच्छा ठेवणे आहे की जेव्हा कोणी तुमचे वाईट करतो. "डोळ्या साठी डोळा, दाता साठी दात, आणि हेच तर कारण आहे की येथे अनेक लोक आहेत जे वाचा विना धावत आहेत." बदला हा तुम्हाला त्यांच्यासारख्या समान स्तरावर ठेवतो. सार्वत्रिक अभ्यासाने हे दाखविले आहे की बदला घेणे हा तणाव वाढवतो व आरोग्य व प्रतिकार शक्तीमध्ये बिघाड आणतो. कोणीतरी सामर्थ्यपूर्ण म्हटले आहे, "बदला घेण्याच्या प्रवासा मध्ये तुम्ही वाटचाल सुरु करण्याअगोदर, दोन कबरा खणा." बदला देवा कडे सोपवा.
"प्रियजनहो, बदला घेण्यास अत्यंत उतावळे होऊ नका, परंतु त्यास देवाच्या नीतिमान न्यायाकडे –म्हणजे ज्ञाना कडे सोपवा. कारण पवित्र शास्त्र सांगते की, "बदला घेणे माझ्याकडे आहे, व मी बदला घेईन," असे परमेश्वर म्हणतो. (रोमन १२:१९ टीपीटी) क्षमा हा दुसरा मार्ग आहे की त्याच्या पुनरूत्थानाचे प्रभावी साक्षीदार व्हावे.
प्रार्थना
धन्यवादित पवित्र आत्म्या, कृपा करून माझ्या जीवनात खोलवर कार्य कर. येशूच्या नांवात मी बदलास स्वीकारतो.
पित्या, तुझा पुत्र येशूच्या बलिदानाद्वारे माझ्या जीवनात क्षमेचे सामर्थ्य हे मोकळे केल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. ज्या सर्वांनी मला दुखविले आहे त्यासर्वांना क्षमा करण्याचे मी निवडतो. येशूच्या नांवात. आमेन.
पित्या, तुझा पुत्र येशूच्या बलिदानाद्वारे माझ्या जीवनात क्षमेचे सामर्थ्य हे मोकळे केल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. ज्या सर्वांनी मला दुखविले आहे त्यासर्वांना क्षमा करण्याचे मी निवडतो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ते व्यवस्थित करा● शहाणपणाची पारख होत आहे
● चिंता करीत वाट पाहणे
● बेखमीर अंत:करण
● उपासने साठी इंधन
● कोणीही आवडता नाही परंतु घनिष्ठ
● मुळा बद्दल विचार करणे
टिप्पण्या