त्या समयी येशूवा बिन योसादाक व त्याचे बांधव जे याजक आणि जरुब्बाबेल बिन शल्तीएल व त्याचे बांधव यांनी उभे राहून देवाचा माणूस मोशे याच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे होमार्पणे करण्यासाठी इस्राएलाच्या देवाची वेदी बांधिली. (एज्रा ३:२)
यहूदी लोकांचे संपूर्ण जीवन हे मंदिराभोवती केंद्रित होते. आता दृश्य हे आहे की आक्रमणकारी सेने ने मंदिर हे अगोदरच नष्ट केलेले आहे. एज्रा ला दैवी रित्या प्रेरित केले व आदेश देण्यात आला आहे की देवाचे मंदिर पुनर्स्थापित करावे.
मनोरंजक आहे की त्यांनी मंदिर बांधण्याअगोदर, त्यांनी देवाची वेदी ही बांधिली आहे. त्यांनी वेदी द्वारे सुरुवात केली, कारण ती आध्यात्मिक प्राथमिकता होती.
नेहमी हा सिद्धांत लक्षात ठेवा, "तुम्हाला वेदी असू शकते पण मंदिर नाही, परंतु वेदी शिवाय तुम्हाला मंदिर असू शकत नाही." हे ते मंदिर नाही जे पुरस्कारास अर्पण करते परंतु ही ती वेदी आहे जी पुरस्कारास अर्पण करते. सामर्थ्य हे मंदिराकडून येत नाही परंतु वेदिकडून. जे सर्व काही मंदिरात होते ते वेदिपासून सुरु होते.
हा सिद्धांत मनात ठेवून मग;
तुम्ही महान सेवाकार्या स्थापित करण्यापूर्वी, तुमच्या प्रार्थनेची वेदी अगोदर बनवा
तुमचे घर बांधण्यापूर्वी, अगोदर वेदी बनवा
तुमचा विवाह स्थापन्न करण्यापूर्वी, अगोदर वेदी बनवा
तुमचा व्यवसाय स्थिर करण्यापूर्वी, अगोदर वेदी बनवा
जर तुम्ही ह्या प्राथमिकतेची काळजी घेतली इतर सर्व गोष्टी सहज घडून येतील.
प्रभु येशूने स्वतः वेदी ला प्राथमिकता देण्याबद्दल बोलले आहे
तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. (मत्तय ६:३३)
मूळतः प्रभु येशू हे म्हणत होता, जर तुम्ही वेदी बांधण्यासाठी सर्वांच्या अगोदर प्राथमिकता दयाल तर इतर सर्व गोष्टी ह्या सहज घडून येतील. हा एक सामर्थ्यशाली सिद्धांत आहे जो तुम्ही आणि मी कधीही दुर्लक्षित करू नये.
वेदी काय आहे?
वेदी हे बदली करण्याचे स्थान आहे. ते आध्यात्मिक व स्वाभाविक यांच्यामधील मिळण्याचे स्थान आहे, दैवता व मानवता यामधील मिळण्याचे स्थान. वेदी हे ते स्थान आहे जेथे परमेश्वर मानवास भेटतो.
वेदी हे ते स्थान आहे जेथे नियती ह्या बदलतात.
जुन्या करारात, वेदी हे भौतिक स्थान होते. जर तुम्हाला देवाला भेटावयाचे आहे, ते तुम्ही इतर कोणत्याची ठिकाणी करू शकत नव्हते, तुम्हाला ह्या वेदी कडे जाणेच भाग होते. जर तुम्हाला अर्पण करावयाचे आहे, तर तुम्हाला ह्या अर्पण करण्याच्या स्थानीच जावे लागत होते. तथापि, नवीन करारात, वेदी हे आध्यात्मिक स्थान आहे, हे त्याठिकाणीच मानवी आत्मा देवाच्या आत्म्याबरोबर भेटतो.
मागे बायबल च्या दिवसात, यहूदी लोकांना ही वेदी यरुशलेम मध्ये होती व शोमरोनी लोकांना त्यांची वेदी शोमरोन मध्ये होती. दोघेही वादविवाद करीत असत की त्यांची वेदी हीच योग्य वेदी आहे. ह्यामुळे यहूदी व शोमरोनी लोकांमध्ये मोठे शत्रुत्व निर्माण केले. ह्याकारणामुळे, ते एकमेकांबरोबर संभाषण ठेवत नसत.
जेव्हा प्रभु येशू एका शोमरोनी स्त्री ला याकोबाच्या विहिरीजवळ भेटला, त्याने सर्व काही स्पष्ट केले. बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर [शोमरोन] व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान [आध्यात्मिक मनुष्य] (योहान ४:२१)
आपण आता भौतिक वेदी बांधीत नाही कारण आपण पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत.
तुमची ही प्राथमिकता करा की देवाचा धावा तुमच्या रोजच्या प्रार्थना, उपासना व वचनात करा. तुमच्या वेदी कडे सामर्थ्य आहे की तुमचे जीवन बदलावे.
प्रार्थना
१. आठवत असेल तर, आपण प्रत्येक आठवड्यात मंगळावर/गुरुवार/शनिवार उपास करीत आहोत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरिता प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा देखील त्याचा उपयोग करा.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
माझ्या देवा, माझ्या प्रभू, मला कृपा दे की नेहमीच तुला माझ्या जीवनात प्रथम असे ठेवावे.
आशीर्वादित पवित्र आत्म्या, येशूच्या नावाने, तुझ्या पवित्र अग्नीद्वारे माझ्या आध्यात्मिक मनुष्याला प्रज्वलित कर.
कुटुंबाचे तारण
येशूच्या नावाने, पवित्र आत्म्याचा अग्नी मजवर आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर नव्याने उतरून येवो.
हे परमेश्वरा, येशूच्या नावाने, माझ्या जीवनात आणि माझ्या कुटुंबात ते सर्व जे पवित्र नाही ते तुझ्या अग्नीद्वारे जाळून टाक.
आर्थिक प्रगती
जो कोणी माझ्याकडे साहाय्यासाठी पाहत आहे तो निराश होणार नाही. माझ्याजवळ पुरेसेपेक्षा अधिक असेन की माझ्या गरजांचे समाधान करावे आणि पुष्कळ असेल की गरजेमध्ये असणाऱ्या इतरांना द्यावे. मी कधीही कर्ज घेणारा नाही, तर कर्ज देणारा आहे. येशूच्या नावाने.
केएसएम चर्च:
पित्या, पास्टर मायकल आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, स्टाफ आणि संघ सदस्य यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांनी अलौकिक शहाणपण, समज, सर्वश्रेष्ठ सल्ला, ज्ञान आणि देवाच्या भयात चालावे. (यशया ११:२-३)
राष्ट्र
पित्या, तुझ्या धार्मिकतेने आमचे राष्ट्र भरू दे. आमच्या राष्ट्राच्या विरोधातील अंधार व विध्वंसाची सर्व शक्ती नष्ट केली जावी. आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात शांतता आणि समृद्धी नांदू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पित्याची मुलगी-अखसा● परमेश्वरा सोबत चालणे
● येशू एक बाळ म्हणून का आला
● केवळ इतरत्र धावू नका
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● ईश्वरीय शिस्तबद्धतेचे स्वरूप-१
● तुमची नवीन वाटचाल थांबविली जाऊ शकत नाही
टिप्पण्या