बोलण्याची घाई करू नकोस; देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नकोस; कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस; म्हणून तुझे बोलणे अल्प असावे." (उपदेशक ५:२)
स्वर्ग, प्रामुख्याने, एक असाधारण क्षेत्र आहे जिथे सर्वशक्तिमान आणि भव्य देव, जो संपूर्ण विश्वाचा राजा आणि निर्माणकर्ता वास करतो. खगोलीय क्षेत्र, दैवी तेजाने व्यापलेले आहे, ते केवळ देवाचे निवासस्थान नाही परंतु एक पवित्र स्थान देखील आहे जे शांतता, निर्मळता आणि अमर्याद प्रेम व्यक्त करते. दैवी अस्तित्वाचा केंद्रबिंदू म्हणून स्वर्ग हे देवाच्या अतुलनीय सामर्थ्याचे आणि चिरंतन उपस्थितीचे पुरावे म्हणून अस्तित्वात आहे.
स्वर्गात, देवाची उपस्थिती आणि त्याच्याकडे पाहण्याची आपली क्षमता आपले स्नेह, भावना, विचार, संभाषण, गीते इत्यादी हे सदैव आणि सदा सर्वकाळ व्यापून राहील. प्रभू येशूने स्वतः म्हटले आहे की अनंतकाळचे जीवन म्हणजे देवाला ओळखणे आहे. (योहान १७:३)
परमेश्वर म्हणतो, "आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पदासन आहे" (यशया ६६:१). ते त्याच्या राज्याचे आसन देखील आहे. तेथेच तुम्हांला त्याचे सिंहासन मिळेल.
स्वर्ग हे देवाच्या देवदूतांचे प्राथमिक क्षेत्र देखील आहे.
"आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही" (मार्क १३:३२)
बायबल आणखी आपल्याला हे सांगते, "पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत...... ह्यांच्याजवळ आला आहात.: (इब्री १२:२२)
स्वर्गामध्ये हजारो आणि हजारो देवदूत आहेत.
यावर कधीही शंका घेऊ नका. स्वर्ग हे वास्तविक स्थान आहे; आता ज्या गोष्टी तुमच्याभोवती आहेत त्यापेक्षा अधिक वास्तविक. काही सिनेमांच्या प्रतिमांनी स्वर्गाबद्दलच्या तुमच्या विचारांना बदलू देऊ नका. ते एक वास्तविक स्थान आहे, ज्याप्रमाणे हे निश्चित आहे की पृथ्वी हे वास्तविक स्थान आहे.
आणखी मनोरंजक गोष्ट ही आहे की सर्व वयोगट, राष्ट्रीयत्व, सामाजिक पार्श्वभूमी व लिंग असलेले लोक आणि विविध धर्म, ज्यामध्ये नास्तिक देखील आहेत, त्यांच्याकडे देखील स्वर्गाचे तपशीलवार वर्णन करणारे दृष्टांत मिळाले आहेत.
सत्य हे आहे की ते सर्व जे प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांचा प्रभू आणि तारणारा म्हणून विश्वास ठेवतात ते एका दिवशी तेथे असतील. तुम्ही खरोखरच तुमचे जीवन प्रभूला समर्पित केले आहे काय? त्याचे वचन वाचणे, प्रार्थना करणे, स्वर्ग व पृथ्वीच्या प्रभूची उपासना करण्यात तुम्ही वेळ घालवीत आहात काय? आत्ताच वेळ आहे की अनंतकाळामध्ये निवेश करावा; उद्यासाठी ते ढकलू नका.
टिपा: स्वर्गासंबंधी तुम्हांला काही प्रश्न आहेत काय? तुम्हांला कधी स्वर्गाचा दृष्टांत झाला का? (त्याचे वर्णन करा)
प्रार्थना
१. जसे तुमच्यापैकी अनेकांना हे ठाऊक आहे की, आम्ही २०२३च्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांवर कमीत कमी ३ आणि त्यापेक्षा अधिक मिनिटे प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच, ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाही तेव्हा देखील ह्या प्रार्थना मुद्द्यांचा उपयोग करा.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
प्रभू येशू, तू देवाचा पुत्र आणि देवाकडे जाण्याचा एकमात्र मार्ग आहे. मी तुला माझा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारतो. माझ्यासाठी वधस्तंभावरील तुझ्या अनमोल बलिदानासाठी तुझे आभार. प्रभू तुला अधिक घनिष्ठतेमध्ये जाणण्याची माझी इच्छा आहे. या कृपेसाठी मी तुला विनंती करीत आहे. आमेन.
कुटुंबाचे तारण
मी कबूल करतो की मी आणि माझे घराणे तर तुझी सेवा करणार.
आर्थिक प्रगती
मी परमेश्वराच्या वचनांमध्ये हर्षित होतो; त्यामुळे मी आशीर्वादित आहे. संपत्ती आणि धन माझ्या घरात राहतील, आणि माझे नीतिमत्व सर्वकाळ टिकते. (स्तोत्र ११२:१-३)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्ति जो केएसएम चर्चबरोबर जुळलेला आहे त्याची वचन आणि प्रार्थनेमध्ये वाढ व्हावी. त्यांना तुझ्या आत्म्याचा नव्याने अभिषेक होऊ दे.
राष्ट्र
पित्या, भारतातील प्रत्येक शहरात आणि राज्यात तुझ्या आत्म्याने आणि बुद्धीने भरलेले पुढारी निर्माण कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देव महान द्वार उघडतो● येशूचे रक्त लावणे
● चर्चला न जाता चर्च ऑनलाईन पाहणे ठीक आहे काय?
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● उपास द्वारे देवदूताला कार्य करावयास लावणे
● तुमच्या परिवर्तनाला काय अडथळा करते ते समजा
● विश्वासात स्थिर उभे राहावे
टिप्पण्या