आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास, तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला, हे ते आपण होऊन आम्हांविषयी सांगतात; त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेलेल्यातून उठविले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे. (१ थेस्सलनी १:१०)
हा वाक्प्रचार "भावी क्रोधापासून" लक्षात घ्या. बायबल अतिशय क्रोधाच्या काळा विषयी बोलते, जे इतके अनोखे आहे देवाच्या तीव्रतेच्या क्रोधामुळे जो ओतला जात आहे, जे म्हणजे भूतकाळात इतिहासातील देवाच्या क्रोधाच्या प्रगट होण्यापेक्षा त्याच्या स्वतःच्या पूर्णते मध्ये एकमेव असे आहे.
प्रेषित पौल येथे बोलत आहे, की प्रभु येशू महान शक्तिशाली (लोकांतरण) कार्याद्वारे सुटका घडवून आणेल जे त्याने येथे पृथ्वीवर प्रभूच्या क्रोधाच्या भविष्यातील त्या दिवसापासून आपल्याला ख्रिस्ती म्हणून अगोदरच दिले आणि पुरविले आहे.
प्रभूच्या क्रोधाचा हा समय 'महासंकटाचा काळ' असा ओळखला जातो. दानीएल १२:१ त्यास "कधीही आले नाही असे संकट...." असे संदर्भित करतो. प्रभूच्या क्रोधाचा हा समय हा अक्षरशः सात वर्षे राहणार आहे.
महासंकटाचा काळ केवळ सात वर्षे का?
प्रभु येशूने महासंकट विषयी बोलण्याचे भाकीत केले "आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील." (मत्तय २४:२२)
महासंकटाच्या सात वर्षांच्या काळा दरम्यान, सर्व ख्रिस्ती लोकांचे स्वर्गात लोकांतरण झाल्यावर, बायबल ही चेतावणी देते की पश्चातापहीन पाप्यांवर देवाचा क्रोध हा ओतला जाईल. हा न्याय प्रकटीकरण मध्ये वर्णन केला आहे, ज्यामध्ये युद्ध (नेहमीचे तसेच अनुशक्तिविषयक), दुष्काळ, मरी, वन्यप्राणी मानवांवर हल्ले करतील, उल्कापात, प्रचंड भूमिकंप आणि बरेच काही आहे.
ह्या भयानक न्यायाची सुरुवात ही सात वर्षाच्या महासंकटाच्या काळाच्या सुरुवातीने होईल जे ख्रिस्त विरोधक व इस्राएल मधील कराराच्या सात वर्षाचा शांतीच्या काळाने चिन्हित होईल.
हा महासंकटाचा काळ दोन भागात विभागला आहे. प्रत्येक हा साडेतीन वर्षाचा असेल. महासंकटाच्या सात वर्षाचा दुसरा अर्धा भाग हा पहिल्या अर्ध्या भागा पेक्षा अतिशय वाईट असेल. ह्यास महासंकटाचा काळ असे म्हटले आहे.
इस्राएल बरोबर ज्या करारावर त्याने स्वाक्षरी केली होती त्याचे ख्रिस्त-विरोधक उल्लंघन करण्याद्वारे हे नंतरचे साडेतीन वर्षे सुरु होतील. तो बलिदान करण्यास मनाई करण्याद्वारे तो करार मोडेल आणि यरुशलेम मध्ये पुन्हा बांधण्यात आलेल्या मंदिराच्या परम पवित्र स्थानाचा विटाळ करेल. हे भाकीत केले आहे "ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात' (दानीएल ९:२६-२७, मत्तय २४:१५ चा संदर्भ घ्या), आणि मग ते महासंकटाच्या सात वर्षाच्या काळाच्या साडेतीन वर्षाची सुरुवात असेल.
महासंकटाचा काळ हर्मगिदोन येथील युद्धावेळी येशूच्या विजयाने पूर्ण होईल. कृपा करून तुमच्या स्वतःची आध्यात्मिक तयारी करा. खात्री करा की कुटुंब असे तुम्ही प्रार्थने मध्ये आहात. हे मग तुमच्या कुटुंबाला सुद्धा तयार करेल. प्रभु लवकरच येत आहे.
बहुमुल्य पित्या, तुझा आत्मा व वचन द्वारे, मला व माझ्या कुटुंबाला लोकांतरण साठी तयार कर. मला व माझ्या कुटुंबाला तुझा आत्मा व वचन द्वारे येशूच्या नांवात मार्गदर्शन कर. आमेन.
Most Read
● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे● उपासनेचा सुगंध
● असामान्य आत्मे
● अगापेप्रीति मध्ये वाढणे
● उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा
● प्रचलित अनैतिकतेमध्ये स्थिर राहणे
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२