english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. राग समजून घेणे
डेली मन्ना

राग समजून घेणे

Thursday, 23rd of November 2023
22 12 1712
Categories : Anger Character Emotions Self Control
तर, राग म्हणजे नक्की काय? रागाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी राग आणि त्याची यंत्रणा समजून घेणे महत्वाचे आहे.

रागाबद्दल समजून घेण्याची पहिली गोष्ट म्हणजे तो वास्तविक शारीरिक प्रतिसाद आहे. नीतिसूत्रे २९:२२ स्पष्ट करते, “रागीट मनुष्य तंटा उपस्थित करतो, क्रोधाविष्ट मनुष्याकडून बहुत अपराध घडतात.”
वाक्प्रचार “क्रोधाविष्ट” इब्री वाक्प्रचारात “उष्णतेचा मालक” असे अनुवादित करते. हे जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा तुमच्या शरीरातून गरम पाणी प्रवाहित होत आहे यास संबोधते.

राग हे लक्षण आहे, खरी समस्या नाही. ते तुमच्या कारमध्ये लाल बत्तीच्या चेतावणीसारखे आहे, जे काहीतरी चुकलेले आहे यास सूचित करते.

तर, आपल्याला राग कशाने येतो? सामान्यतः, हे या तीन कारणांकडून येते:
  1. दुखापत, 
  2. निराशा आणि 
  3. भीती.
१. दुखापत:
प्रथम, दुखापत राग आणू शकते. ही शारीरिक वेदना असू शकते, पण जास्तकरून नेहमी, ते भावनात्मक अपमान किंवा यातना असते. नाकारणे, विश्वासघात करणे, अनादर करणे, प्रेम न करणे, किंवा अन्यायकारक वागणूक या भावना अनेकदा संतप्त प्रतिक्रिया निर्माण करतात.

पवित्र शास्त्रातील उदाहरण हे काइनाचे आहे. उत्पत्ती ४ मध्ये, आपण वाचतो, “हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला; पण काइन व त्याचे अर्पण ह्यांचा त्याने आदर केला नाही; म्हणून काइन संतापला व त्याचे तोंड उतरले” (उत्पत्ती ४:४-५). काइनाचा राग आणि त्यानंतर लगेचच त्याच्या भावाचा खून नाकाराच्या भावनात्मक वेदनेतून आला.

२. निराशा 
उदाहरण: नामान (२ राजे ५:११-१२)
निराशा हे रागाचे आणखी एक कारण आहे. ते सहसा अपूर्ण अपेक्षा किंवा नियंत्रण गमावल्यामुळे उद्भवते. आपण आयुष्यात असंख्य अपूर्ण अपेक्षांचा सामना करतो- विवाह, मुलेबाळे, नोकरी इत्यादी संबंधात. आणि नियंत्रण गमावल्यामुळे. एक सामान्य उदाहरण हे वाहतूक कोंडीमुळे जाणवणारा राग जेथे तुम्हांला असहाय्यपणे उशीर होतो आणि त्याविषयी तुम्ही काहीही करू शकत नाही.

निराशा राग आणते याचे पवित्र शास्त्रातील उदाहरण हे नामानाचे आहे. २ राजे ५ मध्ये, “हे ऐकून नामान रागावून चालता झाला; तो म्हणाला, ‘पाहा, मला वाटले होते तो स्वतः माझ्याकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर ह्याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. दिमिष्कातल्या नद्या अबाना व परपर ह्या इस्राएलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यांच्यात स्नान करून मला शुद्ध होता येणार नाही काय?” असे म्हणून तो क्रोधीत होऊन निघून गेला” (२ राजे ५:११-१२). नामानाचा राग अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे वाढला; त्याला संदेष्टा अलीशाकडून वेगळ्या पद्धतीची अपेक्षा होती.

३. भीती
आणि तिसरी चालना ही भीती आहे. कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हांला धक्कादायक किंवा धोका आहे असे वाटते, तेव्हा बहुतेक वेळा तुम्ही रागात प्रतिसाद देतात. लक्षात ठेवा, आपण पूर्वी पाहिले आहे की रागाला शारीरिक प्रतिसाद हा भीतीला शारीरिक प्रतिसादासारखाच आहे. त्यामुळेच जेव्हा कोणी तुम्हांला धक्कादायक वाटेल असे करतो किंवा तुम्हांला भीती दाखवून ओरडतो, तेव्हा तुम्ही बहुतेक वेळा रागात येता. हा तोच प्रतिसाद आहे.

भीती राग आणते याचे एक चांगले उदाहरण हे जुन्या करारातील राजा शौलाचे आहे. जेव्हा दाविदाने गल्ल्याथचा वध केला, स्त्रिया रस्त्यावर नृत्य करत आल्या. आपण १ शमुवेल १८ मध्ये वाचतो, “नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येणेप्रमाणे म्हणत: ‘शौलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले.’ हे ऐकून शौलाला फार क्रोध आला; हे त्यांचे शब्द त्याला आवडले नाहीत ......परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शौलाला सोडले होते, ह्यामुळे दावीद शौलाला भीत असे” (१ शमुवेल १८:७-१२). दाविदामुळे शौलाला भीती वाटली आणि त्याने रागात प्रतिसाद दिला.

राग ही दुय्यम भावना आहे. म्हणून, जेव्हा तुम्ही रागात येता, तेव्हा तुम्हांला थांबायचे आहे, आणि स्वतःला विचारायचे आहे, ‘मी रागात का आहे?’ कोणती लाल बत्ती आहे जी मला चेतावणी देण्याचा प्रयत्न करत आहे? मी अपमानित, निराश किंवा घाबरलेलो आहे का? एकदा की तुम्ही समजून घेतले की राग ही दुय्यम भावना आहे, तेव्हा तुम्ही वास्तविक समस्यावर उपाय करण्यास सुरु करू शकता, प्राथमिक भावना ही तुम्हांला बाजूला करत असते.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, माझा राग-दुखापत, निराशा किंवा भीतीच्या उगमाची ओळख करण्यासाठी मला मदत कर. तुझी प्रीती आणि समज, जी मला शांती आणि समेटाकडे नेते त्यासह या सखोल भावनांवर उपाय करण्यासाठी मला ज्ञान आणि संयम प्रदान कर. येशूच्या नावाने. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● दैवी भेट देण्याचा तुमचा क्षण ओळखा
● तुमच्या आत्म्याची पुनर्स्थापना
● सुटकेचा दिवस (दिवस १०)
● दिवस ०६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● आजच्या वेळेत हे करा
● परमेश्वर वेगळ्या प्रकारे पाहतो
● दैवी व्यवस्था-१
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन