तुमचे जीवन प्रभु येशू ख्रिस्ताला समर्पित केल्यावर, पुढील गोष्ट ज्याची तुम्हाला गरज आहे की वाईट किंवा नकारात्मक प्रवृत्ति पासून सुटका.
काही नकारात्मक प्रवृत्ति जी आजच्या वेळेमध्ये प्रचलित आहे:
१. तुलना
सर्वात सोपी व सामान्य गोष्ट की कोणाला स्वतःविषयी वाईट वाटावे ते म्हणजे स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर नापसंतीने करावी. कोणी हे समजू शकतो जर हे समजावे व त्यात वाढावयाचे आहे. परंतु, अनेक जण तुलना करण्याच्या प्रकारात जाऊन शेवटी निराश व असुरक्षित होतात व कधीकधी इतर व्यक्ति प्रति मत्सरी होतात. अशा लोकांना वाटते की प्रत्येक जण हा त्यांच्या विरोधात आहे. एक सुदृढ मन हे ते आहे जे कोणाच्या प्रयत्नांची प्रशंसा करते व शिकण्यास इच्छूक असते.
२. इतरांना दोष देणे
ह्या पृथ्वीवर कोणाच्या चुकांसाठी प्रत्येकाला दोष देणे ही आणखी एक नकारात्मक प्रवृत्ति जी सामान्यपणे प्रचलित आहे. कधीकधी आपण हे समजू शकत नाही की आपण त्यात सहभागी आहोत. नेहमी हे लक्षात ठेवा, प्रत्येक शब्द जो तुम्ही बोलता त्यास प्रभाव आहे.
३. बेपर्वा प्रवृत्ति
बेपर्वा प्रवृत्ति म्हणण्याचा माझा काय अर्थ आहे? तुम्ही लोकांना पाहिले आहे काय, जेव्हा त्यांना प्रार्थनेची गरज असते, ते लोकांना मध्यरात्रीच्या वेळी सुद्धा फोन करतात व प्रार्थनेची विनंती करतात? ते त्यांच्या प्रार्थना विनंत्या सर्व माध्यमांवर सर्वाना सांगू लागतात. तथापि, जेव्हा इतरांना प्रार्थनेची तातडीची गरज असते, ते त्या व्यक्तीच्या प्रार्थनेच्या विनंतीला फार क्वचितच उत्तर देतात, व त्यांच्या कामांमध्ये सामान्यपणे व्यस्त होतात.
तातडीच्या व महत्वाच्या परिस्थितीत सुद्धा, इतर हे मदत करण्यासाठी धावतपळत असतात आणि ते काय करू शकतात ते करीत असतात परंतु येथे काही आहेत ज्यांना त्याची पर्वा नसते की त्यांना साहाय्य करावे, मोठे कार्य करणे तर सोडाच. अशा प्रकारच्या प्रवृत्तीला बेपर्वा प्रवृत्ति म्हटले आहे.
४. भूतकाळातील गोष्टींवर सतत विचार करीत राहणे
भूतकाळापासून शिकणे हे चांगले आहे परंतु भूतकाळातच अडखळून राहणे किंवा भूतकाळातच सतत राहणे हे चांगले नाही. जे भूतकाळात घडले आहे ते बदलू शकत नाही, परंतु जे अजून घडावयाचे आहे त्यास आपल्याद्वारे वळण देणे व प्रभावित करता येऊ शकते.
प्रवृत्ति कशा तयार होतात?
प्रवृत्ति ह्या अनुभवाच्या परिणामामुळे किंवा निरीक्षण (ज्यामध्ये तुम्ही कोणाबद्दल तरी काही वाचले असेन याचा समावेश असू शकतो) करण्याद्वारे सुद्धा बनतात. अशाच वेळी आपल्याला सावधान राहिले पाहिजे की नकारात्मकदृष्टया प्रभावित होऊ नये. जर तुम्ही नकारात्मकतेला तुमच्या जीवनात सतत स्थिर होऊ देता तेव्हा तुम्ही स्वतःला वाईट प्रवृत्ति मध्ये कुशल झालेले पाहाल. यामुळेच बायबल आपल्याला चेतावणी देते हे म्हणत, "सैतानाला जागा किंवा स्थिरावू देऊ नका" [त्यास कोणतीही संधी देऊ नका] (इफिस ४:२७ ऐम्पलीफाईड भाषांतर). याकारणामुळेच देवाच्या वचनात राहणे व त्यास तुमच्या विचारांस वळण लावू दयावे हे वाईट किंवा नकारात्मक प्रवृत्ति पासून सुटका करण्यामध्ये अत्यंत महत्वाचे आहे.
जर आपण परमेश्वराकडे आपल्या नकारात्मक प्रवृत्तीची कबुली दिली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे की आपल्याला सर्व अधर्मापासून क्षमा करावी व शुद्ध करावे (१ योहान १:९ सारांशीत). नकारात्मक प्रवृत्ति पासून सुटका प्राप्त करण्यात हे पहिले पाऊल आहे.
पुढचे पाऊल हे आपल्या रोजच्या जीवनात वचनावर मनन करून व त्याची मुल्ये व सिद्धांत आत्मसात करण्याद्वारे तुमच्या मनाच्या आत्म्यामध्ये नवीन होणे आहे (इफिस ४:२३).
विविध अभ्यासाने प्रगट केले आहे की नकारात्मक प्रवृत्ति कोणाचे आरोग्य, आनंद, संपन्नतेवर कसे हानिकारक परिणाम करू शकतात जर त्यांवर ताबडतोब उपाय हा काढला नाही.
अंगीकार
मला ख्रिस्ताचे मन व प्रवृत्ति आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● द्वारपाळ● इतरांसाठी प्रार्थना करणे
● परमेश्वरा मध्ये स्वतःला कसे प्रोत्साहित करावे
● दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
● शब्दांचे सामर्थ्य
● चांगला मेंढपाळ
टिप्पण्या