आणि"विश्वसनीय साक्षी, मेलेल्यातून'प्रथम जन्मलेला' व'पृथ्वीवरील राजांचा अधिपती' येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांसकृपा व शांति असो. जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हाला 'पातकातून मुक्त केले'. (प्रकटीकरण १:५)
वरील वचनात, आपल्याला आपल्या प्रभूचे तीन विलक्षण शीर्षक मिळतात:
१.विश्वसनीय साक्षी
२.मेलेल्यातून'प्रथम जन्मलेला'
३.'पृथ्वीवरील राजांचा अधिपती'
प्रभूच्या नावाची स्तुति करण्याचाकोणता सुंदर मार्ग आहे. एक विश्वसनीय साक्षी आहे ज्याच्या साक्षी वर विश्वास ठेवतायेतो.
विश्वासू साक्षीदार
एक साक्षीदार जे पाहिले आहे किंवा ऐकले आहे हे सांगतो. एक विश्वासू साक्षीदार हा तो आहे ज्याची साक्ष प्रत्येकवेळी विश्वसनीय असते.
कोणत्या अर्थाने ख्रिस्त हा विश्वसनीय साक्षी होता?
प्रेषित योहानाचा अर्थ हा की येशू ख्रिस्तावर सत्य बोलण्यावर विश्वास ठेवता येऊ शकतो. जेव्हा तो बोलला, तेव्हा त्याने केवळ सत्य बोलले. त्याचे वचन पूर्णपणे सत्य व अधिकारवाचक आहे.
१ तीमथ्यी ३:१६ त्याविषयी बोलते, "ख्रिस्त येशू, जेव्हा पंत पिलात समोर साक्ष देत होता, त्याने चांगला विश्वास दाखविला." जेव्हा तो पिलात समोर उभा राहिला तेव्हा त्याने काय म्हटले? "मी जगात आलो की सत्याची साक्ष दयावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो." (योहान १८:३७)
येशू ख्रिस्त हा अत्युच्च-सत्य बोलणारा आहे, आणि ज्यांस सत्य शोधावयाचे आहे त्यांनी त्याचे ऐकले पाहिजे. येशूने मनुष्यांना परमेश्वर (पिता)प्रगट केला. प्रभु येशूने केवळ जे बोलले (जसे त्याच्याअगोदर संदेष्ट्यानी केले होते)त्याद्वारे परमेश्वराला प्रगट केले नाही, परंतु तो त्याच्या व्यक्तिमत्वा मध्ये, एक सिद्ध प्रकटीकरण व परमेश्वर जे काही होता व आहे त्यासर्वांची साक्ष होता.
हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या 'उजवीकडे बसला'. (इब्री १:३)
फिलीप्प ने त्यास म्हटले, "प्रभुजी आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा मी इतका काळ तुम्हांजवळ असूनही तूं मला ओळखीत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर आम्हाला पिता दाखवा असे तूं कसे म्हणतोस? (योहान१४:८-९)
"ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे" काहीहीअपराध नाही! परंतु कोणताही संदेष्टा अशा प्रकारे बोलला नाही, कोणताही संत किंवा तत्वज्ञानी असा बोलला नाही. प्रत्येकजण मार्ग दाखविण्याचा दावा करतात परंतु येशू केवळ एकमेव आहे ज्याने "मार्ग" आहे हा दावा केला.
प्रार्थना
सर्वशक्तिमान पित्या, विश्वाच्या निर्माणकर्त्या, मी तुझ्या पवित्र नावाला आशीर्वाद देतो.
पित्या, माझ्या जीवनातून सर्व चूक व बनवाबनवी करणे हे काढून टाक. माझ्या पावलांना तुझ्या सत्यात मार्गदर्शन कर व मला तुझा पुत्र येशू सारखे अधिक कर. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● एक शास्वती होय● देवाने-दिलेले सर्वात उत्तम स्त्रोत
● इतरांना आशीर्वाद देणे सोडू नका
● धार्मिक सवयी
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
● दानधर्म करण्याची कृपा - ३
टिप्पण्या