त्याने आणखी हजार हात अंतर मापिले तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. (यहेज्केल ४७: ५)
जेव्हा तुम्ही लहान असाल तेव्हा कदाचित तुम्ही समुद्रकिनारी सहली साठी गेला असाल. मला अशी एकवेळ आठवते, पाण्यात जात राहिलो जोपर्यंत शेवटी लाटा माझ्या गुडघ्यावर आदळू लागल्या. तथापि, तरी मीपुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि माझा तोल जाऊ लागला आणि पाण्यात पडू लागलो, मी इतका घाबरलो की माझ्या कुटुंबाच्या लोकांना हाक मारिली (जे माझ्याजवळच होते) आणि ते पळत आले जोपर्यंत पुढची लाट माझ्यावर आदळत नाही.
कधी कधी आपला परमेश्वर हा आपल्याला अशा खोल पाण्यात नेतो की आपण एका विशेष परिस्थितीवर नियंत्रण गमावितो आणि आपल्याकडे काही पर्याय राहत नाही परंतु केवळ आपल्या स्वतःसाठी त्याच्यावर भरंवसा ठेवावा. जेव्हा आपण त्याकडे आक्रोश करतो, आपण देवाचे कार्य आणि देवाचा हात डोंगराला सरकवीत आहे हे पाहतो.
जे गलबतात बसून समुद्रातून प्रवास करितात, महासागरांत उदयोगधंदा करितात, ते परमेश्वराची कृत्ये, त्याची अद्भुतकृत्ये, भरसमुद्रात पाहतात. तो आज्ञा करून वादळ उठवितो, तेव्हा त्याच्या लाटा उसळतात.ते आभाळापर्यंत वर जातात;
तळापर्यंत खाली जातात; क्लेशाने त्यांच्या जीवाचे पाणी पाणी होते. ते मद्यप्यासारखे डुलतात व झोकांड्या खातात, त्यांची मति अगदी कुंठीत होते.
ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करितात, आणि तो त्यांस क्लेशांतून मुक्त करितो. तो वादळ शमवितो, तेव्हा लाटा शांत होतात. त्या शांत झाल्यामुळे ते हर्षित होतात, आणि तो त्यांस त्यांच्या इच्छित बंदरास नेतो. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत. (स्तोत्रसंहिता १०७: २३-३१)
परमेश्वर हा काही पर्याय नाही की जेव्हा तुम्हाला त्याच्याकडे वळावयास वाटेल तेव्हा तुम्ही वळाल. तुम्हांला ठाऊक आहे का कधी कधी परमेश्वराचे सामर्थ्य तोपर्यंत दिसत नाही जोपर्यंत परिस्थिती त्या क्षणापर्यंत पोहचत नाही जेथे दुसरा कोणताही पर्याय नाही परंतु केवळ परमेश्वर. कधी कधी परमेश्वर आपल्याला जीवनाच्या फार कठीण प्रसंगातून बराच वेळ नेतो.
योसेफ ला अशा कठीण संकटातून 17 वर्षे नेण्यात आले. त्याच्या भावांद्वारे द्वेष, फारोच्या येथे गुलाम, आणिअयोग्य तुरुंगवास हे योसेफ साठी संकटाचे प्रसंग होते.
त्या संकटाच्या प्रसंगी त्याने स्वप्ने पाहिली, त्याच्या दाना चाविशेष अभिषेक की व्यवस्थापन करावे, त्याच्या वयोमानापेक्षा महान ज्ञान.
संकटमय परिस्थिती ह्या त्यास एका कार्यासाठी तयारी होती जे इतके महान होते की कधी तो त्याची कल्पना सुद्धा करू शकला नसता. तो त्याच्या पीढीच्या कोणाही पेक्षा अधिक देवाचे कार्य स्पष्टपणे पाहू शकत होता. देवाचे महान कार्य अवलंबून होते की एका 30 वर्षाच्या व्यक्तीने त्यात गडबड करू नये. देवाने योसेफ ला तयारी करण्याच्या संकटाच्या कठीण प्रसंगातून नेले ही खात्री करण्यासाठी की तो त्यात निश्चितच स्थिर राहील ज्याचा तो सामना करणार होता.
जर तुम्हांला खूप संकटातून घेऊन जाण्यास परमेश्वर निवडतो, तर ते काही कारणासाठी असते. जितके महान पाचारण, तितक्याच कठीण संकटातून जावे लागते. त्याच्या ज्ञानामध्ये भरंवसा करा की तुमची संकटे ही तयारी आहे की तुमच्या जीवनात परमेश्वराची कार्ये पाहावी.
प्रार्थना
स्वर्गातील पित्या, जेव्हा मला मोठया संकटातून जावयाचे आहे, मी प्रार्थना करतोकी तू मला मार्गदर्शन कर आणि मला सामर्थ्य दे की चुकू नये आणि असे होवो की माझा विश्वास डळमळू नये. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते● २१ दिवस उपवासः दिवस ०७
● स्वर्गाचे द्वार उघडा व नरकाचे द्वार जोरानेबंद करा
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 3
● पावित्रीकरण स्पष्टपणे सांगितले आहे
● उदारपणाचा सापळा
● तुमची प्रतिक्रिया काय आहे?
टिप्पण्या