वल्हांडण सणापूर्वी असे झाले की, येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले (योहान १३: १).
आपल्या कुटुंबाच्या सोबत जो काही क्षण आपल्याला मिळतो त्याचा आनंद घ्या. उदया, आपल्याला कदाचित अशा क्षणांचे भाग्य मिळेल किंवा मिळणार नाही.
एके दिवशी, एक व्यस्त पास्टर त्याचा रविवारचा संदेश तयार करीत होता. त्याच्या लहान मुलीने त्यावर मागून उडी मारली आणि त्यास आलिंगन दिले 'डाडा'. पास्टर ने तिला सौम्यपणे खडसावले आणि म्हटले तो आता इतका व्यस्त आहे की तिच्याबरोबर वेळ घालविण्यासआता त्यास वेळ नाही.
ह्या क्षणी, पास्टर च्या पत्नीने त्यास सौम्यपणे आठवण करून दिली की प्रेम आणि आपुलकी जी ती आता एक तरुण मुलगी अशी त्यास दाखवीत आहे ते काही वर्षानंतर तसेच राहणार नाही. तिने त्यास सल्ला दिला की, त्या क्षणाचा आनंद घे.
पास्टर ने ती सत्यता आणि त्या वाक्याची तीव्रता जाणलीआणि त्याने ताबडतोब त्याचे काम बाजूला ठेवले आणि मुलीबरोबर वेळ घालविला.
मी नेहमीच माझ्या स्वतःला ही आठवण करून देतो की'व्यस्त' राहणे हे "फायदया' समान नाही. केवळ काही कार्य करीत राहणे याचा अर्थ काही प्राप्त केले यासमान नाही. केवळ कार्यरत राहणे हे फलदायकपणा आणत नाही.
क्षण जो तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत घालविण्यास मिळतो तो बहुमुल्य वेळ असतो. तो वाया घालवू नये. कोणास ठाऊक, उदया तो आपल्याला कदाचित मिळणार नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आहात (तुमची पत्नी, तुमचे मुले, तुमचे आई-वडील), सामाजिक माध्यमावर काही बातम्या पाहण्यात व्यस्त राहू नका. ते काही इतर वेळे करिता राहू दया. संशोधन हे दाखविते की मजबूत कुटुंबाचा गुणधर्म हाकी चांगला वेळ त्यांनी कुटुंबात घालविला आहे.
प्रभु येशूला हे ठाऊक होते त्याच्या वधस्तंभावर जाण्याअगोदर की त्याच्या शिष्यांसोबत वेळ घालविणे हे किती महत्वाचे होते. चला आपण आपल्या कुटुंबांच्या सदस्यांकरिता चांगला वेळ खर्च करू या आणि अशा क्षणांचा एकत्र आनंद घेऊ या.
प्रार्थना
स्वर्गातील पित्या,माझ्याकुटुंबांच्या सदस्यांसाठी मी तुझे आभार मानतो. त्यांना तुझ्या डोळ्याचे बुबुळ असे सांभाळ. मला कृपा पुरीव की माझ्या कुटुंबांच्या सदस्यांसोबत चांगला वेळ खर्च करावा. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विसरण्याचा धोका● ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणे
● देवाच्या कृपेवरून सामर्थ्य मिळविणे
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● बदलण्याची वेळ
● पित्याचे हृदय प्रकट केले गेले
टिप्पण्या