जेव्हा दुष्टात्मा तुमच्या जीवनात मजबूत पकड घेतो, तेव्हा तो सतत पाप करण्याच्या दबावास वाढवतो, ते मग बाह्यदृष्टयापेक्षा तुमच्या आतूनच तुमच्यावर मोहाचा अनुभव आणू लागतो. मोहाचे हे आंतरिकीकरण प्रतिकार करण्यास अधिक कठीण असे करते कारण पाप सतत वाढत जाते आणि अधर्म निर्माण करते. वासनेसारखे, अधर्म अधिक पापाची मागणी करते, आणि शेवटी ते एक भयंकर शत्रू होते, तुमच्या आतच "गल्ल्याथ".
"१४तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भूलवला जातो तेव्हा मोहात पडतो; १५मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजवते." (याकोब १:१४-१५)
भुताटकीच्या आत्म्याचा प्रभाव हा लक्षणीयरित्या अधिक शक्तिशाली असतो, जेव्हा तो तुमच्या आतमध्ये निवास करतो, आणि सुटका प्राप्त करण्यास कठीण असे करतो. तथापि, हे स्मरण ठेवणे महत्वाचे आहे की सुटका ही शक्य आहे.
जेव्हा एखादया व्यक्तीने त्याच्या जीवनात एखादया विशेष भागामध्ये वारंवार पाप केले आहे, तेव्हा असे दिसते की भुते ही त्या व्यक्तीच्या कमकुवत क्षणांचा फायदा घेत असतात की प्रवेश करावा आणि त्या विशेष पैलूवर नियंत्रण मिळवावे. काही उदाहरणांमध्ये, एकच, निर्णायक पाप हे भुतांच्या प्रवेशासाठी द्वार उघडू शकते. हे यहूदा इस्कर्योत द्वारे ठळकपणे स्पष्ट आहे, ज्याने प्रभु येशूचा विश्वासघात करण्याचा निर्णय केल्यावर, सैतानाने त्याच्यात प्रवेश केला.
"२तेव्हा मुख्य याजक व शास्त्री हे त्याचा घात कसा करावा ह्याविषयी विचार करत होते; कारण त्यांना लोकांची भीति वाटत होती. ३तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा, ज्याला इस्कर्योत म्हणत, त्याच्यात सैतान शिरला. ४तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून दयावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले. ५तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला." (लूक २२:२-५)
बायबलमधील यहूदाच्या नशिबाचे वृत्त याचे कठोर स्मरण करविते की पापाशी खेळणे, मग ते निष्काळजीपणे किंवा सवयीने असो, त्यास गंभीर परिणाम प्राप्त होऊ शकतात, ज्याने आपली भौतिक जीवने आणि सार्वकालिक तारण दोन्हींसाठी जबरदस्त किमत मोजावी लागू शकते. (मत्तय २७:१-५ पाहा)
प्रवेशाची ठिकाणे, जी सवय झालेल्या पापामुळे भूतांना उघडले आहे ते बंद करण्यासाठी, अनेक पाऊले उचलली पाहिजेत:
१. देवासमोर स्वतःला नम्र करा:
देवाचे साहाय्य व कृपेसाठी तुमच्या गरजेस ओळखा, आणि तुमच्या स्वतःहून पापावर वर्चस्व मिळविण्यास असमर्थ आहोत हे स्वीकारणे. याकोब ४:६ मध्ये, बायबल शिकविते की "देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो." आपल्या स्वतःला नम्र करण्याद्वारे, आपण आपल्या स्वतःला त्या अवस्थेमध्ये आणतो की शत्रूच्या शक्तीवर वर्चस्व करण्यासाठी देवाचे साहाय्य प्राप्त करावे. येशूने त्याच्या शिष्यांचे पाय धुण्याद्वारे नम्रता दर्शविली, हे दाखवीत की देवाचा पुत्र देखील सेवकाची भूमिका पार पाडू शकतो. (योहान १३:१-१७)
२. पश्चाताप करा:
पापापासून वळणे आणि तुमची वागणूक बदलण्यासाठी विचारपूर्वक निर्णय करा. प्रेषित ३:१९ आपल्याला प्रोत्साहन देते, "तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चाताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळ यावेत." उधळ्या पुत्राची कथा ही पश्चातापाची आणि पित्याचे मुक्त करणारे प्रेम याचे एक शक्तिशाली उदाहरण आहे. (लूक १५:११-३२)
३. पापाची कबुली करा व ते सोडून दया:
तुमच्या पापाचा स्वीकार करा आणि उघडपणे त्याचा नकार करा, आणि कोणत्याही पापी पद्धती आणि वागणुकीशी संबंध तोडून टाका. १ योहान १:९ आश्वासन देते, " जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील." स्तोत्र ५१ मधील दावीद राजाचे उदाहरण पापकबुली आणि देवासमोर पापाचा नकार करण्याच्या महत्वाला दर्शविते.
४. देवाच्या क्षमेची याचना करा:
देवाची दया व शुद्धतेचा धावा करा, त्याच्या आश्वासनामध्ये भरवसा करीत की जे त्याजकडे पश्चातापी हृदयाने येतात त्यांना क्षमा करावी. यशया १:१८ मध्ये, परमेश्वर म्हणतो, "तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील." त्याचप्रमाणे, क्षमा न करणाऱ्या सेवकाचा दाखला (मत्तय १८:२१-२५) आपल्याला क्षमा मागणे व देण्याच्या महत्त्वाविषयी स्मरण देतो.
५. येशूच्या नावाने दुष्टात्म्याचा नकार करा व त्यास धमकावा:
ख्रिस्तामधील एक विश्वासू या नात्याने तुमचा अधिकार दाखवा आणि सैतानी शक्तीला तुमच्या जीवनातून निघण्यास सांगा. लूक १०:१९ स्पष्ट करते, "पाहा, मी तुम्हाला साप आणि विंचू ह्यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही." येशू त्याच्या पृथ्वीवरील सेवाकार्यादरम्यान भूतांना काढत आहे (उदाहरणार्थ,, मार्क १:२३-२७) हे सामर्थ्याला दर्शविते जे आपल्याला त्याच्या नावात आहे.
६. देवाला मागा की तुम्हांला त्याच्या पवित्र आत्म्याने पुन्हा भरावे:
पवित्र आत्म्याच्या उपस्थितीला आमंत्रित करा की तुम्हांला नव्याने भरावे, तुम्हांला समर्थ करावे की आज्ञाधारकपणात आणि आध्यात्मिक विजयात चालावे. इफिस ५:१८ आपल्याला प्रोत्साहन देते की, "आत्म्याने परिपूर्ण व्हा." त्याप्रमाणे, प्रेषित २:१-४ मधील पेंटेकॉस्टची कथा विश्वासणाऱ्यांच्या जीवनात पवित्र आत्म्याच्या परिवर्तनीय सामर्थ्याचे उदाहरण देते.
७. उपास करण्याचा विचार करा:
उपास करणे, जर शक्य असेल, तर ते सुटका करण्याच्या तुमच्या प्रयत्नास प्रभावीपणे वाढवू शकते, कारण ते समर्पणाचे सखोल समर्पण आणि देवाच्या सामर्थ्यावर विसंबून राहण्यास दर्शविते. मत्तय १७:२१ मध्ये, येशूने म्हटले, "तरीपण प्रार्थना व उपास ह्यांवाचून असल्या जातीचे भूत निघत नाही." सुटकेसाठी उपास करण्याची एस्तेर व यहूद्यांची कथा (एस्तेर ४:१५-१७) आध्यात्मिक युद्धावर वर्चस्व करण्याचे सामर्थ्य प्रकट करते.
ह्या पावलांचे अनुसरण करण्याद्वारे, तुम्ही कार्यशील काम करू शकता की प्रवेशाची ठिकाणे बंद करावीत ज्यांनी भूतांना तुमच्या जीवनात सवयीच्या पापामुळे येऊ दिले. असे करण्याने, तुम्ही केवळ व्यक्तिगत सुटकेचा अनुभव करणार नाही परंतु देवाबरोबरच्या तुमच्या संबंधामध्ये देखील वाढू शकता आणि तुमच्या आध्यात्मिक पायाला मजबूत करू शकता.
प्रभु येशू ख्रिस्त आला की आपल्याला स्वतंत्र करावे, परंतु आपल्याला सत्य किंवा प्रत्येक समस्याचे मूळ, माहीत असले पाहिजे जेणेकरून ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे सामर्थ्य त्यास लागू करावे.
"३१ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, "तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात; ३२तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील." (योहान ८:३१-३२)
प्रार्थना
1.पित्या, मी माझे हृदय व मन तुझ्या अधीन करतो, आणि तुला विनंती करतो की तू माझे विचार नवीन कर आणि माझ्या चारित्र्यास परिवर्तीत कर. जेव्हा मी माझ्या स्वतःला तुझ्या इछेच्या अधीन करतो, मला समर्थ कर की या वाईट सवयींच्या विळख्यातून मुक्त व्हावे आणि ते जीवन जगावे जे तुझ्या नावाला आदर आणते. येशूच्या नावाने.
2.सर्वशक्तिमान परमेश्वरा, मी तुझा पवित्र आत्मा मागतो की मला ज्ञान व पारखसह भरून टाकावे, मला समर्थ करावे की माझ्या शत्रूने टाकलेले जाळे ओळखावे आणि ते टाळावे. मला तुझ्या आवश्यक आध्यात्मिक शस्त्रांनी सज्ज कर की प्रत्येक हल्ला व मोहाच्या विरोधात ठामपणे उभे राहावे. येशूच्या नावाने.
3.पित्या, मी सहकारी विश्वासणाऱ्यांकडून साहाय्य व प्रोत्साहनासाठी प्रार्थना करतो जेव्हा मी या वाईट सवयींवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करतो. मला प्रेमळ समाजाद्वारे घेरून ठेव जे मला जबाबदार धरतील आणि माझ्यासाठी प्रार्थना करतील. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस ०५● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● ख्रिस्ता समान होणे
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-२
● एक मुख्य किल्ली
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-१
● परमेश्वर पुरवठा करेल
टिप्पण्या