सर्व रक्षणीयवस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. (नीतिसूत्रे ४:२३)
लक्षात घ्या हे असे म्हणत नाही की कोणीतरी दुसरे तुमच्या अंत:करणाचे रक्षण करील. ते असे म्हणत नाही परमेश्वर तुमच्या अंत:करणाचे रक्षण करील, तुमचे शेजारी तुमच्या अंत:करणाचे रक्षण करितील किंवा तुमचे पास्टर तुमच्या अंत:करणाचे रक्षण करील. ते म्हणते तुम्हांला तुमच्या अंत:करणाचे रक्षण करण्याची गरज आहे.
मला माहीत आहे की जग म्हणते तुमच्या अंत:करणावर विश्वास ठेवावा. तुमच्या अंत:करणानुसार चाला. तुमच्या अंत:करणाचे ऐका. परंतु पवित्र शास्त्र हे म्हणत नाही की तुमच्या अंत:करणा नुसार चाला; त्याऐवजी ते म्हणते तुमच्या अंत:करणाला उपदेश दया. त्यास शिकीव की त्याने कशाच्या मागे जावे.
हे तुम्ही कसे कराल?
नीतिसूत्रे ४ मधील इतर भाग आपल्याला चार गोष्टी देतो की त्यावर विचार करावा:
१. तुम्ही काय बोलता त्याविषयी सावधान राहा. नीतिसूत्रे
४:२४: "तूं उद्धामपणाचे भाषण करण्याचे सोडून दे, कुटील वाणीपासून फार दूर राहा." जे तुम्ही बोलता ते तुमच्या अंत:करणाला चालना देईल.
२. तुम्ही कशाकडे पाहता त्याविषयी सावधान राहा. नीतिसूत्रे ४:२५: "तुझे डोळे नीट पुढे पाहोत. तुझ्या पापण्या तुझ्यापुढे सरळ राहोत." तुम्ही काय (किंवा कोणाला)पाहत आहात?ख्रिस्त ज्यासाठी मरण पावला त्या गोष्टींविषयीआपण फार क्वचितच मनोरंजनकरून घेतो.
३. तुम्ही कोठे जाता त्याविषयी सावधान राहा. नीतिसूत्रे ४:२६: "आपल्या पायांची वाट सपाट कर; तुझे सर्व मार्ग निश्चित असोत." नेहमीच, तुमच्या अंत:करणाचे रक्षण करणे-आणि तुम्ही काय बोलता आणि कोठे पाहता त्याविषयी बदल करणे-यासाठी बदल आवश्यक आहे जेथे तुम्ही वेळ घालविता आणि कोणाबरोबर तुम्ही वेळ घालविता. कोणीतरी म्हटले आहे, तुम्ही कुटुंबाची निवड करू शकला नाही जेथे तुमचा जन्म झाला परंतु तुम्ही निश्चितच तुमचे मित्र निवडू शकता. निवड ही तुमची आहे.
४. जर काहीतरी वाईट दिसते, तर त्यापासून दूर राहा. नीतिसूत्रे ४:२७: "तूं डावीउजवीकडे वळू नको; दुष्कर्मातून आपले पाऊल काढ." आता, काहीतरीचांगले किंवा तटस्थ हे वाईट होऊ शकते जेव्हा ते आपल्या जीवनात देवा पेक्षाअधिक महत्वाचे होते. एक चांगला खेळ पाहणे; यामध्ये काहीही चूक नाही जोपर्यंत ते इतके महत्वाचे होत ठरत नाही की तुमचा आवडता संघ हारत आहे ते तुम्हाला संपूर्ण आठवडाभर क्रोधी किंवा निराश असे करते.
५. प्रभु येशूने त्यांना एक दाखला हे म्हणत सांगितला, "पुरुषांनी सतत प्रार्थना केली पाहिजे, आणि धैर्य सोडू नये" (लूक १८:१). प्रार्थना ही तुम्हांला समर्थ करील आणि तुम्हाला धैर्य सोडून देण्यापासून राखेल. हे कसे घडते?
जेव्हा आपण प्रार्थना करतो, देवाचीशांति जीसर्व समजेच्या पलीकडे आहे तीतुमचे अंत:करण व मनाचे ख्रिस्त येशू द्वारे रक्षणकरील. हीशांति तेव्हाच येते जेव्हा आपण देवासमोर येतो आणि आपल्या विनंत्या त्यास सादर करतो.
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, मी एक गोष्टीचा एकव्यक्ति असे जगण्यास स्वतःला समर्पित करतो. जसे बेथानी येथील मरीये ने केले तसे तुझ्या चरणाजवळ बसण्यास मला साहाय्य कर. मला कृपा पुरीव कीज्या सर्व गोष्टी मी आज शिकल्या आहेत ते सर्व आचरणात आणाव्या. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
हे परमेश्वरा, असे होवो की तुझा आत्मा माझ्या कुटुंबाच्या प्रत्येक सदस्यांनाअपराधी आहोत असे दाखवो कीज्यांनी अजून तारण हे प्राप्त केलेले नाही आणि त्यांना कृपापुरीव की त्यांनी तुझ्या तारणाचे दान स्वीकारावे.
हे परमेश्वरा, असे होवो कीतुझा चांगुलपणा माझ्या कुटुंबियांना पश्चाताप करण्यास व प्रभु येशूला त्यांचा प्रभु व तारणारा असे स्वीकारण्याकडे न्यावे.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
अवज्ञेचेप्रत्येकशारीरिक कार्ये जे माझ्या जीवनात उजाडपणास वाढवीत आहे ते आज येशूच्या नांवात रद्द केले जावो.
पित्या, येशूच्या नांवात,असे होवो की तुझा आत्मा प्रत्येक पास्टर, गट पर्यवेक्षक व केएसएम चर्च चे जे-१२ पुढारी यांच्यावर येवो. आध्यात्मिकदृष्टया वाढ होण्यास व तुझी सेवा करण्यास त्यांना प्रेरणा दे.
देश
पित्या, येशूच्या नांवात,आमच्या देशाच्या विरोधातील दुष्टांच्या प्रत्येक वाईट कल्पनाह्या नष्ट होवोत आणि ज्याचा परिणाम आमच्या देशाचा विकास व प्रगती मध्येहोवो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ३७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● शोधण्याची आणि सापडण्याची कथा
● स्तुति ही जेथे परमेश्वर वास करतो
● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या