बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगते की एक ख्रिस्ती म्हणून आपण देवाच्या वचना बाबत तडजोड करू नये.
"जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करितात ते धन्य. ते काही अनीतीचे आचरण करीत नाहीत; तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझेविधी आम्ही मन:पूर्वक पाळावे म्हणून तूं ते आम्हांस लावून दिले आहेत." (स्तोत्र ११९:१-४)
शलमोन हा एक महान राजा होता ज्याने पृथ्वीवर राज्य केले परंतु त्याच्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या तडजोडीने त्याचा शेवट विनाश मध्ये केला.
अनुवाद १७:१६-१७ मध्ये राजाला देवाचा स्पष्टपणे आदेश होता,
मात्र त्याने फार घोडे बाळगू नयेत; घोडदळ वाढविण्यासाठी लोकांना मिसर देशाकडे पुन्हा धाव घेण्यास लावू नये, कारण त्या मार्गाने जाऊन नये असे परमेश्वराने तुम्हांला सांगितलेच आहे. राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जावयाचे; तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठां करू नये.
परमेश्वराला हे नाही पाहिजे होते की इस्राएल च्या राजांनी प्रत्यक्षात दिसणारे घोडे व रथांवर अवलंबून राहू नये.
परमेश्वराला पाहिजे होते की त्याच्या लोकांनी केवळ त्याच्यावर अवलंबून राहावे.
शलमोन ह्याबाबतीत पूर्णपणे जाणून होता, कारण त्याने नीतिसूत्रे २१:३१ मध्ये लिहिले होते, "लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करितात, पण यश देणे परमेश्वराकडे असते." घोडे मागविण्याचा विषय हा शलमोन साठी एक शुल्लक गोष्ट दिसत होती, परंतु ती परमेश्वरासाठी महत्वाची होती. ह्या बाबतीत त्याच्या तडजोडीने देवापासून हळूहळू दूर होण्यास त्याची सुरुवात केली.
तडजोडीचा पुढील भाग हा त्याने अनेक बायका केल्या
शलमोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी व हित्ती राष्ट्रांतल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला; व त्यांतल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. ह्या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्राएल लोकांस सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवाकडे वळवितील. त्याच्या सातशे राण्या व तीनशे उपपत्नी होत्या; त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकविले. (१ राजे ११:१-३)
शलमोन कडे त्याचे कारण असेन की विदेशी स्त्रियांबरोबर विवाह करून कसे राजकीय स्थिरता आणावी वगैरे, परंतु ह्या त्याच स्त्रिया होत्या ज्यांनी त्यास जिवंत परमेश्वरापासून दूर केले.
सैतान हा नेहमीच आपल्याला लहान गोष्टींमध्येनिष्काळजी करण्याद्वारे तो त्याचा मोठा प्रवेश करतो आणि हळूहळू आपल्याला पटवून देतो कीमहत्वाच्या विषयांमध्ये सुद्धा तसेच करीत जावे.
जरतो त्याचा पाय केवळ दरवाज्याजवळ स्थिर करू शकला, तर त्यास वाटते की त्याने विजय मिळविला आहे आणि मग आपल्याला देवापासून दूर करू शकतो. प्रेषित पौल, तथापि, आपल्यालाउपदेश देतो, ".....सैतानाला वाव देऊ नका. (इफिस४:२७)
ह्या वचनावर मनन करा
थोडेसे खमीर सगळा गोळा फुगविते. (गलती ५:९)
द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या खोकडांस, त्या लहान कोल्यांस आम्हांसाठी धरा, कारण आमचे द्राक्षीचे मळे फुलले आहेत. (गीतरत्ने २: १५)
वचनाच्या संबंधात तुमच्या जीवनाच्या कोणत्या भागाशी तुम्ही तडजोड केली आहे? ते खाली लिहा. पश्चाताप करा व त्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्याची कृपा मागा.
प्रार्थना
१. आज उपासाचा २२वा दिवस आहे. आता अनेकांना ठाऊक आहे, की आपण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रत्येक आठवडयात (मंगळावर, गुरुवार व शनिवारी) उपास करीत आहोत. ह्या उपास करण्यास ५ महत्वाचे उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
येशूच्या नांवात, माझे जीवन व माझ्या विचारांवर मी तडजोडीच्या आत्म्याला बांधीत आहे.
शरीराची वासना, डोळ्याची वासना व जीवनाचा गर्व जो मला धरून आहे त्यास मी आज तोडीत आहे (१ योहान २:१६). मी चांगल्याप्रकारे शेवटकरेन, येशू ख्रिस्ताच्या नांवात.
कुटुंबाचे तारण
पित्या, तारणाच्या कृपे साठी मी तुझा धन्यवाद करतो, आमच्या पापांसाठी मरण्यास तुझ्या पुत्राला पाठविले म्हणून हे पित्या तुझा धन्यवाद. पित्या, येशूच्या नांवात, तुझ्या ज्ञाना मध्ये प्रकटीकरण दे (तुमच्या प्रियजनांच्या नावाचा उल्लेख करा). प्रभु व तारणारा असे तुला ओळखण्यासाठी त्यांचे डोळे उघड.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या, येशूच्या नांवात, माझ्या पाचारणास पूर्ण करण्यासाठी मी तुझ्या आर्थिक नवीन वाटचाली साठी मागत आहे. तूं एक महान पुनर्स्थापित करणारा आहे.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, सर्व पास्टर, गट पर्यवेक्षक व केएसएम चर्च चे जे-१२ पुढारी यांना तुझे वचन व प्रार्थने मध्ये वाढू दे. तसेच प्रत्येक व्यक्ति जो केएसएम शी जुडलेला आहे तो वचन व प्रार्थने मध्ये वाढो. येशूच्या नांवात.
देश
पित्या, येशूच्या नांवात, आम्ही आमच्या देशाच्या सीमेवर शांतीसाठी प्रार्थना करतो. आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात शांती व महान प्रगती व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. प्रत्येक सामर्थ्याला जे आमच्या देशात तुझ्या शुभवर्तमानाला अडथळे करते त्यास नष्ट कर. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आदर्श होऊन पुढारीपण करा● परमेश्वराचा आनंद
● दानधर्म करण्याची कृपा-२
● गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही
● याबेस ची प्रार्थना
● जीवनाचे पुस्तक
● तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
टिप्पण्या