हे परमेश्वरा, तूं मला कोठवर विसरणार? सर्व काळ काय? तूं माझ्यापासून आपले मुख कोठवर लपविणार?
मी कोठवर आपल्या मनात बेत योजीत राहावे आणि दिवसभर हृदयांत दु:ख वागवावे? कोठवर माझा शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? (स्तोत्र १३:१-२)
केवळ ह्या दोन वचनात चार वेळा दावीदाने परमेश्वराला प्रश्न विचारला, "कोठवर?"
काही वर्षापूर्वी, जेव्हा मी व माझी पत्नी सेवाकार्यासाठी रस्त्यावरून प्रवास करीत असे, ती नेहमी विचारत असे, "हा प्रवास किती लांबचा आहे?" जरी दहा मिनिटे होऊन गेली तरी ती पुन्हा विचारीत असे, "आपण केव्हा पोहोचणार? का इतका वेळ लागत आहे?" मी हे कबूल करतो, मी तिला खरे दृश्य सांगत नसे. वाट पाहणे हे कधीकधी असे दिसू शकते की परमेश्वर आपल्याला विसरला आहे
वाट पाहणे हे कधीकधी असे दिसू शकते की परमेश्वर आता आपली काळजी करीत नाही व त्याने आपले मुख आपल्यापासून लपविले आहे.
वाट पाहणे हे निराशा सुद्धा आणू शकते. दावीद ह्या वाट पाहण्याच्या प्रक्रीये मधून गेला आणि शेवटी धावा केला, 'कोठवर?'. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे धावा करीत असाल, "कोठवर, परमेश्वरा?"
प्रेषित पेत्र आपल्याला सांगतो की, "कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभु आपल्या वचनाविषयी करीत नाही" (२ पेत्र ३:९). काही क्षणी, आपल्यापैकी अनेक जण हे "काही" गटात सामील झाले आहेत. आपण नेहमी परमेश्वराला म्हणतो, "का इतका उशीर होत आहे? उत्तर देण्यास तू इतका वेळ का घेत आहेस?" प्रामाणिकपणे, मी सुद्धा कधी काळी हा प्रश्न विचारला आहे.
मला तुम्हांला दोन अद्भुत आश्वासने सांगू दया जे आपल्याला आपल्या जीवन-प्रवासात साहाय्य करतील.
हे देवा, तुझी आशा धरून राहणाऱ्यांचे इष्ट काम करणारा असा तुझ्याशिवाय दुसरा कोणी प्राचीन काळापासून ऐकण्यात आलेला नाही, त्याचे नांव आलेले नाही, कोणी तो डोळ्यांनी पाहिला नाही. (यशया ६४:४)
लक्षात घ्या, वचन काय म्हणते, "परमेश्वर त्यांच्यासाठी कार्य करतो जे त्याची वाट पाहतात."
आज, परमेश्वराला सांगा हे म्हणत, "परमेश्वरा, मी हा विषय तुझ्या हातात समर्पित करीत आहे आणि मी वाट पाहत आहे व भरवंसा करीत आहे तू हे सोडीव." प्रतिदिवशी त्यांस हे आश्वासन स्मरण देत राहा. परमेश्वर विश्वसनीय आहे, आणि तो निश्चितच तुमच्या वतीने कार्य करील.
तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलांस विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. (यशया ४०:२९-३१)
दुसरे, परमेश्वरावर प्रार्थने मध्ये वाट पाहणे हे तुमच्या जीवनावर वेग व गती चा अभिषेक आणेल. तुम्ही कदाचित आश्चर्य करीत असाल की वेग व गतीचा हा अभिषेक काय आहे. जेव्हा देवाचा हात संदेष्टा एलीयावर आला, तो अहाबाच्या रथाच्या पुढे पळत गेला (१ राजे १८:४६). जे पूर्ण करण्यास तुम्हाला वर्षे लागली असतील त्यास केवळ काही दिवस लागतील. ते प्राप्त करा.
जेव्हा इस्राएली लोकांनी मिसर सोडला व त्यास आश्वासित देशाकडे प्रवास करावयाचा होता, सामान्यपणे तो ११ दिवसांचा प्रवास होता, परंतु इस्राएली लोकांना त्यासाठी ४० वर्षे लागली. विषय हा होता की इस्राएली लोक आश्वासित देशामध्ये प्रवेश करण्यापूर्वी वाट पाहण्याच्या वेळा दरम्यान परमेश्वर जे काही त्यांस शिकवू इच्छित होता त्या गोष्टी ते शिकत नव्हते.
अनेक लोकांबरोबर नेहमी असेच घडते. ते त्यांच्या वाट पाहण्याच्या वेळे दरम्यान परमेश्वर जे काही त्यांना शिकवीत आहे त्या गोष्टी ते खरेच शिकत नाहीत. आणि ह्याकारणामुळे, ते त्याच पर्वताभोवती पुन्हा पुन्हा जात राहतात. पाहा, परमेश्वराने, इस्राएली लोकांना काय म्हटले, "तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिला आहा" (अनुवाद २:३).
जेव्हा तुम्ही केवळ एक ऐकणारे नाहीत परंतु त्या गोष्टी आचरणात आणाल जे परमेश्वर तुम्हाला शिकवीत आहे, तुमच्या पुढच्या स्तरा चे आश्वासन दिले आहे.
प्रार्थना
१. आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच, ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा देखील या प्रार्थना मुद्द्यांचा उपयोग करा.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
सर्वशक्तिमान पित्या, जे तुझ्यासाठी वाट पाहतात त्यांच्यासाठी तू खात्रीने कार्य करतो. मी तुझे आभार मानतो की जेव्हा मी प्रतिदिवशी तुझ्या उपस्थितीत वाट पाहतो, माझी शक्ती नवीन होते. मी गरुडासारख्या पंखांनी उंचावर उडेन. मी धावेन आणि मी थकणार नाही; मी चालेन पण दमणार नाही.
मी कबूल करतो की मी केवळ ऐकणारा नाही पण तुझ्या वचनाचे पालन करणारा आहे.
मी पुढच्या पातळीवर जाईन. येशूच्या नावाने. आमेन.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, तुझे वचन म्हणते की, "कारण ईश्वरप्रेरित दु:ख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दु:ख मरणास कारणीभूत होते" (२ करिंथ ७:१०). फक्त तूच आमचे डोळे या सत्यासाठी उघडू शकतो की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना ईश्वरप्रेरित दु:खाच्या भावनेसह तुझ्या आत्म्याचा स्पर्श कर की त्यांनी पश्चाताप करावा, तुला शरण यावे आणि त्यांचे तारण व्हावे. येशूच्या नावाने.
आर्थिक प्रगती
पित्या, येशूच्या नावाने मला लाभहीन श्रम आणि भ्रमित कार्यांपासून मुक्त कर.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की थेट प्रक्षेपण देशभरातील हजारो कुटुंबांपर्यंत पोहचावे. तुला प्रभू आणि तारणारा म्हणून ओळखण्यासाठी त्यांना आकर्षित कर. जुळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वचन, उपासना आणि प्रार्थनेमध्ये वाढीव.
राष्ट्र
पित्या, येशूच्या नावाने, आपल्या राष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने कार्यरत होण्यासाठी मी प्रार्थना करतो, ज्यामुळे चर्चची सतत वाढ व विस्तार होईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शांति- देवाचे गुप्त शस्त्र● धार्मिकतेचे वस्त्र
● बुद्धिमान व्हा
● दानीएलाचा उपास
● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● खोटे बोलणे सोडणे आणि सत्य स्वीकारणे
● चमत्कारीक कार्य करणे: मुख्य बाब #२
टिप्पण्या