"तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; परंतु जर मिठाचा खारटपणाच गेला तर मग ते कशाने रुचकर केले जाईल? पुढे ते बाहेर फेकलेजाऊन माणसांच्या पायांखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहा; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरांतल्या सर्वांना प्रकाश देतो; त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू दया की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. (मत्तय ५: १३-१६)
पुढारी कोण आहे?
एक पुढारी हा तो व्यक्ति नाही की जो पद घेऊन आहे. एक खरा पुढारी हा तो व्यक्ति आहे जो इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकतो. एक खरा पुढारी हा तो आहे जो इतरांच्या जीवनात फरक आणतो. ह्या समजेनुसार, घरकाम करणारी पत्नी, विद्यार्थी वगैरे हे एक पुढारी आहेत. तुमच्या सभोवतालच्या व्यक्तींवर सकारात्मक प्रभाव टाकणे हे तुम्हाला पुढारी म्हणण्यास योग्य ठरविते.
तुमच्या जीवनाच्या प्रतीदिवशी इतरांवरसकारात्मक प्रभाव टाकण्याच्या तुमच्या सामर्थ्याला कमी लेखू नका. मग याची खरेच काही गरज नसते की तुम्हाला पद आहे किंवा नाही. खरे पुढारपण हे लोकांची सेवा करण्याविषयी आहे, म्हणजे परमेश्वराच्या नावाचे गौरव व्हावे.
एक पुढारी म्हणून, जर तुम्हाला अनेकांवर सकारात्मक प्रभाव टाकायचाआहे, तर मग हे महत्वाचे आहे की तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये उत्कृष्टतेची सवय विकसितकेली पाहिजे.
मग तुम्ही इतरांवर प्रभाव टाकू शकता की तसेच इतरांबरोबर करावे. हे तुम्हाला तुमच्या पुढारीपणाच्या स्तरात तुम्ही कधी कल्पनाही केले नसेल तितक्या जलद वाढवेल.
उत्कृष्टता ही संसर्गजन्य आहे. जे-१२ चे उत्कृष्ट पुढारी, एक उत्कृष्ट आई-वडील, एक उत्कृष्ट जोडीदार किंवा विद्यार्थी होण्यास समर्पित होण्याद्वारे, तुम्ही केवळ तुमच्या प्रीयजनांवरच सकारात्मक प्रभाव टाकत नाही परंतु तुम्ही देवाच्या राज्यासाठी मग एक उत्कृष्ट बातमी असे होता. तुम्ही तुमच्या सभोवतालच्या सर्वांना मीठ आणि प्रकाश असे होता. मीठ आणि प्रकाश ह्या दोघांमध्ये ही वैशिष्ट्ये आहेत जेत्यांच्या सभोवतालच्या वस्तूंवर प्रभाव टाकते. मीठ हे वापरले जाते की चव ही वाढवावी.
प्रकाश हा अवगत होणे, ज्ञान व समज चे प्रतीक असे आहे.
उत्कृष्टताही काही अचानक घटना नाही. दुसऱ्या शब्दात, हे केवळ एका दिवसात घडत नाही. ती एक सवय आहे, जिला तुमच्या रोजच्या दिवसात हेतुपरस्पर केली पाहिजे. उत्कृष्टता ही सतत-घडणारी प्रक्रिया आहे जिचा पुरस्कार जीवनात संपन्नता आहे.
व्यवहारिक दृष्टीकोनात म्हटल्यास,उत्कृष्टता जोपासणे याचा अर्थ तुमची कार्ये वेळेत करणे, नियमित, नियमित स्वरुपात कार्य करणे किंवा नियमितपणे दररोज प्रार्थनेत वेळ घालविणे आणि इतर.
कधी कधी तुम्ही काही निश्चित गोष्टी करण्यात चुकाल परंतु त्याने तुम्हाला निराश करू देऊ नका, पुन्हा प्रयत्न करा! निराशा काढून टाका आणि पुढे जात राहा. कोणीतरी म्हटले आहे, "सत्य हे सामर्थ्यशाली आहे जेव्हा त्यावर चर्चा केली जाते परंतु ती अधिक सामर्थ्यशाली आहे जेव्हा ते प्रदर्शित केले जाते," जेव्हा तुम्ही उत्कृष्टते मध्ये चालता, तुम्ही सत्य प्रदर्शित करीत असता.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
प्रिय पित्या, माझ्या आत्म्या मध्ये तुझे जीवन आणि स्वभाव, आणि जीवनाची उत्कृष्टता जी मला ख्रिस्त येशू मध्ये आहे यासाठी मी तुझा धन्यवाद करतो. मी विजयी आणि कायमचा अजिंक्य असा आहे. मी कायमचा यशस्वी आहे, येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
पित्या तुझी दया प्रदिवशी नवीन आहे यासाठी तुझा धन्यवाद. खरोखर आमच्या आयुष्याच्या सर्व दिवस माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर तुझा चांगुलपणा व तुझी दया सतत राहिल आणि मी परमेश्वराच्या उपस्थितीत सतत निवास करेन. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मला माझ्या प्रभु येशूची कृपा ठाऊक आहे; तो धनवान असता माझ्याकरिता दरिद्री झाला; अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने मी आणि माझ्या कुटुंबाचे सदस्ये त्याच्या राज्याकरिता धनवान व्हावीत. (२ करिंथ ८:९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, व त्यांच्या संघातील सर्व सदस्ये चांगल्या स्वास्थ्य मध्ये राहावीत. असे होवो की तुझी शांति त्यांच्या जीवनात व त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाला घेरून राहो. असे होवो की करुणा सदन सेवाकार्ये प्रत्येक भागामध्ये वाढत जावो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे खरे मूल्य शोधा● दार बंद करा
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● विश्वासाचे बरे करणारे सामर्थ्य
● सुदृढ मन हे एक दान आहे
● येशू खरेच तरवार आणण्यासाठी आला होता काय?
● शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते
टिप्पण्या