परमेश्वर म्हणतो, "मीच एफ्राइमास चालावयास शिकविले, मी त्यांस आपल्या कवेत वागविले आणि मी त्यांस बरे केले, पण ते त्यांस ठाऊक नाही." (होशेय ११:३)
जीवनातील सखोल बदलासाठी एक सर्वात महत्वाचा घटक हा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने चालण्यास (जगण्यास) शिकणे हे आहे. मानव म्हणून ह्या जगात आपण कसे जगावे हे जसे आपल्याला शिकावे लागते, तसेच देवाच्या जगतात एक आध्यात्मिक सत्व म्हणून जगण्यास आपण शिकले पाहिजे. आपण जसे शारीरिकदृष्टया चालण्यास शिकलो तसेच आपण आध्यात्मिकदृष्टया चालण्यास शिकले पाहिजे. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला शारीरिकदृष्टया कसे चालावे हे शिकविले, त्याप्रमाणेच देवाचा आत्मा आपल्याला आध्यात्मिकदृष्टया कसे चालावे हे शिकवितो.
जर आपल्याला तशा प्रकारे चालावयाचे आहे की सर्व बाबतीत देवाला प्रसन्न करावे, तर आपण त्याच्यामधील वाढत्या ज्ञाना मध्ये चालले पाहिजे. प्रेषित पौलाने मंडळीच्या सभासदांसाठी प्रार्थना केली. "ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुम्हांसाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धि ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे; अशा हेतूने की, तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ दयावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धि व्हावी. (कलस्सै १:९-१०)
बायबल ला केवळ तुमच्या विचारांविषयी माहिती देण्यासाठी कार्य करू देऊ नका परंतु तुमचे विचार पुन्हा एकदा व्यवस्थित करावे.
परमेश्वराबरोबर चालण्याचे आणखी एक महत्वाचे गुणधर्म हे शिकविले जाणारे हृदय असणे आहे. त्याच्यामध्ये आपण जे अगोदरच प्राप्त केले आहे त्यास सांभाळण्यास व त्याच्याबरोबर दररोज कार्यरत राहण्यास हे आपल्याला साहाय्य करेल.
परुशी लोकांचे सर्वात मोठे पतन हे की त्यांनी विश्वास ठेवला की परमेश्वरा विषयी जे काही जाणणे आहे ते सर्व त्यांस ठाऊक आहे. ह्याकारणामुळे, ते त्यांच्या आध्यात्मिकते संबंधी त्यांच्या निष्क्रियेतेच्या ठिकाणीच राहिले. प्रभु येशूने म्हटले, "मी तुम्हांस खचित सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यांत मुळीच होणार नाही" (मार्क १०:१५). याचा अर्थ, कोणते स्तर आपण प्राप्त केले आहे, अधिक प्राप्त करण्यासाठी आपण शिकविण्याजोगे असण्याची गरज आहे.
प्रार्थना
पित्या, माझा गर्व व उद्धटपणा क्षमा कर. आत्मा जो शिकेन तो मी तुला मागतो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कोठवर?● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● पेंटेकॉस्ट साठी वाट पाहणे
● बीज चे सामर्थ्य - २
● देवाचा आरसा
● दिवस १४ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● पारख उलट न्याय
टिप्पण्या