तुम्हाला तुमच्या जीवनात किंवा अशांति पसरविणारे ते विषय ज्यात तुमच्या व तुमच्या प्रियजनांच्या जीवनात बदल व्हावा हे पाहिजे काय?
हे असे नाही की तुम्ही प्रार्थना करीत नाहीत परंतु उपाय हा निरंतर एकाग्रतेच्या प्रार्थनेत आहे, जे नेहमीच एक गंभीर बदल आणते. अशा प्रकारची प्रार्थना ही उपास द्वारे जुडलेली असली तर उत्तम होय.
पुढील वचने काळजीपूर्वक वाचा:
तेव्हा पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले, परंतु चर्च (मंडळी)द्वारे देवाकडे त्याच्यासाठी एकाग्रतेने प्रार्थना केली जात होती. (प्रेषित १२:५ ऐम्पलीफाईड)
तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करितात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हांस सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. (लूक१८:६-८)
पुन्हा, लक्षात घ्या, वाक्प्रचार, 'रात्रंदिवस'-ती निरंतर, एकाग्रतेची व कळकळीची प्रार्थना.
अनेक लोकांना पाहिजे असते की त्यांचे पाळक व पुढाऱ्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. त्यात काहीही चूक नाही. तथापि, देवाच्या राज्यात, परमेश्वराला पाहिजे की प्रत्येकाने परिपक्व व्हावे. प्रत्येकाने त्याचे तारण भीत व कांपत प्राप्त केले पाहिजे, फिलिप्पै २:१२. आणि निरंतर एकाग्रतेची प्रार्थना ही तसे करण्याचा एक मार्ग आहे. कोणीतरी म्हटले आहे, "उत्तरीत प्रार्थना ही शक्य आहे, जर तुम्ही आशा सोडून देत नाही."
अनेक लोक त्यांच्या विजयास गमावितात जेव्हा ते केवळ त्या विजयात प्रवेश करणार असतात. मी तुम्हाला प्रोत्साहन देत आहे की तुम्ही तुमच्या प्रकरणात आशा सोडू नये.
कधी कधी तुमच्या नवीन वाटचाली साठी लोकांच्या गटासह प्रार्थना करणे उत्तम असते जसे चर्च ने प्रेषितांच्या पुस्तकात केले. म्हणून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार, म्हणून आम्ही निर्णय घेतला की प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी उपास व प्रार्थना करावी.
मे २८, २०२३ ला, आम्ही मुलुंड, कालिदास हॉल, मुंबई येथे 'पेंटेकॉस्ट संडे' साजरा करणार आहोत. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार, आम्ही निर्णय घेतला आहे की २५ (गुरुवार), २६ (शुक्रवार) आणि २७ (शनिवार) रोजी उपास व प्रार्थना करणार आहोत.
सर्व सव्विस्तर माहिती नोहा अॅपवर उपलब्ध आहे. माझी इच्छा आहे की या दिवशी आपण यात सहभागी व्हावे. माझी अशी देखील इच्छा आहे की आपण मे २८ला पेंटेकॉस्ट उपासनेला हजर राहावे. तुम्ही तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये विपुल प्रगती प्राप्त करणार आहात.
ह्या दिवसांत तुम्ही ००.०० तासापासून ते दुपार १४.०० तासापर्यंत उपास करू शकता. ह्याउपास दरम्यानच्या वेळी, तुम्ही खूप पाणी पिऊ शकता. त्यानंतर तुम्ही तुमचे सामान्य भोजन घेऊ शकता. ते जे परिपक्व आहेत, ते त्यांचा उपास १५.०० तासालाकिंवा त्याच्याही पुढे पर्यंत करू शकता.
प्रार्थना
१.आपण २०२३ वर्षाच्या प्रत्येक आठवड्यात (मंगळावर/गुरुवार/शनिवार) उपास करीत आहोत. या उपासाचे पाच मुख्य उद्देश आहेत
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, माझ्या जीवनातून कुंठीत होण्याच्या प्रत्येक समस्येला उपटून टाक. असे होवो की तुझा आत्मा माझ्या जीवनाच्या प्रत्येकभागातून प्रवाहित होवो आणि तो बदल आणावा जे तुला गौरव आणेल. येशूच्या नांवात. आमेन.
कौटुंबिक तारण
मी माझ्या संपूर्ण अंत:करणाने विश्वास ठेवतो व कबूल करतो, मी व माझे घराणे तर परमेश्वराचीच उपासना करणार. माझ्या येणाऱ्या दोन पिढ्या सुद्धा परमेश्वरचीच उपासना करतील. येशूच्या नांवात.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
हेपित्या, मला आवश्यक व्यवसाय व मानसीक कौशल्याने परिपूर्ण कर की माझ्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक संधीचा भरपूर फायदा घ्यावा.येशूच्या नांवात मलाआशीर्वादकर.
केएसएम चर्च वाढ
पित्या, असे होवो की प्रत्येक व्यक्ति जोकेएसएम चे प्रत्यक्ष प्रसारणपाहत आहे तेविलक्षण चमत्कार प्राप्त करतीलत्यामुळेतेत्या प्रत्येकांना आश्चर्यात टाकेल जे त्याविषयी ऐकतील. असे होवो की ते जे ह्या चमत्कार विषयी ऐकतील ते विश्वास सुद्धा प्राप्त करतील की तुमच्याकडे वळावे व त्यामुळे चमत्कार प्राप्त करावा.
देश
पित्या, येशूच्या नांवात,अंधाराच्या दुष्ट शक्ति द्वारेविनाशाच्या प्रत्येक जाळापासून आमच्या देशाला मुक्त ठेव.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ऐक्य आणि आज्ञाधारकपणाचा दृष्टांत● दिवस २०: ४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● परमेश्वराला प्रथम स्थान देणे # ३
● विश्वासणाऱ्यांचे राजकीय याजकगण
● प्रतिदिवशीज्ञानीहोत कसे वाढावे?
● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
टिप्पण्या