डेली मन्ना
तुमचा विश्वासघात झाला असे अनुभविलेआहे काय?
Wednesday, 24th of May 2023
21
17
996
Categories :
क्षमा
विश्वासघात
कारण ज्याने माझी निंदा केली तो काहीं माझा वैरी नव्हता; असता तर मी ते सहन केलेअसते;
माझ्यापुढे ज्याने तोरा मिरविला तो काही माझा शत्रू नव्हता; असता तर मी त्याच्यापासून लपून राहिलो असतो;
पण तो तूच माझ्या बरोबरीचा माणूस,
माझा सोबती व माझा सलगीचा मित्र होतास.
आपण एकमेकांशी गोडगोड गोष्टी बोलत असू,
देवाच्या घरी मेळ्याबरोबर जात असू. (स्तोत्र ५५:१२-१४)
ही वचने यहूदा इस्कर्योत द्वारे आपल्या प्रभूचा विश्वासघात केल्यासंबंधी मशीहा विषयक भविष्यवाणी आहे.
परंतुहा केवळ यहूदा इस्कर्योतच नाही ज्याने येशूचा विश्वासघात केला आहे. ह्यामध्ये त्याचे शिष्य सुद्धा होते, ते त्यांच्या स्वतःच्या जीवनासाठी भीतीने पळून गेले. पेत्र, जो एक अत्यंत जवळचा त्याने सुद्धा त्याचे येशू शी काही घेणेदेणे नाही असा स्पष्टपणे नकार दिला. येशूने फारच गहन दु:ख सहन केले असेन, यातना, एकाकीपणायाची कल्पना करणे कठीण आहे.
आपल्यापैंकीअनेक जण अशा सारख्याच परिस्थतीतून गेले असाल. कोणीतरी जो अत्यंत जवळचा त्याच्या द्वारे विश्वासघात होणे हे अधिकच दु:खदायक असते. जेव्हा असे घडते, आपल्याला आपले हक्क, आपल्या दृष्टिकोनाचेसमर्थन करण्यास ठाम उभे राहावे असे वाटते. आणि ते प्राप्त करण्यासाठी आपण फारच लढा देतो. कधीकधी, आपण मनातच शांतपणे भग्न झालेलो असतो.
येशू जो आपले सिद्ध उदाहरण त्याद्वारे, आपण एक योग्य आदर्श शिकू शकतो की विश्वासघात कसे हाताळावे.
पुढील हे सिद्धांत आहे येशूच्या शिकवणीवरून की विश्वासघातावर वर्चस्व कसे मिळवावे.
#१ तुमच्या अंत:करणाचे रक्षण करा
"सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे." (नीतिसूत्रे ४:२३)
विश्वासघात केवळ तुमच्या भावनांना दु:खवित नाही,ते सरळ तुमच्या अंत:करणात जाते, तुमच्या सर्व भावनांचे मूळ ठिकाण.
जर तुम्ही विश्वासघातास योग्यपणे प्रत्युत्तर दिले नाही, तुमचे हृदय हे इतर लोकांकडे कठीण होईल व शेवटी परमेश्वराकडे.
विश्वासघाताचे ध्येय हे तुमच्या हृदयाला विषारी करावे आणि तुम्ही त्याविरोधात रक्षण केले पाहिजे.
#२ विश्वासघात करणाऱ्यास क्षमा करा
कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील; परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. (मत्तय ६:१४-१५)
क्षमा करणे हे विश्वासाचे कार्य आहे. जर तुम्ही क्षमा करणार नाही, तर तुम्ही क्षमेचा आनंद घेण्यास समर्थ होणार नाही जे येशूने तुम्हाला मोफतपणे दिले आहे! नवीन करारात शब्द "क्षमा" हे ग्रीक भाषेमध्ये "सोडून देणे" असे आहे. सोडून दया व पुढे जा.
प्रार्थना
१. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरिता प्रार्थना केली पाहिजे.
२. तसेच ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा देखील त्याचा उपयोग करा.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की तुझ्या गौरवी संपन्नतेमधून तूं तुझ्या आत्म्याद्वारे माझ्या अंतर्मनात सामर्थ्यासह मला बलशाली कर, म्हणजे विश्वासाद्वारे ख्रिस्त माझ्या अंत:करणात निवास करो.
पित्या, मी प्रार्थना करतो की मी तुझ्याप्रीति मध्ये मुळावलेला व स्थापित झालेला असावे जे सर्व समजेपलीकडे आहे. येशूच्या नांवात.
पित्या, मी प्रार्थना करतो की देवाच्या संपूर्ण परिपूर्णतेच्या परिमाणाने पूर्ण भरून जावे. येशूच्या नांवात.
(इफिस३ वर आधारित)
कुटुंबाचे तारण
येशूच्या नावाने, पवित्र आत्म्याचा अग्नी मजवर आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर नव्याने उतरून येवो.
हे परमेश्वरा, येशूच्या नावाने, माझ्या जीवनात आणि माझ्या कुटुंबात ते सर्व जे पवित्र नाही ते तुझ्या अग्नीद्वारे जाळून टाक.
आर्थिक प्रगती
जो कोणी माझ्याकडे साहाय्यासाठी पाहत आहे तो निराश होणार नाही. माझ्याजवळ पुरेसेपेक्षा अधिक असेन की माझ्या गरजांचे समाधान करावे आणि पुष्कळ असेल की गरजेमध्ये असणाऱ्या इतरांना द्यावे. मी कधीही कर्ज घेणारा नाही, तर कर्ज देणारा आहे. येशूच्या नावाने.
केएसएम चर्च
पित्या, पास्टर मायकल आणि त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, स्टाफ आणि संघ सदस्य यांच्यासाठी मी प्रार्थना करतो की त्यांनी अलौकिक शहाणपण, समज, सर्वश्रेष्ठ सल्ला, ज्ञान आणि देवाच्या भयात चालावे. (यशया ११:२-३)
राष्ट्र
पित्या, तुझ्या धार्मिकतेने आमचे राष्ट्र भरू दे. आमच्या राष्ट्राच्या विरोधातील अंधार व विध्वंसाची सर्व शक्ती नष्ट केली जावी. आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात शांतता आणि समृद्धी नांदू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?● यासाठी तयार राहा!
● अंतिम क्षण जवळ येण्यास सुरुवात होते
● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे
● ज्ञान व प्रीति हे प्रोत्साहन देणारे
● कृतज्ञतेसाठी एक धडा
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२
टिप्पण्या