डेली मन्ना
महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-१
Wednesday, 8th of May 2024
27
22
705
Categories :
जीवनाचे धडे
बायबल मनुष्याचे पातक लपवीत नाही. हे यासाठी की आपण महान पुरुष व स्त्रियांच्या चुकांपासून शिकावे आणि त्याच खड्ड्यांना टाळावे.
कोणीतरी म्हटले आहे, "इतरांच्या चुकांकडून शिका" तुम्ही पुष्कळ वर्षे जगू शकत नाही की तुम्ही ते सर्व तुमच्या स्वतःसाठी करावे. मी त्यामध्ये हे म्हणत जोडेन की, "चुका करणे व त्यापासून शिकणे चांगले आहे, परंतु शिकण्याचा तो एक त्रासदायक मार्ग आहे."
बायबल माणसांच्या चारित्र्याचे अनेक अभ्यास पुरविते ज्यांनी देवाच्या मागे चालणे व सेवा करण्याचा प्रयत्न केला होता, तरीही त्या मार्गात चालण्यात कधीकधी अडखळले होते.
ह्यागोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या. आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. (१ करिंथ १०:११)
लक्षात ठेवा...
जर एक मनुष्य जो देवाच्या मनासारखा होता त्याचे पतन झाले (दावीद)
जर एक मनुष्य जो पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान होता त्याचे पतन झाले (शलमोन)
सर्वात बलशाली मनुष्याचे पतन झाले (शमशोन)
आपण कोण आहोत की असा विचार करावा की पतन होणे शक्य नाही?
"म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे." (१ करिंथ १०:१२)
येथे एक म्हण आहे की जर आपण इतिहासाकडून शिकण्यात चुकलो, तर आपण तेच करून नाश पाऊ. इतरांच्या चुकांकडून शिकण्याचा एक लाभ हा हे जाणणे की आपण सुद्धा त्याच चुका करू शकतो जर आपण योग्य पाऊल उचलण्यात पुरेशी काळजी घेतली नाही.
आज, दाविदाच्या जीवनाकडे पाहू या, व त्याच्या चुकांकडून शिकू या.
राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समयी म्हणजे वर्षारंभी दाविदाने यवाबास व त्याच्याबरोबर त्याचे नोकरचाकर व सर्व इस्राएल लोक यांस पाठविले; त्यांनी अम्मोन्यांचा संहार करून राब्बा नगरास वेढा घातला; पण दावीद यरुशलेमेसच राहिला. (२ शमुवेल ११:१)
पवित्र शास्त्र सुचविते की ही वेळ, समय होता की दाविदाने युद्धाच्या ठिकाणी असावयास पाहिजे होते. तथापि, दाविदाने, सोयीस्करपणे स्वतः बहाणा केला व मागेच राहिला. दावीद स्पष्टपणे एका चुकीच्या ठिकाणी होता.
आपल्या विषयी असे किती वेळा म्हटले जाऊ शकते? रविवारच्या सकाळी, आपल्याला देवाच्या मंदिरात असण्याची गरज असते, परंतु मग आपल्याकडे योग्य व पटवून देणारी कारणे असतात (आणि कदाचित दाविदाकडे सुद्धा तशीच होती). परंतु तुम्ही हे पाहा, दाविदाच्या पतना मध्ये हे पहिले पाऊल होते.
योग्य ठिकाणी असणे हे आपल्याला त्याचे सरंक्षण व कृपे मध्ये ठेवते. चुकीच्या ठिकाणी असणे हे आपल्यासाठी मोठे संकट व पीडे मध्ये असण्याचे कारण होऊ शकते.
प्रार्थना
पित्या, माझ्या पावलांना नेहमीच मार्गदर्शन कर म्हणजे मी योग्य ठिकाणी असावे जेथे मी असावे हे तुला पाहिजे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● चेतावणीकडे लक्ष दया● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
● विश्वासात परीक्षा
● देवदुतांकडे आपण प्रार्थना करू शकतो काय?
● दिवस १६ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● येशूला पाहण्याची इच्छा
टिप्पण्या