सध्याच्या वर्तमान पत्रात बातमी होती की दोन तरुण मुलांनी त्यांच्या वर्ग मित्राचा खून केला होता, कारण तो त्यांना धमकावत असे. त्यांनी बदला घेण्याच्या वृत्तीने त्याला ठार मारले, धक्कादायक!
शमुवेल २५:४-९ मध्ये, आपण पुढे हे जाणतो की दावीद स्वतः जबाबदारी घेऊन, नाबालचे सेवक व त्यांची गुरेढोरे धोक्यापासून वाचवीत होता. दावीद व त्याच्या सेवकांच्या संरक्षक उपस्थितीमुळे नाबाल हा त्याची संपत्ति वाढवित खुशाल व सुरक्षित होता. ह्यावेळे पर्यंत, दावीदाने त्याच्या बदल्यात काहीही मागितले नव्हते.
एके दिवशी दावीदाने त्याच्या व त्याच्या लोकांसाठी काही वस्तू मागितल्या. दावीद व त्याच्या लोकांनी त्यास जे सर्व काही चांगले केले होते त्यासाठी कृतज्ञ होण्याऐवजी, त्याने दावीद व त्याच्या लोकांचा अपमान केला. दावीदाने जेव्हा हे ऐकले, त्याला फार संताप आला व बदल्याच्या भावनेने त्याने नाबालाच्या घरच्या सर्व पुरुषांना ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. (१ शमुवेल २५: २१-२२)
तथापि, नाबालाची पत्नी, अबीगईल, ही दावीद व त्याच्या लोकांना मार्गात भेटली जे बदला घेण्यास जात होते. ह्या स्त्रीने दावीदाला म्हटले हे बोलत, "संताप करून घेऊ नका व बदला घेऊ नका. आतापर्यंत परमेश्वराने आपले सर्व युद्ध लढले आहेत, आणि म्हणून परमेश्वराला हे सुद्धा लढू दया. (१ शमुवेल २५:२४-३१ सारांशीत)
दावीदाने बुद्धीमत्तेपूर्वक तिचे म्हणणे मान्य केले आणि तो विषय परमेश्वराच्या हातात सोडून तेथून निघून गेला. नंतर, तिने जे केले ते नाबाल ला जेव्हा सांगितले, "तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले, तो पाषाणासारखा झाला. नंतर दहा दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाका मिळाला को तो मृत्यू पावला (१ शमुवेल २५:३७, ३८). परमेश्वराने दावीदाच्या वतीने बदला घेतला.
परमेश्वर कोणाचा पक्षपात करीत नाही (प्रेषित १०:३४). तो पक्षपाती परमेश्वर नाही (रोम १२:११). जे त्याने दावीद साठी केले, तो ते तुमच्या व माझ्यासाठी सुद्धा करेल.
काही वेळ येते जेव्हा आपल्याला कोणाद्वारे फार संताप होतो आणि आपली अंत:प्रेरणा पेटून उठते. स्वाभाविकपणे बदला घेणे असे आपल्याला वाटते. सिनेमा व खेळाचे ऐप आपल्याला ह्यासाठी निरंतर प्रेरणा देतात की "वाईट लोकांना फटके दयावे". आपला पतित स्वभाव आपल्याला सांगतो की तेथे विजय आहे जेव्हा आपल्या "शत्रूला शिक्षा होते", किंवा "त्यास काढून टाकण्यात येते."
तथापि, परमेश्वर त्याच्या लोकांना काहीतरी अद्भुत करण्यास सांगत आहे, "प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट दया; कारण असा शास्त्रलेख आहे की, 'सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,' असे प्रभु म्हणतो" (रोम १२:१९). जेव्हा दुसऱ्याद्वारे आपल्यावर अन्याय केला जातो, चला आपण परमेश्वरावर भरंवसा ठेवू की तो हिशेब घ्यावा.
आता, याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या स्वतःचे समर्थन करू नये, मग ती आपली प्रतिष्ठा, भौतिक किंवा आर्थिक कल्याण असो. याचा अर्थ हा सुद्धा नाही की नागरिक अधिकाऱ्यास या चुकीची माहिती देऊ नये. हे सर्व मान्य आहे.
बायबल चा असे म्हणण्याचा काय अर्थ आहे तो हा की आपण संताप आल्यामुळे, रागाच्या भावनेने दुसऱ्यावर आक्रमण आणि नष्ट करण्यास पाहू शकत नाही. शेवटी परमेश्वर सर्व हिशेब ठीक करेल.
येशू जेव्हा वधस्तंभावर होता, "त्याची (येशूची) निंदा होता असतां त्याने उलट निंदा केली नाही; दु:ख भोगीत असतां त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे (पिता परमेश्वर)) स्वतःला सोपवून दिले. (१ पेत्र २:२३)
प्रार्थना
पेंटेकॉस्टच्या दिवशी, देवाचा आत्मा सामर्थ्याने साधारण लोकांवर आला आणि त्यांना शेवटच्या-समयाच्या पिकाचे सामर्थ्यशाली साधन म्हणून परिवर्तीत केले.
२८ मे २०२३ला, आम्ही कालिदास हॉल, मुलुंड, मुंबई येथे भविष्यात्मक सभा घेतली. देवाच्या महान कार्याच्या तयारीमध्ये, जसे आत्म्याने मार्गदर्शन केले, आम्ही २५ गुरुवार), २६ (शुक्रवार) आणि २७ (शनिवार) हे दिवस उपास व प्रार्थनेचे म्हणून घोषित केले. तुम्ही देखील, आमच्याबरोबर सहभागी व्हा आणि देवाच्या स्पर्शाचा अनुभव करा.
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरीता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, बदला घेण्याच्या भावनेस सांभाळण्यास मला क्षमा कर. तुझ्या वचनात भरवंसा ठेवण्यास मला साहाय्य कर जे म्हणते, "बदला घेऊ नका पण त्याऐवजी देवाला तुमच्या वतीने बदला घेऊ दया."
प्रभु येशू, तूं शांतीचा राजकुमार आहे. असे होवो की तुझी शांती माझ्या हृदयात व माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागात राज्य करो. आमेन.
पित्या, मजवर आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर तुझ्या आत्म्याचा नव्याने वर्षाव कर. तसेच, २८ मे रोजी पेंटेकॉस्टच्या सभेला हजर राहणाऱ्या प्रत्येकावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, मी विनंती करतो की तू माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या हृदयास स्पर्श कर की ख्रिस्ताचे सत्य स्वीकारावे. "त्यांना असे हृदय दे की येशू ख्रिस्ताला प्रभू, परमेश्वर आणि तारणारा म्हणून ओळखावे. त्यांना मनापासून तुझ्याकडे वळण्यास प्रेरित कर.
माझ्या खांद्यावरून प्रत्येक भार काढून टाकले जावो आणि माझ्या मानेवरील प्रत्येक जू आणि अभिषेकामुळे प्रत्येक जू नष्ट केले जाईल. (यशया १०:२७)
आर्थिक प्रगती
पित्या, मी तुझे आभार मानतो, कारण हा तूच आहे जो मला सामर्थ्य देतो की संपत्ती प्राप्त करावी. संपत्ती निर्माण करण्यासाठी सामर्थ्य हे आताच मजवर येवो. येशूच्या नावाने. (अनुवाद ८:१८)
माझा वारसा हा कायमचा असेल. विपत्काली मी लज्जित होणार नाही: आणि दुष्काळाच्या दिवसांत, मी आणि माझ्या कुटुंबाचे समाधान करण्यात येईल. (स्तोत्र ३७:१८-१९)
माझा देव आपल्या संपत्यनुरूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील." (फिलिप्पै. ४:१९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, पास्टर मायकल, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, संघाचे सदस्य आणि करुणा सदन सेवाकार्याशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला समृद्ध कर.
राष्ट्र
पित्या, तुझे वचन म्हणते, राज्यकर्त्यांना त्यांच्या सन्मानाच्या उच्च पदांवर बसविणारा तूच आहे आणि नेत्यांना त्यांच्या उच्च पदांवरून काढून टाकणारा देखील तूच आहे. हे परमेश्वरा, आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात योग्य पुढारी निर्माण कर. येशूच्या नावाने. आमेन.
पित्या, तुझा आत्मा भारतातील प्रत्येक शहर आणि राज्यावर वाहू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● एक गोष्ट: ख्रिस्तामध्ये खरा खजिना शोधणे● लोकांचे पाच गट येशूला भेटले # 1
● राज्याचा मार्ग स्वीकारणे
● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● मनुष्याच्या प्रशंसेपेक्षा देवाच्या पुरस्काराचा धावा करा
● कोणीही आवडता नाही परंतु घनिष्ठ
● योग्य पाठपुरावा अनुसरण
टिप्पण्या