जर तुम्हाला पाहिजे की तुमच्या संबंधांमध्ये परिपूर्णता व्हावी, मग तुम्ही कामाच्या ठिकाणी, घरी, किंवा कोणत्याही ठिकाणी असाल, तुम्ही आदराचा सिद्धांत शिकला पाहिजे.
ज्याचा तुम्ही आदर कराल ते तुमच्याकडे येईल आणि ज्याचा तुम्ही अनादर करता ते तुमच्याकडून जाईल. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही पैशाचा त्याचा वापर करून आणि ते बुद्धीमत्तापुर्वक निवेश करून आदर करता, तेव्हा पैसा हा तुमच्याकडे वाढू लागेल नाहीतर तुम्हाला त्याच्या शोधात जावे लागेल.
हाआदरचा सिद्धांत संबंधामध्ये सुद्धा लागू करता येईल.
आपण जर जुन्या करारात पाहिले, देवाने त्याच्या लोकांना दहा आज्ञा दिल्या.
पहिल्या 4 आज्ञा देवाचा आदर करण्या विषयी आहेत
शेवटच्या 6 आज्ञा लोकांचा आदर करण्या विषयी आहेत
मी पुढे जाण्याअगोदर, मी येथे कबूल करतो की भूतकाळात मी सुद्धा आदराचा सिद्धांत पाळण्यामध्ये अनेक चुका केल्याआहेत. तथापि,मी पूर्णपणे आशीर्वादित पवित्र आत्म्याचाआभारी आहे जो शांतपणे माझा हात धरून आहे आणि ह्या सर्व मार्गातून मला शिकवत आहे.
जेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या लोकांकडे पाहतो, चिडचिडा स्वभाव, खालावलेली गंभीर स्थिती, अपयश पाहण्यासाठी तुम्हाला मानसशास्त्रात उच्च पदवीची गरज नाही आणि ह्या वास्तविकतेला विसरा की ह्या मलीनतेखाली देवाने गुप्त निधि ठेवला आहे. (2 करिंथ 4:7)
प्रेषित पौलाने लिहिले, "ही आमची संपत्ति मातीच्या भांडयात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे." (2 करिंथ 4:7)
जर आपल्याला यशस्वी संबंध बनवायचे आहे, भूतकाळातील सामान्यमानवी अशक्तपणाकडे पाहण्याद्वारे आपण एकमेकांचा आदर करण्यास शिकले पाहिजे आणि अविश्वसनीय मुल्यांची प्रशंसा करावी जे आपल्या सर्वांमध्ये आहे. प्रत्येकाजवळ दुसऱ्यास देण्यासाठी काहीतरी आहे. जेव्हा आपण ही सत्यता समजतो तेव्हा एकमेकांसाठी सकारात्मक विचार आणि भावना ह्या वाढतील. याची पडती बाजू ही, जर आपण असे केले नाही, आपण एकमेकांना आपण सहज आहोत असेच समजत राहाल.
तुमचे भविष्य हे ज्यांस तुम्ही आदर देण्याचे निवडले आहे त्याद्वारे निश्चित केले जाते, आणि जर तुम्ही तुमच्या जीवनात अपयशी झाला, ते ह्या कारणासाठी कीव्यक्ति ज्याचा अनादर करण्याची तुम्ही निवड केली आहे.
तथापि, शब्दआणि भावने पलीकडे, खरा आदर हा कृत्ये आणि कार्यात व्यक्त केला जातो.
काही प्रश्न जे विचारावयाचे आहेत?
मी माझे कुटुंब (माझी मुले, पत्नी) यांस सहज असे समजले आहे काय?
जे लोक माझ्यासोबत काम करीत आहेत त्यांना मी सहज असे समजले आहे काय?
माझ्या जीवनातील देवाचेपुरुष आणि स्त्री ह्यांना मी सहज असे समजले आहे काय?
मनन करण्याच्या प्रक्रीये मध्ये ह्या प्रकारे जा आणि त्या मार्गांचा विचार करा की तुम्ही त्यांचा आदर करू शकता.
लक्षात ठेवा, जे तुम्ही पेराल तेच तुम्ही कापणी कराल. तुम्ही आदर पेरा, आणि ते तुमच्याकडे परत येईल.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरीता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या परमेश्वरा, माझ्या जीवनातील प्रत्येक आशीर्वादासाठी मी तुझे आभार मानतो. तू सर्व आदर आणि स्तुतीस पात्र आहेस. तू आणि तुझ्या लोकांचा आदर करण्यास मला शिकव. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
मी कबूल करतो की मी आणि माझे घराणे तर तुझी सेवा करणार.
आर्थिक प्रगती
मी परमेश्वराच्या वचनांमध्ये हर्षित होतो; त्यामुळे मी आशीर्वादित आहे. संपत्ती आणि धन माझ्या घरात राहतील, आणि माझे नीतिमत्व सर्वकाळ टिकते. (स्तोत्र ११२:१-३)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्ति जो केएसएम चर्चबरोबर जुळलेला आहे त्याची वचन आणि प्रार्थनेमध्ये वाढ व्हावी. त्यांना तुझ्या आत्म्याचा नव्याने अभिषेक होऊ दे.
राष्ट्र
पित्या, भारतातील प्रत्येक शहरात आणि राज्यात तुझ्या आत्म्याने आणि बुद्धीने भरलेले पुढारी निर्माण कर.
पित्या, तुझा आत्मा भारतातील प्रत्येक शहर आणि राज्यावर वाहू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आई-वडिलांचा मान राखणे (दिवस ८)● प्रचलित अनैतिकतेमध्ये स्थिर राहणे
● बीज चे सामर्थ्य-१
● दिवस १९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● आध्यात्मिकदृष्टया तुम्ही योग्य आहात काय?
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● संकटाच्या काळाकडे पाहणे
टिप्पण्या