"मग पाहा, बाजेवर पडून असलेल्या कोणाएका पक्षाघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, "मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे." (मत्तय ९:२)
विश्वासाची अदृश्य शक्ती ही वाऱ्यासारखी आहे. जरी ती अदृश्य आहे, तरी ती दृश्य परिणाम प्रकट करते. ही ती वाऱ्याची वाहणारी शक्ती जी पानांना वर करते, झाडांमधून वाहते, आणि पतंगांना आकाशात घेऊन जाते. अगदी वाऱ्याप्रमाणेच, विश्वास हा त्याच्या परिणामाद्वारे पाहिला जातो. देवाच्या आश्वासानांमध्ये ही निश्चित खात्री आहे, जी त्याच्या वचनाच्या परिपूर्ण सत्यामध्ये मुळावलेली आहे. "विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयी भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दल खातरी आहे" (इब्री. ११:१).
मत्तय ९:२ मधील मनुष्यांचा विश्वास हा निष्क्रिय नाही. तो धाडसी होता. ते छतावर चढले, त्याची कौले काढली, आणि त्यांनी त्यांच्या मित्राला येशूकडे खाली सोडले, जमावाच्या निंदनीय नजरेने किंवा घराच्या मालकाच्या संभाव्य प्रतिक्रियेने निराश झाले नाही. छत तोडण्याची मूलगामी कृती येशूच्या उपचार शक्तीवरील अढळ विश्वासाचे प्रतीक आहे, अडथळे दूर करण्यासाठी पुरेसा दृढ विश्वास.
प्रतिकूल परिस्थितीत त्यांची दृढनिश्चयी कृती त्यांच्या अदृश्य विश्वासाचे दृश्य प्रकटीकरण होते, येशूला त्यांचा विश्वास पूर्ण झालेला असे पाहू दिले.
ह्या माणसांनी ओळखले होते की केवळ विश्वास अपुरा होता; तो कृतीसह असला पाहिजे होता. ते जमावाच्या बाहेरच्या बाजूलाच राहू शकले असते, आशा ठेवून की येशू त्यांच्या मित्राला बरे करेन परंतु त्याबद्दल काहीही करणार नाही. परंतु त्यांना ठाऊक होते की विश्वासाला पायांची आवश्यकता आहे. याकोब यावर जोर देऊन, म्हणतो, "ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे" (याकोब २:१७). येशू व त्याच्या वचनावरील त्यांचा अतूट विश्वास, धाडसी कृत्यासह, दैवी बरे करण्याच्या प्रकट होण्यात परिणाम झाला.
यावर चिंतन करत, आपल्याला प्रश्न विचारण्यास भाग पाडले जाते- आपल्या परिस्थितीत पवित्र शास्त्राचा खरा विश्वास हा कशासारखा दिसतो?
देवावर विश्वास ठेवणे आणि या विश्वासाबरोबर आपल्या कृती एकरूप करण्याचे हे समर्पण आहे. हे कार्यशीलपणे त्याचा धावा करणे आहे, सातत्याने स्वर्गाच्या दारावर थाप मारणे, वादळाच्या मध्ये येशूकडे पाण्यावर चालणे आहे. हे देवाच्या अभिवचनांवर चालणे आहे, जरी जेव्हा परिस्थितीही त्याच्याही उलट अशी दिसत असते.
हा तो अब्राहाम आहे जो इसहाकाचे बलिदान करण्यास तैयार आहे, देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवत (उत्पत्ति २२:१-१८). हे पेत्र नावेमधून बाहेर पाऊल ठेवण्यासारखे आहे, डोळे येशूवर स्थिर आहेत (मत्तय १४:२९).
आज, तुमच्या स्वतःची तपासणी करा आणि विचारा: विश्वासाच्या कबुलीसह माझी कृत्ये एकरूप आहेत का? तेथे काही दृश्य चिन्हे (बाह्ये चिन्हे) आहेत का की मी देवाच्या अभिवचनांमध्ये विश्वास ठेवतो?
मी तुम्हांला प्रोत्साहित करतो की तुमच्या जीवनातील एका भागाला ओळखा जेथे तुम्ही तुमच्या कृतींना तुमच्या विश्वासासह अधिक घनिष्ठतेत एकरूप करण्यास सुरु करू शकता. जेव्हा तुम्ही हे करता, तेव्हा तुमच्या जीवनाच्या इतर भागांमध्ये देखील असे करण्यास सुरु करा.
प्रार्थना
पित्या, अडथळ्यांना हलवणारा अतूट विश्वास आमच्यामध्ये जागृत कर. आमच्या पावलांना मजबूत कर की आमच्या विश्वासाला प्रतिबिंबित करावे आणि तुझ्या वचनांची पूर्तता होण्याच्या सुरात आमचे जीवन प्रतिध्वनित होवो. आणि दररोज तुझ्याबरोबर अधिक घनिष्ठतेत वाढण्यास आम्हांला मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● यासाठी तयार राहा!● एल-शादाय चा परमेश्वर
● जबाबदारीसह परिपक्वता सुरु होते
● भीतीचा आत्मा
● हे काही प्रासंगिक अभिवादन नाही
● काहीही लपलेले नाही
● महान पुरुष व स्त्रिया पतन का पावतात - ५
टिप्पण्या