भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करितो; तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. (स्तोत्रसंहिता १३९: १४)
परमेश्वराला पाहिजे की तुम्ही तुमच्या अत्युच्च सामर्थ्यापर्यंत पोहोचावे. दुसऱ्या शब्दात, त्यास पाहिजे की तुम्ही सर्वोत्तम असे व्हावे.
जेव्हा तुम्ही तसे बोलता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ख्रिस्ती लोकांद्वारे गैरसमज करवून घेण्याचा धोका पत्करीता. यासाठी कारण हे की आमच्या प्रारंभीच्या स्तरावरून आपल्याला शिकविले गेले आहे की ख्रिस्ताचे अनुकरण करावे म्हणजे नम्र असावे आणि महत्वहीन असे राहावे.
हे जरी पूर्णपणे खरे आहे की परमेश्वर गर्विष्टांचा विरोधकरतो परंतु दीन जनांवर कृपा करतो (याकोब ४: ६). ह्या वचनाचा सरळ अर्थ हा आहे कीपरमेश्वराला हे नाही पाहिजे की तुम्ही असा विचार करावा की तुमच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तुम्ही उत्तम असे आहात ते गर्विष्ठ असणे होय. तथापि, परमेश्वराला पाहिजे की तुम्ही जितके उत्तम होऊ शकता तितके उत्तम असे असावे.
कोणीतरी किती योग्यपणे म्हटले आहे. परमेश्वर तुमच्यावर प्रीति करतो जे तुम्ही आहात परंतु तो तुमच्यावर अधिक प्रीति करतो की तुम्ही जे आहात तसेच तुम्हाला ठेवावे. त्यास पाहिजे की तुम्ही सर्वोत्तम असे व्हावे. अशाप्रकारे, पित्याचे गौरव होते. (योहान १५: ८)
हा विश्वास ठेवणे की जे काही परमेश्वर तुम्हाला करण्यास सांगत आहे ते करण्यात तुम्ही समर्थ आहात हे गर्विष्ठपण नाही, हा विश्वास आहे.
जर तुम्ही स्वेच्छेने आज्ञा पाळाल, तुम्ही राजा प्रमाणे मिष्ठान्ने खाल (यशया १: १९). फक्त एकच अट ही कोणत्याही क्षणी आपल्या जीवनासाठी देवाची आज्ञा पाळणे. देवाने आदाम व हव्वे ला एदेन बागे मध्ये ठेवले, रानात नाही. जोपर्यंत ते त्याच्या आज्ञेनुसार चालले, ते राजा प्रमाणे जगले.
तुमच्यास्वतःची इतरांबरोबर तुलना करणे थांबवा. हे तुमच्या जीवनात चिंता आणि भीती आणेल. तथापि, जेव्हा तुम्ही परमेश्वराला तुमच्यातून उत्तम ते आणण्यास कार्य करू देता, तुम्हाला तुम्ही जितके चांगले होऊ शकता तितके उत्तम करू देता, तेव्हा तुम्हाला एक प्रकारची भरपुरी आणि समाधानाचा विचार असेन ज्याचे वर्णन करू शकत नाही.
तुम्ही विश्वासाकडून विश्वासा कडे जाल (रोम १: १७), सामर्थ्याकडून सामर्थ्याकडे, गौरवाकडून गौरवाकडे ( २ करिंथ ३:१६-१८). ही वचने वाढ, परिवर्तन आणि गौरवासाठी आणि सामर्थ्यशालीहोण्याकरिता अमर्यादित शक्यता प्रदर्शित करेल, देवाची लेकरे म्हणून जी आपल्याकडे आहेत.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरीता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, तुझ्या मार्गात सतत चालण्यासाठी, सर्व क्षणी तुझ्या उद्देशामध्ये स्थिरपणे चालत राहावेम्हणूनमला योग्यता दे. आमेन.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, मी विनंती करतो की तू माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या हृदयास स्पर्श कर की ख्रिस्ताचे सत्य स्वीकारावे. "त्यांना असे हृदय दे की येशू ख्रिस्ताला प्रभू, परमेश्वर आणि तारणारा म्हणून ओळखावे. त्यांना मनापासून तुझ्याकडे वळण्यास प्रेरित कर.
माझ्या खांद्यावरून प्रत्येक भार काढून टाकले जावो आणि माझ्या मानेवरील प्रत्येक जू आणि अभिषेकामुळे प्रत्येक जू नष्ट केले जाईल. (यशया १०:२७)
आर्थिक प्रगती
पित्या, मी तुझे आभार मानतो, कारण हा तूच आहे जो मला सामर्थ्य देतो की संपत्ती प्राप्त करावी. संपत्ती निर्माण करण्यासाठी सामर्थ्य हे आताच मजवर येवो. येशूच्या नावाने. (अनुवाद ८:१८)
माझा वारसा हा कायमचा असेल. विपत्काली मी लज्जित होणार नाही: आणि दुष्काळाच्या दिवसांत, मी आणि माझ्या कुटुंबाचे समाधान करण्यात येईल. (स्तोत्र ३७:१८-१९)
माझा देव आपल्या संपत्यनुरूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील." (फिलिप्पै. ४:१९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, पास्टर मायकल, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, संघाचे सदस्य आणि करुणा सदन सेवाकार्याशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला समृद्ध कर.
राष्ट्र
पित्या, तुझे वचन म्हणते, राज्यकर्त्यांना त्यांच्या सन्मानाच्या उच्च पदांवर बसविणारा तूच आहे आणि नेत्यांना त्यांच्या उच्च पदांवरून काढून टाकणारा देखील तूच आहे. हे परमेश्वरा, आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात योग्य पुढारी निर्माण कर. येशूच्या नावाने. आमेन.
पित्या, तुझा आत्मा भारतातील प्रत्येक शहर आणि राज्यावर वाहू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या वचनात बदल करू नका● शब्दांचे सामर्थ्य
● चिंता करीत वाट पाहणे
● तुम्ही अजूनही का थांबून आहात?
● उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा
● तुमची प्रतिक्रिया काय आहे?
● चर्चला न जाता चर्च ऑनलाईन पाहणे ठीक आहे काय?
टिप्पण्या