इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणाऱ्या मनुष्याला मी विन्मुख होईन त्याचा स्वजनांतून उच्छेद करीन. (लेवीय १७: १०)
मी त्या मनुष्याला विन्मुख होईन जो रक्त सेवन करेल.
इस्राएली लोकांना परमेश्वराचा हा कडक आदेश होता, परंतु कारण हे सरळ होते.
"शरीराचे जीवन तर रक्तांत असते, आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे; कारण रक्तांत जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते." (लेवीय १७: ११)
१. कारण शरीराचे जीवन रक्तांत आहे.
विचार हा की सर्व जीवन हे परमेश्वराचे आहे आणि कारण रक्त हे जीवात असते, तर विशेषतः ते देवाचे आहे.
बायबल जोर देऊन सांगते "जीवन" हे रक्ता मध्ये आहे. जेव्हा रक्त तुमच्या शरीरात वाहणे थांबते, तेव्हा तुम्ही मृत होता, पूर्णपणे आणि लगेच. त्याप्रमाणेच, ईश्वरविज्ञान, चर्च, एक प्रार्थना गट किंवा एक व्यक्तिख्रिस्ताच्या रक्ता शिवाय मृत आहे.ख्रिस्ताचे जीवन, त्याच्या सामर्थ्या आणि आशीर्वाद सह, हे केवळ तुमचेच आहे कारण तुम्ही विश्वासा द्वारे त्याच्या रक्ता मध्ये जुडलेले आहात.
२. आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे: त्यातच भर, रक्त हे माध्यम होते ज्याद्वारे प्रायश्चित्त हे केले जात होते-त्यामुळे रक्त सेवन करणे हे त्यास अपवित्र करणे होय. तसेच, प्रायश्चित्ताच्या स्मरणात्मक भरपाईद्वारे पापाची गंभीरता ही प्रकट होते-मृत्यू.
३. अर्थातच, अनेक विधर्मी विधी मध्ये रक्त पिणे साजरे केले जाते, आणि परमेश्वराला ह्या विधर्मी विधींपासून सुद्धा वेगळे होणे पाहिजे होते.
"इस्राएल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशियांपैकी कोणी खाण्यालायक पशुची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. कारण प्राणिमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय; ह्यास्तव इस्राएल लोकांना मी म्हटले आहे की, कोणत्याही प्राण्यांचे रक्त सेवन करू नये, कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्त होय, ते जो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा." (लेवीय १७: १३-१४)
जुन्या करारात प्राण्यांच्या रक्ताला हा आदर ह्याने आपल्याला विचार करावयास लावले पाहिजे की आपण येशूच्या रक्ताला कसा आदर दिला पाहिजे. जर, जुन्या करारात, प्राण्यांच्या रक्ताला आदर दिला पाहिजे होता, तर येशूच्या मौल्यवान रक्ता विषयी काय जे नवीन करार करते?
तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडविले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते 'कराराचे रक्त' ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांस वाटते?" (इब्री १०: २९)
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, मी तुझे आभार मानतो की सर्व जीवन हे तुझे आणि केवळ तुझेच आहे. मी माझे जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. येशूच्या नांवात. प्रभु येशू, येशूच्या मौल्यवान रक्तासाठी मी तुझे आभार मानतो जे माझ्या उद्धारा करिता सांडले गेले. येशूच्या नांवात आणि येशूच्या रक्ता द्वारे, पाप, सैतान, आणि त्याच्या सेवकांवर मी विजय घोषित करतो.
कौटुंबिक तारण
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांना सुवार्ता कशी सांगावी हे मला विशेषकरून दाखव. मला समर्थ कर, हे परमेश्वरा. योग्य क्षणी, तुझ्याबद्दल सांगण्यासाठी संधी प्रगट कर. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे ते परमेश्वरा द्वारे स्मरण केले जाईल. म्हणून माझ्या जीवनातील प्रत्येकअशक्य गोष्टी परमेश्वरा द्वारे बदलल्या जातील.येशूच्या नांवात.
केएसएम चर्च वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे उंचाविले व गौरविले जाईल.
देश
पित्या,मी प्रार्थना करतो की भारत देशातील प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची अंत:करणे ही तुझ्याकडे वळावी. त्यांनी त्यांच्या पापांचा पश्चाताप करावा व येशूला त्यांचा प्रभु व उद्धारकर्ता असे कबूल करावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 4● सापांना रोखणे
● त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य
● दिवस ०१ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● क्षमेसाठी व्यावहारिक पाऊले
● प्रार्थनाहीनता दुतांच्या कार्यास अडथळा आणते
● सुटकेचा दिवस (दिवस १०)
टिप्पण्या