डेली मन्ना
कलंकित करणाऱ्या पापासाठी अद्भुत कृपेची आवश्यकता आहे
Wednesday, 9th of August 2023
21
16
855
पुढील हे चिरंतन गीत आहे "अद्भुत कृपा":
‘Amazing Grace’:
Amazing Grace, How sweet the sound
That saved a wretch like me
I once was lost, but now am found
I was blind but now I see
कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. (योहान १: १७)
येशू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानात आपल्यालादेवाची कृपा ही दिली आहे हे खरेच अद्भुत आहे. आपण खरेच त्यास पात्र नाहीत.
येशू जो देवाचा पुत्र मानवी रुपात खाली आला, एक सिद्ध जीवन जगला. आपण मानवाकडे काहीही कारण नव्हते की त्यास जिवंत मारावे, परंतु आपण तसे केले. पवित्र शास्त्र सांगते, "त्याने आपल्यावर प्रीति केली आणि त्याने आपल्या रक्ताने तुम्हाआम्हांला 'पातकातून मुक्त केले" (प्रकटीकरण १: ५). मग त्याने त्याची बिनशर्त कृपा आपल्याला दिली म्हणजे आपण पुन्हा एकदा त्याचे पुत्र व कन्या होऊ शकावे.
दाविदाच्या जीवनाशिवाय कदाचित इतर कोठेही देवाच्या कृपेचे चित्रण हे इतक्या स्पष्टपणे दिसत नाही. येशूची वंशावळी दाविदा पर्यंत नेऊ शकतात. येशूला स्वतःला दाविदाचा पुत्र असे म्हटले आहे. आता ते कृती मध्ये अद्भुत कृपा आहे.
कदाचित तुम्ही स्वतःला पवित्र ठेवायचे ठरविले असेल आणि अपयशी ठरला असाल. धैर्य सोडू नका. मला पाहिजे की तुम्ही देवाच्या कृपे कडे पाहा. येथे अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या सामर्थ्याने करू शकत नाही. सत्य जे मला पाहिजे की तुम्ही पाहावे ते हे की, जर परमेश्वराने दाविदाला लैंगिक पापापासून उद्धारीले, तर तो तुमचा सुद्धा उद्धार करू शकतो.
हे काही गोष्टी किंवा कौशल्याने नाही की कोणी लैंगिक बंधनाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो परंतु देवाच्या अद्भुत कृपे द्वारेच होऊ शकतो. देवालाच केवळ सामर्थ्य आहे की आपल्याला मुक्त करावे.
परमेश्वराने आपल्याला आश्वासन दिले आहे की आपल्याला ज्या सर्व कृपेची गरज आहे ती पुरवावी की लैंगिक परीक्षेवरवर्चस्व मिळवावे. सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठीकी, तुम्हांला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल असावे. (२ करिंथ ९:८)
म्हणून येथे ही गोष्ट आहे जी तुम्हांला करण्याची गरज आहे. तुमचे हृद्य उघडा आणि त्यास सांगा की तुम्ही कसा गोंधळ केला आहे आणि त्याची गरज आहे की त्यावर मात करावे. प्रामाणिक असा. मलामाहीत आहे हे खूप सरळ वाटते परंतु हेच ते काय सामर्थ्यशाली करते.
टीप:जर तुम्हाला कोणी ठाऊक आहे की हे वाचण्याने ज्यास साहाय्य मिळेल, तर वरील "सांगा"बटन वापरा. मग पीडीएफ निर्माण होईल जे तुम्ही अनेकांना सांगू शकता. तसेच ह्या शृंखलेतील भाग १ पाहण्यास विसरू नका.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पापाची आता माझ्यावर सत्ता राहणार नाही कारण मी आता कृपेच्या अधीन आहे नियमशास्त्राच्या अधीन नाही. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
पित्या तुझी दया प्रदिवशी नवीन आहे यासाठी तुझा धन्यवाद. खरोखर आमच्या आयुष्याच्या सर्व दिवस माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर तुझा चांगुलपणा व तुझी दया सतत राहिल आणि मी परमेश्वराच्या उपस्थितीत सतत निवास करेन. येशूच्या नांवात. आमेन.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मला माझ्या प्रभु येशूची कृपा ठाऊक आहे; तो धनवान असता माझ्याकरिता दरिद्री झाला; अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने मी आणि माझ्या कुटुंबाचे सदस्ये त्याच्या राज्याकरिता धनवान व्हावीत. (२ करिंथ ८:९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो की पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, व त्यांच्या संघातील सर्व सदस्ये चांगल्या स्वास्थ्य मध्ये राहावीत. असे होवो की तुझी शांति त्यांच्या जीवनात व त्यांच्या कुटुंबाच्या जीवनाला घेरून राहो. असे होवो की करुणा सदन सेवाकार्ये प्रत्येक भागामध्ये वाढत जावो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या सुटकेला कसे राखून ठेवावे● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे
● दिवस ३३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● परिवर्तनाची किंमत
● वातावरणावर महत्वाची समज-३
● स्तुति वृद्धि करते
● आपल्या हृदयाचे प्रतिबिंब
टिप्पण्या