नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील; परंतु देव आपणांवरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतांनाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. (रोम ५:७-८)
आपण त्या जगात राहत आहोत जेथे हे फार विरळ आहे व मनुष्यासाठी तितकेच अशक्य आहे की ज्याकडून परत फेडीची अपेक्षा केल्याशिवाय स्वाभाविकपणे कोणाची काळजी करावी. लोकांसाठी हे फारच विरळ आहे की कोणासाठी तरी प्रीति व्यक्त करावी ज्यांच्याकडे त्यांना त्याच्या परत फेडी साठी देण्यास काहीही नाही. कल हा लोक त्यांच्यासाठी चांगले करतात जे त्यांच्यासाठी चांगले करतात किंवा ते जे त्यांच्यासाठी काही चांगले करू शकतात. हे अशा प्रकारे ह्या जगात चालते.
कारण हे साधे आहे-मानवी प्रीति ही अटींवर आहे. लोकांची वृत्ति ही आहे की ते जे सुंदर आहेत किंवा महान व्यक्ति आहेत, किंवा कशाप्रकारे तरी आकर्षित आहेत त्यांनाच प्रेम करतात. मनुष्यांना "व्यक्ती किंवा वस्तू माझ्या प्रीतीस पात्र असावे" ह्या मनस्थितीची प्रवृत्ति असते. परंतु ह्या प्रकरणात वस्तू किंवा व्यक्ति बदलतात, ते जशा प्रकारे प्रीति करतात ते सुद्धा बदलते. काही लोक चांगल्या हावभावाची देवाण-घेवाण सुद्धा करतात केवळ त्यांच्यासाठी जे काही मार्गाने त्यांच्यासाठी चांगले आहेत.
तथापि, परमेश्वर जो खऱ्या प्रीतीची खरी व्याख्या आहे, तो आपल्याला एक वेगळीच पद्धत संपूर्णतः दाखवतो. आपण ते रोम ५:८ मध्ये पाहतो की जेव्हा आपण पापी होतो तेव्हाच परमेश्वराने त्याच्या पुत्राला आपल्यासाठी मरण्यास पाठविण्याद्वारे त्याची प्रीति आपल्यासाठी दर्शविली. जग हे प्रत्यक्षात देवाच्या अवज्ञेमध्ये होते. देवाला देण्यासाठी जगाकडे खरेच काहीही नव्हते. परमेश्वराने त्याच्या पुत्राला जगाच्या पापांकरिता मरण्यासाठी सरळपणे पाठविले हे याकारणासाठी नाही की जगाने त्याच्या आज्ञा पाळण्यास सुरुवात केली होती.
बायबल च्या संदेशाचे भाषांतर ते वचन अशा प्रकारे स्पष्ट करते: "ज्यावेळेस आपण त्यास कशाही प्रकारे उपयोगी नव्हतो तेव्हा त्याच्या पुत्राला बलिदानपूर्वक मरणाद्वारे देण्याने देवाने त्याची प्रीति आपल्यासाठी योग्य मार्गामध्ये ठेवली." खरेच, भिन्नतेसह ही खरी प्रीति होती! आज जगामध्ये प्रीति कशी दर्शविली जाते त्यापेक्षा ही अत्यंत वेगळी होती.
स्पष्टपणे, जेव्हा तुम्ही पापी असतांनाच परमेश्वर तुमच्यावर इतकी प्रीति करू शकतो, मग जेव्हा तुम्ही त्याचे पुत्र आहात तेव्हा तो किती अधिक करील. तुम्ही अयोग्य आहात अशी भावना यावी असे सैतानास करू देऊ नका, मग याची पर्वा नाही की तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल काय विचार करता. भावना ह्या देवाच्या प्रीतीच्या सत्यापासून कोणास वंचित ठेवू शकतात. देवाच्या एका महान व्यक्तीने एकदा म्हटले होते, "जरी आपल्या भावना येतात व जातात, देवाची प्रीति तसे करीत नाही." मग परिस्थिती कशीही असो याची पर्वा न करता परमेश्वर प्रीति करतो.
तुमच्या प्रती देवाच्या अपार प्रीति विषयी नेहमीच विचार करीत राहा. तो तुम्हांला प्रेम करतो, ज्याप्रकारे जग करते तसे नाही. तुम्ही तुमचे पहिले खोटे बोलण्याअगोदर त्याने तुमच्यावर प्रीति केली आहे. पाप काय आहे हे तुम्ही जाणण्याअगोदर त्याने तुमच्या पापांच्या क्षमे साठी पुरवठा केला आहे. ओह! तो एका ठळक भिन्नतेसह प्रीति करतो! तो तुमच्यावर प्रीति करतो कारण त्याने तुमच्यावर प्रीति करण्याचे निवडले आहे. त्याच्या महान प्रीति मध्ये निरंतर बुडून राहा व यासाठी तुमच्या अंत:करणात त्याच्यासाठी कृतज्ञता राहू दया.
अंगीकार
पित्या परमेश्वरा, माझ्या प्रति तुझ्या महान प्रीति बद्दल मी तुझा आभारी आहे. मी प्रार्थना करतो की माझ्या प्रति तुझ्या प्रीती विषयी सर्व समयी मी निरंतर विचार करीत राहावे. तूं जो एक ज्याने माझ्यावर विनाअट प्रीति केली त्या तुझ्यावर निरंतर भरवंसा करीत राहण्यास मला साहाय्य कर. तुझ्या प्रीति मध्ये निरंतर बुडून राहण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा● विचार करण्यास वेळ घ्या
● द्वारपाळ
● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● परमेश्वरासाठी तहानेले झालेले
● कटूपणाची पीडा
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
टिप्पण्या