तेथे अडतीस वर्षे आजारी [गहन व प्रदीर्घ रोग]असलेला कोणीएक माणूस होता. येशूने त्याला पडलेले पाहिले [असहाय्य]आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?[तुला खरेच बरे होण्याची कळकळ आहे काय?] (योहान ५:५-६ ऐम्पलीफाईड)
एक माणूस फार काळापासून स्वस्थ नाही हे स्पष्ट आहे आणि येशूने ह्या गरीब माणसाला विचारावे,तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? तो बराच विचित्र असा प्रश्न आहे. मला विश्वास आहे कीप्रभूचा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे जेव्हा तुम्ही हा संदेश वाचत आहात:"तुलाखरेचबरे होण्याची इच्छा आहे काय?"
आता, हे कोणालाही दोष देण्यासाठी नाही, परंतुसुधारणे व साहाय्य करण्यासाठी आहे. यात काहीही चूक नाही की ज्यावर तुम्ही भरंवसा ठेवता किंवा जो तुमच्यासाठी आदर्श असा आहे त्यास तुमच्या समस्या सांगाव्या. तथापि, येथे काही लोक आहेत जे त्यांची समस्या कोणालाही किंवा प्रत्येकाला सांगण्यास त्यांना आवडते. काही ह्या स्तरापर्यंत जातात की त्यांच्या समस्या सामाजिक माध्यमावर सांगतात. हे योग्य नाही कारण येथे लोक आहेत जे ही माहिती वापरू शकतात की तुम्हाला भावनात्मकदृष्टया बहकवून टाकावे.
वैद्यकीयदृष्ट्या हेसिद्ध झाले आहे. (मी हे म्हणत नाही) काही लोकांसाठी सहानुभुति मिळवावी, लोकांचे लक्ष वेधून घ्यावे असे आहे. काही लोकांना इतरांनी जास्त लक्ष दयावे असे वाटते आणि ते त्यास अयोग्यपणे वागूनप्राप्त करतात. काही आपली सहानुभूतीनेहमीच काहीतरी तक्रार करण्याच्याद्वारे प्राप्त करतात.
कृपा करून वाईट वाटून घेऊ नका. एक चांगला चिकित्सक शिवण्याअगोदर तो कापतो. तुला खरेच बरे होण्याची इच्छा आहे काय किंवा तुला केवळ तुझ्या समस्या सांगावे असे वाटते?
रुथ अध्याय १ आपल्याला एक स्त्री जिचे नाव नामी तिच्याबद्दल सांगते. तेएक नवीन ठिकाण मवाब देशी स्थिर झाले. जेव्हा ते मवाब देशात होते, त्यांच्या स्वतःच्या शहरापासून फार दूर, तीचा पती व तिचे दोन पुत्र मरण पावले.
ती पूर्णपणे उध्वस्त झाली होती. तिचे संपूर्ण जीवन जसे काही विनाशाच्या स्थानी आले होते. नंतर, मवाब मध्ये असताना, ती ऐकते की परमेश्वराने कसे तिच्या लोकांची भेट घेतली आहे, आणि मग ती तिची सून रुथ बरोबर-आपल्या स्वस्थानी यरुशलेम ला परत येते.
मग त्या दोघी मार्गस्थ होऊन पोहचल्या; तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेले तेथील बाया म्हणू लागल्या, ही नामीच काय? ती त्यांस म्हणाली, मला नामी (मनोरमा) म्हणू नका, तर मारा (क्लेशमया) म्हणा, कारण सर्वसमर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणिले; परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्वसमर्थाने मला पीडिले आहे, तर मला नामी का म्हणता? (रुथ १:१९-२१)
नामी वळली व योग्य दिशेमध्ये गेली. तथापि, तीअंत:करणाने पूर्णपणे निराश होऊन गेली होती. पतीआणिदोन मुले गमाविली होती, ती क्लेशमय अंत:करण घेऊन होती. तिने लोकांना म्हटले मला नामी (ज्याचा अर्थ मनोरमा) म्हणू नका तर मला मारा (अर्थ कडू) म्हणा.
काय तुम्ही काही बोलू शकता? तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका. तुमच्या समस्याद्वारे तुम्हाला नाव देण्यास लावू नका. तुमची संघर्षामुळे दबाव येऊ देऊ नका की तुमची ओळख बदलावी. नामीने तीचा संघर्ष व पीडा ने तिला नाव देऊ दिले.
तुम्हीमद्य पिण्याने संघर्षात असाल परंतु तुमच्या स्वतःला दारुड्या म्हणवून घेऊ नका. तुम्ही कदाचित तुमच्या संबंधांमध्ये चुक केली असेन परंतु तुमच्या स्वतःला अपयशी म्हणू नका.
तुम्ही तुमची नोकरी गमाविली असेल किंवा काही आवाहनामधून जात असाल, परंतु तुम्ही "कशाही उपयोगाचा नाही" असे नाहीत. तुम्ही ते आहात जे परमेश्वर बोलतो तुम्ही आहात.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरीता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
मी जो आहे जे परमेश्वर बोलत आहे मी आहे. मी ख्रिस्त येशू मध्ये नवी उत्पत्ति आहे, सर्व जुन्या गोष्टी ह्या निघून गेल्या आहेत. सर्व गोष्टी ह्या नवीन झाल्या आहेत. मी तो आहे जे वचन बोलते मी आहे. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, मी विनंती करतो की तू माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या हृदयास स्पर्श कर की ख्रिस्ताचे सत्य स्वीकारावे. "त्यांना असे हृदय दे की येशू ख्रिस्ताला प्रभू, परमेश्वर आणि तारणारा म्हणून ओळखावे. त्यांना मनापासून तुझ्याकडे वळण्यास प्रेरित कर.
माझ्या खांद्यावरून प्रत्येक भार काढून टाकले जावो आणि माझ्या मानेवरील प्रत्येक जू आणि अभिषेकामुळे प्रत्येक जू नष्ट केले जाईल. (यशया १०:२७)
आर्थिक प्रगती
पित्या, मी तुझे आभार मानतो, कारण हा तूच आहे जो मला सामर्थ्य देतो की संपत्ती प्राप्त करावी. संपत्ती निर्माण करण्यासाठी सामर्थ्य हे आताच मजवर येवो. येशूच्या नावाने. (अनुवाद ८:१८)
माझा वारसा हा कायमचा असेल. विपत्काली मी लज्जित होणार नाही: आणि दुष्काळाच्या दिवसांत, मी आणि माझ्या कुटुंबाचे समाधान करण्यात येईल. (स्तोत्र ३७:१८-१९)
माझा देव आपल्या संपत्यनुरूप माझी सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील." (फिलिप्पै. ४:१९)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, पास्टर मायकल, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य, संघाचे सदस्य आणि करुणा सदन सेवाकार्याशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला समृद्ध कर.
राष्ट्र
पित्या, तुझे वचन म्हणते, राज्यकर्त्यांना त्यांच्या सन्मानाच्या उच्च पदांवर बसविणारा तूच आहे आणि नेत्यांना त्यांच्या उच्च पदांवरून काढून टाकणारा देखील तूच आहे. हे परमेश्वरा, आमच्या राष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि राज्यात योग्य पुढारी निर्माण कर. येशूच्या नावाने. आमेन.
पित्या, तुझा आत्मा भारतातील प्रत्येक शहर आणि राज्यावर वाहू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुम्ही किती विश्वसनीय आहात?● देवाचे 7 आत्मे: देवाच्या भयाचा आत्मा
● कृपेचे दान
● दिवस १४ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● कृपे मध्ये वाढणे
● पूल बनवणे, अडथळे नाहीत
● भटकण्याचे सोडा
टिप्पण्या