अगापेप्रीति ही सर्वोच्च प्रकारची प्रीति आहे. तिला'देवाच्या प्रकाराची प्रीति' असेसंदर्भिले आहे. इतर सर्व प्रकारची प्रीति ही परस्पर घेणे देणे किंवा निश्चित अटी यावर आधारित असते.
अगापेप्रीति ही विनाअट प्रीति आहे. अशा प्रकारची प्रीति जी देवाला पाहिजे की सर्व ख्रिस्ती लोकांनी बाळगावी. खरी अगापे प्रीति ही नेहमीच एक बक्षीस आहे.
परंतु परमेश्वर त्याची [स्वतःची]खरी अगापे प्रीति आपल्यालादाखवितो व सिद्ध करतो ह्या वास्तविकतेने कीआम्ही पापी असतानाच, ख्रिस्त[मशीहा, अभिषिक्त जन]आमच्याकरिता मरण पावला. (रोम ५:८ ऐम्पलीफाईड)
देवाने जेव्हा त्याची अगापे प्रीति आपल्याला दाखविली, तेव्हा आम्ही अजूनही पापीअसे होतो.देवाला त्याच्या प्रीतीच्या बक्षीस च्या बदल्यात असे काहीही नव्हते जे आम्ही त्यास देऊ शकत होतो.
परंतु आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता इंद्रियदमन हे आहे; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. (गलती ५:२२-२३)
आत्म्याच्या फळा मध्ये अगापे प्रीतीचाप्रथम उल्लेख केला आहे कारण ते सर्वांचा पाया असे आहे. प्रीति ही केवळ आत्म्याचे फळच नाही, परंतुहे मूळ सुद्धा आहे जे इतर सर्व फळांना निर्माण करते.प्रीति हे आनंद,शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता इंद्रियदमन यांचे मुख्य स्त्रोत आहे.
आत्म्याचे फळ हे पवित्र आत्म्याकडूनचयेते. जसे आपण पवित्र आत्म्यासोबत आपली प्रतीदिवसाची संगती ठेवण्याची काळजी घेतो. तो देवाच्या अगापे प्रीतीला आपल्या अंत:करणात भरेल. (रोम ५:५ वाचा)
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी २ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या,तुला पूर्णअंत:करणाने, पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने व पूर्ण शक्तीने प्रीति करण्यास मला शिकीव. येशूच्या नांवात, आमेन.
कुटुंबाचे तारण
पित्या, कृपा करून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या पुढेजा व प्रत्येक उंचसखल मार्ग सरळ कर व प्रत्येकखडबडीत मार्ग सपाट कर.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
पित्या, जसे शिष्य गेले व साक्षी द्वारे परत आले की सर्व गोष्टी त्यांच्या अधीन झाल्या आहेत; मला सुद्धा यश व विजयाच्या साक्षी सह परत येऊ दे.
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे उंचाविले व गौरविले जाईल.
देश
पित्या, येशूच्या नांवात,आणि येशूच्या रक्ता द्वारे, तुझा बदला दुष्टांच्या डेऱ्या मध्ये मोकळा कर आणि एक राष्ट्र म्हणून आमचे गमाविलेले गौरव पुनर्स्थापित कर. असे होवो की तुझी शांतिआमच्या देशावर राज्य करो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे ७ आत्मे: समज चा आत्मा● दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना
● दिवस ०७ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● चिंते वर वर्चस्व मिळविण्यासाठी, ह्या गोष्टींवर विचार करा
● योग्य दृष्टीकोन
● अडथळ्यांवरमात करण्याचे व्यवहारिक मार्ग
● लहान तडजोडी
टिप्पण्या