डेली मन्ना
27
27
953
स्वर्गाचे द्वार उघडा व नरकाचे द्वार जोरानेबंद करा
Tuesday, 18th of April 2023
Categories :
उपास व प्रार्थना
दाविदाने स्वतःला भावनिक अशांत स्थितीत पाहिले, जेथे त्यास केवळ अश्रुंचाच आसरा आहे असे दिसत होते जे अविरत वाहत खाली त्याच्या गालावरून मुखात जात होते. स्पष्टपणे, दावीद उपास करीत होता.
उपासाला अनेक काळापासून एक साधन म्हणून मानले जात आहे जे एखाद्याचे प्रभूबरोबरच्या संबंधाला मार्ग मोकळा करते. एखाद्या निश्चित केलेल्या समयासाठी अन्न वर्ज्य करण्याद्वारे, एखादा व्यक्ति त्याचा आत्मा जगाचे अडथळे आणि भौतिक विचारापासून स्वतंत्र करू शकतो, ज्याचा परिणाम आत्म्याची अत्युच्च संवेदना निर्माण होते. दाविदाने या सामर्थ्यशाली परिवर्तनाचा अनुभव केला, आणि म्हणून स्तोत्र ४२:७ हे लिहिले: "गहनता गहनतेला बोलावत आहे."
देवाबरोबर गहन संबंधासाठी दाविदाच्या आध्यात्मिक तळमळीने अन्न व पुरवठ्यासाठी त्याच्या शारीरिक गरजेवर मात केली होती. परिणामस्वरूप, तो त्या स्थानाकडे पोहचला जेथे तो देवाच्या गहनतेकडे त्याच्या आत्म्याच्या गहनतेमधून, त्याच्या संकटाच्या मध्य असताना देखील आक्रोश करू शकला. स्वर्गातील आशीर्वाद मोकळे करण्यास आणि नरकाचे दार बंद करण्यासाठी उपास ही एक शक्तिशाली किल्ली म्हणून आदरणीय आहे. या प्राचीन शिस्तीचे पालन करण्याद्वारे, कोणीही संधीचे उघडे दार, चमत्कारिक पुरवठा, दैवी कृपा, आणि त्यांच्या जीवनात देवाचा सौम्य व प्रेमळ स्पर्शासाठी मार्ग प्राप्त करू शकतो.
सध्याच्या जागतिक दुष्काळामुळे, कुटुंबे आणि राष्ट्रे नष्ट होण्याचा धोका आहे, त्यामुळे मला असा भास होत आहे की प्रभू मला उपास प्रार्थना घोषित करण्यास मार्गदर्शन करीत आहे. प्रत्येक आठवड्यात तीन दिवस (मंगळावर, गुरुवार आणि शनिवार) उपास प्रार्थना आयोजित करण्यात येईल. या उपासाचा मुख्य उद्देश हा करुणा सदनशी संबंधित असलेले [मग ते नोहा ऐप वर लाइव्ह पाहत असतील, दररोजचा मान्ना वाचत असतील, इत्यादी] किंवा प्रत्येक व्यक्ति आणि त्यांचे कुटुंब यांच्या आध्यात्मिक वाढीसाठी असेल. तसेच, या उपास-प्रार्थनेचा उद्देश हा जे लोक संपर्कात आहेत ते अलौकिकरित्या त्यांची आर्थिकता, नोकरी इत्यादी मध्ये आशीर्वादित व्हावेत हा आहे. माझ्याबरोबर सामील व्हा, म्हणजे आपण एकत्र मिळून आत्म्याच्या नवीन स्तरामध्ये प्रवेश करू या.
दररोज उपासाची वेळ ही ००:०० तास (रात्री १२ वाजता) आणि दुपारी १४:०० (२ वाजता) तासाला संपते. या कालावधी दरम्यान तुम्ही शक्य तितके पाणी प्या. दुपारी २ वाजल्यानंतर, तुम्ही तुमचे नियमित भोजन खाऊ शकता. या उपासात असताना तुम्ही शक्य तितके देवाचे वचन वाचा.
जर तुम्हांला काही प्रश्न किंवा सुचना असतील तर ते मला कळवा. तसेच, खालील टिप्पणी विभागात मला कळवा, जर तुम्ही या उपासात माझ्याबरोबर सामील होणार असाल.
लक्षात ठेवा, की परिस्थिती काहीही असो याची पर्वा नाही कारण प्रभू त्याच्या लोकांची काळजी नेहमीच घेईल. दाविदाने ते उत्तमपणे म्हटले आहे, "मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही." (स्तोत्र ३७:२५)
प्रार्थना
मला व माझ्या कुटुंबियांसाठी तुझ्या अविरतप्रीति साठी,पित्या मी तुझा धन्यवाद करतो.
मला व माझ्या घराण्यास जी सर्व दया तू दाखविली आहे त्यासाठी मी तुझा धन्यवाद करतो.
(परमेश्वराला धन्यवाद देत काही वेळ घालवा)
परमेश्वरा, येशूच्या नांवात, मला व माझ्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांनातेसर्व जे काही अधार्मिक आहे त्यापासून वेगळे कर.
पित्या, येशूच्या नांवात, माझ्यावर, माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर व प्रत्येक व्यक्ति जो करुणा सदन सभेला येत आहे त्यांच्यावर तुझा आत्मा ओत.
मला व माझ्या घराण्यास जी सर्व दया तू दाखविली आहे त्यासाठी मी तुझा धन्यवाद करतो.
(परमेश्वराला धन्यवाद देत काही वेळ घालवा)
परमेश्वरा, येशूच्या नांवात, मला व माझ्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांनातेसर्व जे काही अधार्मिक आहे त्यापासून वेगळे कर.
पित्या, येशूच्या नांवात, माझ्यावर, माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर व प्रत्येक व्यक्ति जो करुणा सदन सभेला येत आहे त्यांच्यावर तुझा आत्मा ओत.
Join our WhatsApp Channel

Most Read
● सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर भेट● परमेश्वराचा आनंद
● परमेश्वराला महिमा कसा दयावा
● सात-पदरी आशीर्वाद
● दिवस ३०:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● दार बंद करा
● पापी रागाचे स्तर उघडणे
टिप्पण्या