एक प्रश्न
तुम्ही कधी स्वतःला अशा आव्हानात्मक परिस्थितीत सापडलेले पाहिले आहे का की तुम्हांला पश्न पडला असेल की या सर्वांमध्ये देव कोठे आहे? कधीकधी, जीवनातील वादळे एवढ्या भयंकरपणे येतात की देवाचा हात काम करताना पाहणे कठीण होते. अशा वेळे दरम्यान, हे कालातीत सत्य लक्षात ठेवणे महत्वाचे आहे; जर तो काय करत आहे त्यासाठी तुम्ही त्याची स्तुती करू शकत नाही, तर तो कोण आहे यासाठी नक्कीच तुम्ही त्याची उपासना करू शकता.
“म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे देवाला नित्य अर्पण करावा.” (इब्री. १३:१५)
देवाचे स्वरूप
प्रेषित पौलाने अनेक अडथळ्यांचा सामना केला- तुरुंगवासापासून ते नौका फुटूपर्यंत. तरीही देव कोण आहे यावरून त्याचे लक्ष विचलित झाले नाही. २ करिंथ. ४:८-९ मध्ये त्याने लिहिले, “आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तर आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही.” ही वचने आपल्याला आठवण देतात की आपली परिस्थिती कशीही असो, देवाचे स्वरूप स्थिर असते. तो स्तंभ आहे जो आपल्या जीवनातून कधीही सरकत नाही.
स्तुती व उपासनेचे सहजीवन
जेव्हा जीवन सुरळीत चालू असते तेव्हा देवाची स्तुती करणे सोपे असते-जेव्हा बिले भरली जातात, आरोग्य चांगले असते आणि नातेसंबंध समृद्ध असतात. तरीही, रोम. ८:२८ आपल्याला आठवण देते, ““ परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.” जरी जेव्हा आपण “चांगले” पाहू शकत नसलो, तरी आपण देवाच्या अपरिवर्तनीय स्वरूपावर लक्ष केंद्रित करण्याची निवड करू शकतो, आपली उपासना त्याला प्रीतीचे पत्र म्हणून सादर करावे.
लक्ष केंद्रित करणे बदलणे
मत्तय १४:२९-३१ मध्ये,” पेत्र तोपर्यंत पाण्यावर चालला जोपर्यंत त्याने त्याचे डोळे येशूवरून हटवले नाही आणि वारा आणि लाटांवर लक्ष केंद्रित करू लागला. माझा विश्वास आहे येथे एक शिकवण आहे. जर येशूवरून आपले लक्ष दुसरीकडे करण्याने आपण बुडू शकतो, तर मग आपल्या परिस्थितींवरून आपले लक्ष येशूच्या स्थिर स्वरूपाकडे वळविण्याने, आपण गोंधळात शांती प्राप्त करू शकतो.
“माझ्या बंधुंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांला ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हांला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” (याकोब १:२-४)
परीक्षा आपल्याला परिष्कृत करू शकतात आणि आपले चारित्र्य पुन्हा परिभाषित करू शकतात. उपासनेची क्रिया ही आध्यात्मिकदृष्ट्या पुन्हा सावरण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी एक साधन आहे. उपासना सत्यतेचा नकार करत नाही परंतु देवाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीकोनातून आपली परिस्थिती पाहण्यासाठी आपल्याला उन्नत करते.
उपासनेत जगलेले जीवन
योसेफ, एक माणूस ज्याला त्याच्या स्वतःच्या भावांकडून गुलामिगीरीत विकले गेले, जे उपासनेने भरलेल्या जीवनाचे एक शक्तिशाली उदाहरण पुरवते. जरी चुकीने तुरुंगात टाकला गेला, आणि ज्यास विसरले गेले, तरीही देव कोण आहे यासाठी त्याने सतत उपासना चालू ठेवली. या वृत्तीने अखेरीस त्याला सन्मान आणि प्रभावाच्या ठिकाणी नेले. दुष्काळापासून संपूर्ण राष्ट्राचा बचाव केला. (उत्पत्ती ४१)
पवित्र शास्त्र देवाने परिस्थितीला वळण देणाऱ्या कथांनी भरलेले आहे. त्याने लाजराला मृत्युमधून उठविले (योहान ११:४३-४४), गंभीर परीक्षांनंतर इयोबाची मालमत्ता पूर्ववत केली (इयोब ४२:१०), आणि सर्वात महत्वाचे, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे मृत्यूला पराजित केले (मत्तय २८:५-६). तो खरोखर पुनरागमन करणारा परमेश्वर आहे.
उपासना ही केवळ रविवार-मर्यादित कृती नाही परंतु एक जीवनशैली आहे. उपासनेला आपल दररोजचे बलिदान करावे, तुमच्या आयुष्यातील वातावरणाची पर्वा न करता, कारण आपण त्या देवाची उपासना करतो जो काल, आज आणि सर्वकाळ सारखाच आहे. (इब्री. १३:८)
म्हणून, जीवनाच्या गुंतागुंतीतून मार्गक्रमण करताना, हे लक्षात ठेवा की तो काय करत आहे यासाठी जर तुम्ही अजुनही त्याची स्तुती करत नाही, तर तो कोण आहे यासाठी तुम्ही त्याची नक्कीच उपासना करू शकता.
प्रार्थना
पित्या, आमच्या संकटांच्या परीक्षांमध्ये, तू अपरिवर्तनीय आहे हे लक्षात ठेवण्यास आम्हांला मदत कर. जेव्हा आम्ही तुझा हात पाहू शकत नाही, तेव्हा तुझ्या अंत:करणाचा अनुभव येऊ द्यावा. तू काय करतो केवळ त्यासाठी नाही तर तू कोण आहे यासाठी तुझी उपासना करण्यास आम्हांला शिकव. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● उपासनेचा सुगंध● देव पुरस्कार देणारा आहे
● आत्म्याद्वारे मार्गदर्शित होणे याचा काय अर्थ आहे?
● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
● येशूला पाहण्याची इच्छा
टिप्पण्या