देवाचा देवदूत योसेफाला एका तातडीच्या संदेशासह प्रकट झाला की तो सकाळच्या प्रकाशाची वाट पाहू शकत नाही. “ऊठ, बालक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा; कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे” (मत्तय २:१३).
मनोरंजक गोष्ट म्हणजे योसेफाने संकोच केला नाही. त्याक्षणाचा मूर्खपणा, गैरसोय, आणि धोका असतानाही, योसेफ रात्रीच्या वेळी उठला आणि आपल्या कुटुंबाला घेऊन मिसर देशास निघून गेला. त्याच्या ताबडतोब आज्ञापालनाने, येशूचे जीवन वाचवले, भविष्यवाणी पूर्ण केली: “मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे.” (मत्तय २:१५)
आपले जीवन गोंगाटाने भरलेले आहे : सामाजिक माध्यमांची प्रचलित माहिती, बातम्या चक्र आणि नवीनतम प्रथा. गोंगाटाच्या मध्ये, देवाची वाणी नेहमी “सौम्य कुजबुज” म्हणून येते. “भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला; पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता; त्या अग्नीनंतर शांत, मंद वणी झाली.” (१ राजे १९:१२)
योसेफाला स्वप्नात बोललेल्या देवदूताप्रमाणे, देव कदाचित तुम्हांला आता सध्या शांत आणि सौम्य वाणीने बोलत असेन, तुम्हांला एखाद्या दिशेकडे, संभाव्य हानीपासून दूर किंवा मोठ्या आशिर्वादाकडे नेत आहे.
योसेफाचे आज्ञापालन हे केवळ अचूक असे नव्हते, तर ते वेळेवर होते. तेव्हा तो उठला आणि बालक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला” (मत्तय २:१४). आपल्या आध्यात्मिक जगण्यात, हे नेहमी पुरेसे नाही की केवळ देवाची वाणी ऐकावी, वेळ ही महत्वाची आहे.
नोहा तारू बनवीत आहे (उत्पत्ती ६) किंवा मोशे इस्राएली लोकांना मिसर देशातून बाहेर नेत आहे (निर्गम १२-१४) याबद्दल विचार करा. देवाने जे म्हटले आहे हे केवळ तेव्हढेच करणे नव्हते परंतु जेव्हा त्याने हे म्हटले तेव्हाच ते करणे होते.
योसेफाची कथा दाखवते की दैवी मार्गदर्शनाला ऐकणे आणि त्यानुसार वागण्यास लहरी प्रभाव असू शकतात जे आपल्या समजण्याच्या पलीकडे जातात. जेव्हा तुम्ही आज पुढे चालता, त्याच्या वाणीला तुमचे कान द्या आणि चालण्यास तयार व्हा. तुमचा आज्ञाधारकपणा हा भविष्यासाठी भाकीत मुद्दा असू शकतो ज्यास तुम्ही अद्याप पाहू शकत नाही.
प्रार्थना
पित्या, आम्हांला तुझी वाणी स्पष्टपणे ऐकणारे कान आणि आज्ञाधारक अंत:करणे दे की तुझ्या उपदेशानुसार त्वरित कृती करावी. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आपल्या हृदयाचे प्रतिबिंब● बेखमीर अंत:करण
● दुसरे अहाब होऊ नका
● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
● विश्वासाद्वारे प्राप्त करणे
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● इतरांसाठी मार्ग प्रकाशित करणे
टिप्पण्या