“ह्यावरून तो म्हणाला, “देवाचे राज्य कशासारखे आहे? मी त्याला कशाची उपमा देऊ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याने घेऊन आपल्या मळ्यात पेरला, मग तो वाढून त्याचे झाड झाले; आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यांत राहू लागली.” (लूक १३:१८-१९)
कधीकधी आपण लहान कृती, लहान निर्णय आणि होय लहान बियांच्या देखील सामर्थ्याला कमी लेखतो. मी विश्वास ठेवतो की जेव्हा आपण बिया जाणीवपूर्वक पेरण्याची निवड करतो, हे ओळखून की कोणतेही बी इतके लहान नसते जेव्हा त्यास देवाच्या राज्याच्या सुपीक जमिनीत पेरले जाते.
पुरातत्वशास्त्रज्ञांनी अलीकडेच एक प्राचीन पिऱ्यामीड उघडला, तेव्हा हे पाहिले की हजारो वर्षे जुन्या बिया, अजूनही संरक्षित आणि न वापरलेल्या होत्या. या बियांमध्ये जीवनासाठी मोठी शक्ती असते, पण ते अचल असेच राहिले होते कारण त्यांना कधीही पेरले गेले नव्हते. पवित्र शास्त्र सांगते, “ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.” (याकोब २:१७)
चांगले हेतू हे त्या बियांप्रमाणे आहेत, पूर्ण शक्तीसह पण कार्य केल्याशिवाय निरुपयोगी. एका मित्रासाठी न बोललेली प्रार्थना, देवाचे कार्य जे तुम्हांला नेहमीच करायचे होते पण तुम्ही ते कधीही केले नाही, किंवा आध्यात्मिक वरदाने तुम्ही अचल अशीच ठेवली असे काहीही असो, कापणी करण्यासाठी तुमचे हेतू पेरणे आवश्यक आहे.
कोणतेही बियाणे लहान नाही:
अर्थपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी आपण काहीतरी मोठे केले पाहिजे असे आपल्याला अनेकदा वाटते. तरीही, प्रभू येशूने आपल्याला सांगितले आहे की देवाचे राज्य हे मोहरीच्या दाण्यासारखे आहे,-लहान परंतु जेव्हा पेरले जाते तेव्हा अत्यंत फलदायक.
“तर कार्याच्या अल्पारंभाचा दिवस कोणी तुच्छ मानतो काय?’.....” (जखऱ्या ४:१०)
दयाळूपणाची एक माफक कृती, सेवेसाठी मध्यस्थी, किंवा प्रभूच्या कार्यासाठी लहान बिया देखील आपल्या कल्पनेच्या पलीकडे काहीतरी वाढू शकतात. एक लहानसे प्रोत्साहनपर शब्द एखाद्याचे जीवन बदलू शकते. विश्वासात एक लहान पाऊल हे चमत्कारिक परिणामाकडे नेऊ शकते.
बिया पेरणे आणि गरजा पुरवणे:
जीवनाच्या आपल्या स्वतःच्या बागेत, आपल्याला विविध बिया पेरावयाच्या आहेत-प्रीती, दयाळूपणा, आनंद, शांती आणि विश्वासाच्या बिया. जेव्हा या बियांना पेरले जाते, तेव्हा ते केवळ आपल्याला आशीर्वादित करत नाहीत तर जे आपल्या सभोवती आहेत त्यांना देखील. ते उंच व बळकट वाढतात आणि इतरांना सावली आणि आश्रय देतात.
“चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” (गलती. ६:९)
लक्षात घ्या, हे केवळ बिया पेरण्याबद्दल नाही, तर ते त्यातून काय वाढते त्याबद्दल देखील आहे. एक पूर्ण वाढलेले झाड केवळ सुंदरतेपेक्षा बरेच काही अधिक पुरवते –ते पाखरांसाठी घर पुरवते, थकलेल्यांसाठी आसरा, आणि कधीकधी भुकेल्यांसाठी फळे.
“नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो.” (नीतिसूत्रे ११:३०)
मोहरीचा दाणा जो एका मोठ्या झाडासारखा होतो, त्याप्रमाणे तुमच्या लहान कृत्यांचे फार मोठे परिणाम होऊ शकतात, म्हणजे ते जे गरजेमध्ये आहेत त्यांना भावनात्मक, आध्यात्मिक किंवा शारीरिक आश्रय देखील पुरवू शकतात.
व्यवहारिक पाऊले:
१. तुमच्या गरजा ओळखा: कोणत्या बिया देवाने तुम्हांला सोपविल्या आहेत? तुमचा वेळ, तुमची वरदाने, तुमचे स्त्रोत इत्यादी?
२. तुमच्या बागेला शोधा: कोठे सुपीक जमीन आहे जेथे कापणी करण्यासाठी देव तुम्हांला बोलवत आहे? तुटलेले नातेसंबंध, संघर्षात असलेला समाज, चर्चमध्ये एक अर्थपूर्ण कारण?
३. परिश्रमपूर्वक पेरा: बियांना केवळ अस्तव्यस्तपणे विखरू नका. हेतुपूर्वक असा. उद्देशाने प्रार्थना व कार्य करा.
नेहमी हे लक्षात ठेवा, देवाचे राज्य केवळ भव्य हावभाव आणि नाट्यमय क्षणांवर बनविले जात नाही, तर ते दररोजच्या विश्वासाच्या आणि प्रीतीच्या कार्यावर बनवले जाते. म्हणून तुमच्या जीवनाचे पर्स किंवा खिशामधून बिया घ्या आणि त्यांना विश्वासात पेरा, कारण “लहान बिया देखील मोठ्या गरजा पूर्ण करू शकतात” . पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे आठवण देते, ““चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.” (गलती. ६:९)
चांगले हेतू हे बियांप्रमाणे आहेत- पूर्ण शक्तीसह पण कार्य केल्याशिवाय निरुपयोगी.
प्रार्थना
पित्या, बिया कितीही लहान असल्या तरी-तू ज्या बिया आम्हांला दिल्या आहेत ते ओळखण्यास आम्हांला समर्थ कर. आम्हांला सुपीक जमिनीकडे मार्गदर्शन कर जेथे आम्ही विश्वास व प्रितीमध्ये पेरू शकावे. आमची लहान कृती आश्रय आणि आनंदाच्या मोठ्या झाडामध्ये बहरून येऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आपल्यामध्येच खजिना● विश्वासाद्वारे प्राप्त करणे
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
● कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक आहे काय?
● तुम्हाला कोण मार्गदर्शन करीत आहे?
● ख्रिस्ताबरोबर बसलेले
टिप्पण्या