एक मेंढपाळ शंभर मेंढरांसह, जो हे ओळखतो, की एक गमावले आहे, तो नव्व्याण्णव मेंढरांना रानात सोडतो आणि न थकता हरवलेल्या एकाचा शोध घेतो. "तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही?" (लूक १५:४)
हे देवाच्या हृदयाचे ज्वलंत चित्र रंगवते- एक मेंढपाळ इतका प्रेमळ की त्याचे प्रत्येक मेंढरू त्याच्यासाठी मौल्यवान आहे. स्तोत्रकर्ता आपल्याला स्मरण देतो, "परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही" (स्तोत्र. २३:१). येथे मेंढपाळाचे चित्रण केले आहे, केवळ संख्यांची काळजी घेणारा नाही परंतु आत्म्यांची काळजी घेणारा, जे प्रत्येक व्यक्तीवर देवाने ठेवलेल्या अतुलनीय मुल्यांवर प्रकाश टाकते.
जेव्हा मेंढपाळास हरवलेले मेंढरू सापडते, तेव्हा तो त्याला शिक्षा करत नाही, पण त्याऐवजी तो त्याला त्याच्या खांद्यावर घेऊन आनंद करतो. हे कृत्य, ख्रिस्ताची उद्धार देणारी कृपा प्रतिबिंबित करते, जो आपले ओझे उचलून घेतो आणि त्याच्या प्रेमाने आपल्याला आलिंगन देतो. "अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन" (मत्तय ११:२८).
हा आनंद एकाकी नाही; ते मित्र आणि शेजाऱ्यांना सांगितले जाते. "माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा" (लूक १५:६). हा एक मूक उत्सव नाही, तर एक सार्वजनिक घोषणा आहे, एका पश्चाताप करणाऱ्या पाप्यावरील स्वर्गीय आनंदाचे प्रतीक आहे. आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये तर सर्वांनी पश्चाताप करावा. (२ पेत्र. ३:९)
जेव्हा आपण पाप करतो, तेव्हा आपण भटकतो, भटकलेल्या मेंढरासारखे होतो. परंतु आपला मेंढपाळ, येशू, आपल्याला सोडत नाही. त्याचा पाठलाग अथक आहे, त्याचे प्रेम अनंत आहे. रोम. ५:८ मध्ये, आपल्याला खातरी मिळते, "परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाणे हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला."
प्रभू येशू पाप्यांचा स्वीकार करत आहे याबद्दल परुश्याच्या कुरकुर करण्याच्या विरोधात देवाच्या अमर्याद दयेला देखील हा दाखला स्पष्ट करतो. त्यांच्या स्वयं-धार्मिकतेने त्यांना पश्चातापाची गरज नाही म्हणून आंधळे केले होते, आपल्या स्वयं-धार्मिक वृत्तींपासून सावध राहण्यासाठी आणि देवाच्या कृपेची आपली कायमची गरज ओळखून नम्रता स्वीकारणे.
आज, चला आपण प्रेमळ मेंढपाळाचे स्मरण करू या जो प्रत्येक मेंढरांना महत्त्व देतो, आणि हरवलेल्या प्रत्येक मेंढरांना शोधू पर्यंत अथक प्रयत्न करतो. आपल्याला मिळालेल्या कृपेबद्दल आपले अंत:करण कृतज्ञतेने कंपित व्हावे आणि या जगाच्या हरवलेल्या मेंढरांना ख्रिस्ताचे मुक्त करणारे प्रेम सांगण्याच्या उत्कट इच्छेने परिपूर्ण व्हावे, आणि त्यांना मेंढपाळाच्या घनिष्ठतेत परत न्यावे.
मी हे लिहिले नसते, आणि तुम्ही हे वाचले नसते, जर एखाद्याने काही वर्षांपूर्वी मला ख्रिस्ताचे प्रेम सांगितले नसते. तर पुढे व्हा आणि दररोज कोणाला तरी ख्रिस्ताने तुमच्याबरोबर काय केले आहे ते सांगा. तुम्ही कधी याची कल्पनाही करणार नाही की वृद्धी ते आणतील.
प्रार्थना
प्रिय स्वर्गीय पित्या,
प्रभू, आमची अंत:करणे तुझ्या प्रीतीने प्रज्वलित कर. आमच्या पावलांना मार्गदर्शन कर, जेणेकरून आम्ही तुझ्या कृपेचे दिवे होऊ शकावे, आणि हरवलेल्या आत्म्यांना तुझ्याजवळ परत आणावे. प्रत्येक नवीन दिवशी आमच्या विश्वासात मजबूत कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● बीज चे सामर्थ्य - २● ते खोटेपण उघड करा
● अशी संकटे का?
● त्याच्याद्वारे काही मर्यादा नाही
● स्वप्न हे देवाकडून आहे हे कसे ओळखावे
● सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर भेट
● आत्म्याची नावे आणि शीर्षक: देवाचा आत्मा
टिप्पण्या