जीवन अनेकदा विजय आणि पतन यांचे मिश्रण असलेल्या अनुभवांचे रंगमंच म्हणून उलगडते. प्रेक्षक या नात्याने, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या कथांशी आपण कसे गुंतून राहावे याची आपल्याला निवड असते. काहींना इतरांच्या दुर्दैवात करमणूक वाटू शकते, पण खरे शहाणपण त्यांच्यातील धडे शोधण्यात आहे.
“मुर्खाला समंजसपणात संतोष वाटत नाही, तर केवळ आपल्या मनात जे काही आहे ते प्रकट करण्यातच त्याला संतोष वाटतो.” (नीतिसूत्रे १८:२)
जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीच्या पतनाच्या कथांचा सामना करतो, तेव्हा गप्पांच्या सुरात सामील होणे सोपे असते. चर्चा करणे, विश्लेषण करणे आणि न्याय करणे देखील मोहक आहे. मूर्ख व्यक्ती विचार न करता अशा गप्पांमध्ये भाग घेतो, गर्व किंवा अहंकाराने प्रेरित असतो, कधीकधी स्वतःबद्दल उत्तम असे वाटत असते.
“गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.” (नीतिसूत्रे १६:१८)
तथापि, शहाण्या माणसाला हे समजते की प्रत्येक व्यक्तीचा प्रवास, त्यांच्या अडचणींसह, एक मौल्यवान धडा देऊ शकतो. त्यास केवळ गप्पांचा चारा म्हणून पाहण्याऐवजी, ते त्याला आरसा म्हणून पाहतात, मानवी दुर्बलतेचे प्रतिबिंब ज्यामध्ये आपण सर्व जण सहभागी आहोत. ते हे ओळखतात की त्यांच्यासह, प्रत्येक जण हा निर्णय किंवा कृतींमधील त्रुटींसाठी संवेदनाक्षम आहे.
“सर्वांनी पाप केले आहे, आणि देवाच्या गौरवाला अंतरले आहेत.” (रोम. ३:२३)
प्रेषित पौलाचा प्रवास एक उदाहरण देण्याचे कार्य करते. दमास्कसच्या मार्गावर येशूसोबतच्या त्याच्या परिवर्तनीय भेटीपूर्वी, पौल (पूर्वीचा शौल) मंडळीचा छळ करणारा होता. तरीही, त्याच्या परिवर्तनानंतर, त्याच्या भूतकाळातील चुका ह्या देवाच्या परिवर्तनीय सामर्थ्यासाठी साक्षी अशा झाल्या, अंतहीन गप्पांचा स्त्रोत नाही.
“म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.” (२ करिंथ. ५;१७)
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक पतन जे आपण अनुभवतो ते याची आठवण देते की कोणीही चुकांपासून मुक्त नाही. निंदा आणि न्याय करण्यामध्ये सामील होण्याऐवजी, आत्मपरीक्षण करणे हे शहाणपणाचे होईल., याची खातरी करत की आपण स्वतःदेखील त्याच मार्गावरून चालत नाही, आणि आयुष्याच्या जटील मार्गातून दिशा काढण्यासाठी देवाच्या मार्गदर्शनासाठी धावा करा.
“तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, .... “ (२ करिंथ. १३:५)
इतरांच्या कथांनीही करुणेला आमंत्रण दिले पाहिजे. सहानुभूतीने निर्णयाची जागा घेतली पाहिजे. दुसऱ्यांच्या चुकांबद्दल बोलणे सोपे आहे. तथापि, हे शहाणपणाचे आहे की, मदतीचा हात देणे, प्रार्थना करणे, किंवा सरळपणे ते समजणे, जर ते देवाची कृपा नसती तर आपल्यापैकी ते कोणीही असू शकला असता.
“एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.” (गलतीकरांस ६:२)
जेव्हा आपण जीवनाचा प्रवास करतो, तेव्हा आपण इतरांच्या अनुभवातून शिकलेल्या धड्यांपासून मार्गदर्शनाने चालावे. आपली मने आणि अंत:करणे निंदेने भरण्याऐवजी, त्यास शहाणपण आणि समजेने भरून काढू या. प्रत्येक कथा, प्रत्येक पतन शिकणे आणि वाढण्यासाठी, आणि, आपल्या प्रभूच्या जवळ येण्यासाठी संधी आहे
“ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते; ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालते.” (नीतिसूत्रे १६:२३)
म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही इतरांच्या निंदेमध्ये सामील होणे किंवा पतनामध्ये आनंदित होण्याच्या मोहात पडता, तेव्हा थोडे थांबा आणि त्यावर चिंतन करा. तुमच्या स्वतःला विचारा, “हे मला काय शिकवू शकते?” असे करण्याने, तुम्ही केवळ शहाणपणात वाढत नाही परंतु कृपा आणि करुणेने भरलेले अंत:करण जोपासता.
प्रार्थना
पित्या, जेथे इतर निंदा पाहतात तेथे शिकवण पाहण्यासाठी मला समजूतदारपणा प्रदान कर. इतरांकडे मी नेहमीच करुणेचा दृष्टीकोन ठेवावा असे होऊ दे, हे ओळखून की आपण सर्व जण प्रवासात आहोत. शहाणपण आणि कृपेमध्ये वाढण्यास मला मदत कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०४ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● लहान तडजोडी
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● छाटण्याचा समय-३
● पवित्रआत्म्याच्या सर्व वरदानांची मी इच्छा करू शकतो काय?
● देवाच्या प्रेमाचा अनुभव घेणे
टिप्पण्या