यहूदा इस्कर्योत, मूळ बारा शिष्यांतील एक, एक सावधीगीरीची कथा पुरवते जी पश्चाताप न करणाऱ्या आणि शत्रूच्या प्रलोभनांना बळी पडणाऱ्या हृदयाची धोक्यांची स्पष्ट आठवण करून देते. यहूदाच्या कथे द्वारे, आपण पापाचे स्वरूप आणि आपल्या अंत:करणाचे रक्षण करण्याचे महत्व याबद्दल अमुल्य समज प्राप्त करतो.
शिकवण #१: लहान तडजोडी मोठ्या अपयशाकडे नेते
कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे: ज्याचा काहींना लोभ धरला, ते विश्वासापासून दूर गेले आणि त्यांनी स्वतःला दू:खांनी भोसकले. (१ तीमथ्यी ६:१०)
यहूदाचे पतन एका रात्रीत झाले नाही. त्याची सुरुवात किरकोळ उल्लंघनापासून झाली. थैलीमधून पैसे चोरून, यहूदाने त्याच्या हृदयात लोभ निर्माण होऊ दिला. अशा वरवर क्षुल्लक निवडी अनेकदा मोठ्या पतनासाठी पाया घालतात. ह्या छोट्या तडजोडींना अधिक धोकादायक बनवण्याआधी ते ओळखणे आणि त्यांचे निराकरण करणे अत्यावश्यक आहे.
शिकवण #२: केवळ बडबड परिवर्तनाची हमी देत नाही
“माला प्रभुजी, प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, त्याचा होईल.” (मत्तय ७:२१)
यहूदा, येशूच्या अत्यंत जवळचा, अनेकदा त्यांच्या शेजारी बसला होता, चमत्कारांचा साक्षीदार झाला होता, आणि त्याची शिकवण प्रथम ऐकणारा होता. तथापि, ख्रिस्ताशी केवळ जवळीक आपोआप परिवर्तन घडवून आणत नाही. फक्त स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेतल्याने काहीही बदलत नाही. त्यासाठी प्रामाणिक अंत:करण आणि खरा पश्चाताप आवश्यक आहे. प्रामाणिक संबंध आणि ख्रिस्ताच्या अधीन झाल्यावाचून, सर्वात अधिक जवळीक देखील निरर्थक ठरू शकते.
शिकवण #३: कबूल न केलेले पाप शत्रूंच्या प्रभावासाठी द्वारे उघडते
“जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” (१ योहान १:९)
यहूदाच्या चोरीच्या कबूल न केलेल्या पापामुळे तो सैतानाच्या प्रभावाला बळी पडला. क्षमा मागण्याऐवजी, त्याने त्याचे अपराध लपविले, शत्रूला पाय रोवण्यास जागा दिली. सैतानाने याचा फायदा घेतला, आणि यहूदाला विश्वासघाताच्या मार्गावर नेले. पापकबुली हे केवळ क्षमा आणत नाही परंतु शत्रूच्या हल्याविरुद्ध संरक्षक अडथळा म्हणून देखील कार्य करते.
यहूदाच्या कथेचे विश्लेषण करताना, हे स्पष्ट होते की त्याचा विश्वासघात करण्याचा प्रवास अनेक निवडींच्या मालिकेतून मोकळा झाला होता. पश्चातापाची अनुपस्थिती आणि पापाच्या मोहापायी त्याची नम्रता यामुळे त्याला ख्रिस्ताच्या प्रकाशापासून दूर नेले आणि शत्रूच्या तावडीत ओढून घेतले. विश्वासणारे म्हणून, जेव्हा आपण देवाच्या मार्गापासून भरकटतो तेव्हा जे धोके लपून राहतात त्या धोक्यांची ज्वलंत आठवण म्हणून यहूदाची कथा कार्य करते. हे जागृत राहणे, सतत आपल्या अंत:करणाचे परीक्षण करणे आणि क्षमा मागणे याचे महत्व अधोरेखित करते.
याशिवाय, यहूदाची कथा ही खऱ्या पश्चातापाच्या महत्वाबद्दल सर्व विश्वासणाऱ्यांना एक स्पष्ट आव्हान आहे. चर्चमध्ये असणे, धार्मिक विधींमध्ये भाग घेणे आणि आध्यात्मिक नेत्यांच्या अत्यंत जवळ राहणे देखील हे एखाद्याचे पापाच्या धोक्यांपासून संरक्षण करू शकत नाही. परिवर्तन हे हृदयात घडते, आणि त्यासाठी पापापासून प्रामाणिकपणे मागे वळण्याची आणि ख्रिस्ताकडे वळण्याची आवश्यकता लागते.
जेव्हा आपण पुढे जातो, आपल्याला ज्या छोट्या तडजोडी करण्याचा मोह होऊ शकतो त्यापासून सावध राहू या, त्यांच्यामुळे होणारे संभाव्य परिणाम समजून घेऊ या. चला आपण प्रामाणिकपणे ख्रिस्ताचा धावा करू या आणि केवळ त्याच्याजवळ राहू नये. आणि सर्वात महत्वाचे, आपण आपल्या तारणकर्त्याशी संवादाचा संपर्क नेहमी खुला ठेवू या, आपल्या पापांची कबुली देऊन आणि प्रत्येक चरणात त्याचे मार्गदर्शन शोधू या.
प्रार्थना
प्रिय पित्या, शत्रूच्या सूक्ष्म सापळ्यापासून आमच्या अंत:करणाचे रक्षण कर. आमच्या चुकीची पाऊले ओळखण्यास आणि खऱ्या पश्चातापाकडे नेण्यास आम्हांला मदत कर. आम्ही तुला नेहमी प्रामाणिकपणे शोधत राहावे, आणि तुझ्यासोबतचे आमचे नाते सत्य आणि प्रेमात रुजलेले आहे याची खात्री करावी. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कृपे द्वारे तारण पावलो● रविवारी सकाळी मंडळीमध्ये वेळेवर कसे यावे?
● आत्म्याद्वारे मार्गदर्शित होणे याचा काय अर्थ आहे?
● तुमचा दिवस तुमची व्याख्या देतो
● प्रकाश हा वचना द्वारे येतो
● किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे
● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
टिप्पण्या