१६ मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत. १७ त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे. १८ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत. १९ त्यालाही त्याने म्हटले, तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.” (लूक १९:१६-१९)
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या हृदयात सामर्थ्याचे बीज दडलेले असते, एक दैवी मोहर आहे जी धन्याने आपल्यावर सोपवली आहे, जे देवाने आपल्यामध्ये ठेवलेल्या प्रतिभा आणि वरदानांचे रूपक आहे. लूक १९:१६-१९ दास आणि बक्षीस यांचे ज्वलंत चित्र रंगवते, जे राज्याच्या गहन तत्वावर जोर देते. आपल्या विश्वासूपणाचे माप आपल्याला दिलेले अधिकार क्षेत्र ठरवते.
मोहरेची कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक दासाला काहीतरी लहान दिले गेले होते- एक मोहर. पहिला दास जे त्याला सोपवले गेले आहे त्याचे मूल्य ओळखतो, परिश्रमपूर्वक काम करतो आणि आणखी दहा कमवतो. दुसरा देखील त्याच्या मोहरांना दुप्पट करतो, जरी कमी प्रमाणात, पाच अधिक मोहरे कमवतो. त्यांची प्राप्ती हे केवळ संख्यात्मक वाढ नव्हती परंतु त्यांच्या विश्वासूपणाचा आणि मोठ्या जबाबदारी हाताळण्याच्या क्षमतेचा पुरावा म्हणून पाहिले गेले.
पवित्र शास्त्राचे तत्व, “जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; (लूक १६:१०) हे या कथानकात ज्वलंत होते. पहिल्या दासाचे दहा पट कमावणे हे केवळ एक वादळ नव्हते; ते त्याचे परिश्रम, क्रियाशीलता आणि चिकाटीची साक्ष होती. त्याचप्रमाणे, दुसऱ्या दासाचे पाच पट वाढवणे हे त्याचे प्रयत्न आणि विश्वासूपणा दाखवते.
देवाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विश्वासूपणा हा सोन्यापेक्षा अधिक मूल्यवान आहे. हे ते चलन आहे जे विश्वासूपणा विकत घेते आणि महान कार्यासाठी दारे उघडते. जसे मत्तय २५:२१ मध्ये पाहिले आहे, विश्वासू दासाला केवळ अधिक कार्य देण्याद्वारे पुरस्कृत करण्यात आले नाही, तर धन्याकडून आनंदाने देण्यात आले-‘शाबास, भल्या दासा;...तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.”
पहिल्या दासाच्या दहा पट बहुगुणीत करण्यामुळे त्याला दहा नगरांवर अधिकार देण्यात आला. तर दुसऱ्या दासाचे पाच पट वाढवण्यामुळे त्याला पाच नगरांवर अधिकार मिळाला. जे दिले गेले होते त्याला बहुगुणीत करण्याच्या त्यांच्या विश्वासूपणाचा आणि त्यानंतरचा अधिकार यांच्यातील हा थेट संबंध हे एक तत्व आहे जे संपूर्ण पवित्र शास्त्रात प्रतिध्वनित होते. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे ३:५-६ प्रभूवर विश्वास ठेवण्यास आणि त्याचा स्वीकार करण्यास प्रोत्साहन देते, जे त्याला आपला मार्ग सरळ करण्याकडे नेते-प्रभाव व आशीर्वादाचे आपले क्षेत्र वाढविण्याचा एक प्रकार.
शब्बाश! माझ्या भल्या दासा, तू चागले केलेस” (लूक १९:१७). येथे दास आणि उत्कृष्ट दास आहेत. उत्कृष्ट दास जे आवश्यक आहे तेच केवळ करत नाही तर उत्कृष्टतेने आणि उत्कटतेने सेवा देण्यापलीकडे जातो. कलस्सै. ३:२३-२४ आपल्याला मनापासून सेवा करण्यास प्रोत्साहन देते, “जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हांला मिळेल हे तुम्हांला माहित आहे.
आपण उत्कृष्ट दास कसे होऊ शकतो? देवाने आपल्याला दिलेल्या वरदानांना वाढवत आणि इतरांची सेवा प्रीती आणि समर्पणाने करणे जे देवाचे हृदय प्रतिबिंबित करते. जसे १ पेत्र. ४:१० म्हणते, “प्रत्येकाला जसे कृपादान मिळाले आहे तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाऱ्यांप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा.”
तुमची मोहर काय आहे? देवाने तुमच्यावर काय सोपवले आहे की तो ते वाढविण्यास तुम्हांला सांगत आहे? ती प्रतिभा, स्त्रोत, किंवा प्रोत्साहनाचे शब्द देखील असू शकते जे तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. जेव्हा तुम्ही ह्या थोड्या गोष्टींविषयी विश्वासू राहता, तेव्हा देव तुमच्यासाठी वाढीव अधिकारासाठी तयारी करतो –तुमचे कुटुंब, समाज आणि त्याहीपलीकडे तुमचा प्रभाव.
जेव्हा आपण विश्वासुपणे सेवा करतो, तेव्हा आपण आदराचे पात्र होतो, प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार. २ तीमथ्य. २:२१ आपल्या स्वतःला पवित्र म्हणून वेगळे करण्यापासून जे परिवर्तन येते त्यावर जोर देते- देवाचे काम करण्यास तयार आणि प्रत्येक चांगल्या कृत्यासाठी उपयोगात आणण्यास तयार.
विश्वासू दासाची कथा आपल्याला आठवण देते की येथे पृथ्वीवरील आपल्या कामाला शाश्वत महत्व आहे. विश्वासूपणाचे बीज जे आपण आज पेरतो, ते राज्यासाठी प्रभावाचा वारसा प्राप्त करेल आणि छाप पाडेल.
प्रार्थना
पित्या, जी मोहरे तू आम्हांला दिली आहेत त्यासाठी विश्वासू सेवक होण्यास आम्हांला शक्ती प्रदान कर. आमचे हात परिश्रमपूर्वक कार्य करोत, आमची हृदये उत्कटतेने कार्य करोत, आणि आमची जीवने तुझ्या उत्कृष्टतेला प्रतिबिंबित करो असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सुवार्ता पसरवा● देवाचे ७ आत्मे: समज चा आत्मा
● कालच्यास सोडून द्यावे
● आपल्या पाठीमागे पूल हे जळत आहेत
● शेवटची घटका जिंकावी
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-२
टिप्पण्या