डेली मन्ना
चमत्कार करणारा परमेश्वर जो आवश्यकतेपेक्षा अधिक आहे
Tuesday, 28th of November 2023
25
19
1182
Categories :
प्रार्थना
ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली तेव्हा कालेबाने तिला विचारले, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, मला एक देणगी दया; तुम्ही मला नेगेब दिले आहे, तेव्हा मला पाण्याचे झरेही दया; तेव्हा त्याने वरचे झरे आणि खालचे झरे तिला दिले. (यहोशवा १५: १८-१९)
आज, आपल्या वचनात, आपण पाहतो की अखसा ने तीचा पिता कालेब ला सांगितले, तिला दक्षिणेकडची भूमि देण्यात आली आहे, ज्याचा इब्री भाषेत अर्थ, "कोरडी" आहे. हे ह्या कारणासाठी की पैलेस्टाईन मधील दक्षिणेकडची भूमि ही वाळवंटा सारखी कोरडी होती. अखसा तीचा पिता कालेब ला हे सांगत आहे की तिच्याकडे ती "अनुत्पादक भूमि" आहे.
जेव्हा ती तिच्या पित्याकडे आली, हेच काय तिने मागितले.
"मला पाण्याचे झरेही दया." ती संकोच करणारी नव्हती. ती तिच्या पित्याकडे धैर्याने व आत्मविश्वासाने आली ज्याने तिच्यावर प्रीति केली आणि ते मान्य केले
धैर्यवान असणे याचा अर्थ निरादर करणारे असे नाही. लक्षात घ्या, पवित्र शास्त्र सांगते, "ती गाढवावरून उतरली," तिने तिच्या पित्याला तो आदर दिला जो योग्य होता. (रोम १३:७ वाचा)
आणि आता ही कथा आपल्या सर्व स्वप्नांच्याही पलीकडे जाते आणि त्या स्तरा मध्ये जाते ज्याविषयी प्रेषित पौलाने इफिस येथील ख्रिस्ती लोकांना सांगितले होते, की आपला परमेश्वर काय करेल, "अधिक्याने देतो जे काही आपण मागतो किंवा विचार करतो. (इफिस ३:२०)
जर पृथ्वीवरील पिता कालेब कडे असे हृदय आहे, जेथे त्याने त्याच्या मुलीला तिने मागण्यापेक्षा अधिक आशीर्वाद दिला, तर मग आपला स्वर्गीय पिता आपल्याला त्याहुनही कितीतरी अधिक देईल?
आपल्या देवाचे एक नाव यहोवा यीरे आहे, याचा अर्थ "जो सर्व पुरवठा करणारा" आहे. तो नेहमीच आवश्यकतेपेक्षा अधिक पुरवितो. तोच परमेश्वर जो आवश्यकतेपेक्षा अधिक आहे जो शरीराने आला आणि त्याच्या लोकांमध्ये वस्ती केली. जेव्हा तो गालील समुद्राच्या किनाऱ्यावरून चालत होता, त्याने पेत्राला म्हटले, "खोल ठिकाणी जा व तुझे जाळे मासे पकडण्यासाठी टाक." (लूक ५:४)
जेव्हा मासे हे धरण्यात आले, तेव्हा असे झाले की-नाव बुडू लागली व धरलेल्या मास्यांमुळे जाळी फाटू लागली. हा इतका मोठा आणि अनपेक्षित आशीर्वाद होता की पेत्र व जे त्याच्याबरोबर नावे मध्ये होते ते पकडलेल्या माशांचा घोळका पाहून विस्मित झाले होते."
काहीही कमी साठी समाधानी होऊ नका. जर तुम्हाला नोकरी नाही, तर तुम्हाला एक चांगली नोकरी मिळेल. जर तुम्हाला नोकरी आहे, तर तुम्हाला बढती व मोठे पद मिळेल. जर तुम्हाला घर नसेल, तर परमेश्वर तुम्हाला घर देईल. जर तुमच्याकडे अगोदरच घर आहे, तर तो तुमचे घर चांगल्या गोष्टींनी भरेल. तो आवश्यकतेपेक्षा अधिक चा परमेश्वर आहे.
अंगीकार
मी पहिल्या प्रथम देवाचे राज्य मिळविण्यास झटतो, त्यामुळे, ज्या सर्व गोष्टींची मला गरज आहे ती मला पुरविण्यात येईल. (लूक १२:३१)
अब्राहामाचा आशीर्वाद हा माझा आहे. (गलती ३:१४)
अब्राहामाचा आशीर्वाद हा माझा आहे. (गलती ३:१४)
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्तुति ही जेथे परमेश्वर वास करतो● तुम्ही त्यांच्यावर प्रभाव टाकला पाहिजे
● किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे
● संकटाच्या काळाकडे पाहणे
● अद्भुततेस जोपासणे
● तो तुमच्या जखमांना बरे करू शकतो
● प्रचलित अनैतिकतेमध्ये स्थिर राहणे
टिप्पण्या