डेली मन्ना
४० दिवसांच्या उपासासाठी प्रभावी मार्गदर्शिका
Sunday, 10th of December 2023
36
26
1433
Categories :
उपास व प्रार्थना
उपासाचा कालावधी:
उपास मध्यरात्री (००.०० ताशी) सुरु होतो आणि दररोज दुपारी १४.०० ताशी (दुपारी २ वाजता) संपतो. ते जे आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत आहेत आणि ज्यांना सक्षम वाटते, त्यांच्यासाठी उपास हा १५.०० तासापर्यंत (दुपारी ३ वाजेपर्यंत) वाढवला जाऊ शकतो.
आहाराचा प्रतिबंध:
उपासाच्या कालावधी दरम्यान (००.००-१४.०० तासापर्यंत), पाणी सोडून चहा, कॉफी, दुध किंवा इतर कोणतेही पेय घेण्याचे टाळा. शरीरात पाणी राहण्यासाठी उपासाच्या संपूर्ण कालावधीत भरपूर पाणी पिण्यास प्रोत्साहित केले आहे.
उपास संपल्यानंतरचा आहार:
उपासाचा कालावधी संपल्यानंतर (००.००-१४.०० तासापर्यंत), तुम्ही तुमचे नेहमीचे भोजन घेण्यास सुरु करू शकता.
आध्यात्मिक लक्ष्य:
या उपासातून पूर्ण लाभ घेण्यासाठी, जगिक अडथळे जसे सामाजिक माध्यमे कमी करण्याचा प्रयत्न करा. हा वेळ मनन, प्रार्थना, किंवा इतर आध्यात्मिक कृत्यांसाठी वापरला पाहिजे.
लक्षात ठेवा, उपास करणे हे आध्यात्मिक पोषणासारखेच आहे कारण ते शारीरिक शिस्तीबद्दल आहे. तुमच्या शरीराचे ऐकणे आणि त्यानुसार व्यवस्था करणे हे महत्वाचे आहे.
या २१ दिवसांच्या प्रार्थना कार्यक्रमा दरम्यान, आपल्या प्रार्थना ह्या मानवाकडे उद्धेशून केलेल्या नाहीत हे समजणे महत्वाचे आहे. त्याऐवजी, इफिस. ६:१२ मध्ये वर्णन केलेल्या आध्यात्मिक घटकांना उद्देशून आहेत. “कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (इफिस. ६:१२)
प्रार्थना करण्यासाठी सर्वात प्रभावी वेळ:
मत्तय. २४:४३ च्या शिकवणीमध्ये, आपल्याला एक गहन रूपक मिळते. “आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते.” हा उतारा सतर्कता आणि सज्जतेच्या महत्वावर भर देणारा आध्यात्मिक साधर्म्य म्हणून कार्य करतो.
मध्यरात्रीची वेळ का?
ज्याप्रमाणे चोर रात्रीच्या वेळी येतो, अनपेक्षित आणि अदृश्य, त्याप्रमाणेच आव्हानांना आपण सामोरे जातो (२ पेत्र. ३:१०). या आव्हानांचा सामना करण्यासाठी, मध्यरात्रीची वेळ ही महत्वाची आहे.
००.०० ते १.३० (रात्री १२.०० ते १.३०), प्रार्थनेसाठी वातावरण सर्वात अनुकूल मानले जाते. असा विश्वास आहे की, या वेळा दरम्यान, अंधाराच्या शक्ती ह्या जास्त कार्यरत असतात, त्यामुळे आध्यात्मिक मध्यस्थीसाठी ते निर्णायक वेळ बनवतात.
या उलट, सकाळ ही दिवसाच्या कामाच्या तयारीसाठी घाईची वेळ असते, आणि जगाची काळजी आपल्या विचारांवर प्रभुत्व करू शकते, आणि गहन आध्यात्मिक संबंधाला अडथळा करते.
आरोग्य आणि सुरक्षितता खबरदारी:
या प्रार्थना कार्यक्रमासोबत असणाऱ्या उपासाला सुरुवात करण्यापूर्वी, तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेणे हे महत्वाचे आहे, विशेषेकरून जर तुम्ही औषधे घेत असाल, कोणताही तीव्र आरोग्य परिस्थिती असेल, किंवा तुम्ही गरोदर किंवा बाळाला दुध पाजणाऱ्या असाल.
तुमच्या शरीराचे ऐकणे आणि त्यानुसार व्यवस्था करणे हे महत्वाचे आहे. तुमचे शारीरिक स्वास्थ्य महत्वाचे आहे आणि तुमच्या आध्यात्मिक आचरणासह त्यांचा देखील विचार केला पाहिजे.
प्रार्थना
तुमच्या अंत;करणातून येई पर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा. केवळ तेव्हाच मग पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. हा ४० दिवसांचा प्रार्थना आणि उपास कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यापासून मला विरोध करणारी प्रत्येक शक्ती येशूच्या नावाने आणि येशूच्या रक्ताने कापून काढली जावी.
२. पित्या, येशूच्या नावाने, या ४० दिवसांच्या प्रार्थना आणि उपास कार्यक्रमाला माझ्या विश्वासाला दृढ करण्यासाठी आणि तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी उपयोगात आण. प्रार्थना आणि उपासाचा प्रत्येक दिवस मला तुझ्या अधिक घनिष्ठ संबंधात आणावा, प्रिती, समज आणि भक्तीमध्ये वाढणारा व्हावा.
३. पित्या, येशूच्या नावाने, या उपासाच्या कालावधी दरम्यान कोणताही आध्यात्मिक हल्ला उद्भवण्याच्या विरोधात संरक्षणासाठी मी प्रार्थना करत आहे. तुझ्या देवदूतांद्वारे मला घेरून ठेव आणि तुझी उपस्थिती माझ्या भोवती ढालीप्रमाणे होवो, ज्याने माझे मन, शरीर आणि आत्म्याचे रक्षण करावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा हेतू काय आहे?● २१ दिवस उपवासः दिवस १८
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १
● परमेश्वराला पाहिजे की तुमचाउपयोग करावा
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● अशी संकटे का?
● प्रभू येशू द्वारे कृपा
टिप्पण्या