डेली मन्ना
दिवस १३:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Saturday, 23rd of December 2023
34
25
898
Categories :
उपास व प्रार्थना
तुमचे चर्च बलशाली करा
“आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.” (मत्तय. १६:१८)
चर्च ही विश्वासणाऱ्यांची, बोलावलेल्या व्यक्तींची सभा आहे. पुष्कळ जणांना चर्चची मर्यादित समज आहे, आणि त्यांनी चर्चला इमारती पुरतेच मर्यादित केले आहे. इमारत ही चर्चपासून वेगळी आहे; कधीही हा विचार करू नका की उपासना करण्याचे त्यांचे भौतिक ठिकाण हे खरे चर्च आहे.
चर्च साठी ग्रीक शब्द “एक्लेशिया” आहे, ज्याचा अर्थ ‘बोलावलेल्या लोकांची सभा”. आपण प्रभूचे मुक्त केलेले लोक आहोत, ज्यांना अंधारातून त्याच्या अद्भुत प्रकाशात आणले गेले आहे. (१ पेत्र. २:९)
विश्वासणारे हे चर्च आहेत, आणि येथे पृथ्वीवर चर्च हे ख्रिस्ताचे शरीर आहे. वेगवेगळ्या सिद्धातांनी चर्चला वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागले आहे. “विश्वासणारे” म्हणून एकत्र केले जाण्याऐवजी, प्रत्येक जण ख्रिस्ताची किंमत न करता त्यांच्या पंथांच्या आवडीनिवडीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. “विश्वासणारे” म्हणून आपल्याला एकतेच्या ठिकाणी परत आले पाहिजे आणि जर ख्रिस्ती लोकांनी एकत्र असले पाहिजे तर प्रार्थनेची आवश्यकता आहे.
पृथ्वीवरील क्षेत्रात आपण देवाचे पायी सैनिक आहोत, आणि आपण आपल्या राष्ट्राकरता धोरणात्मक प्रार्थना केली पाहिजे म्हणजे देव चर्च बनवण्यासाठी त्याची योजना पूर्ण करू शकेल. देवाने जे काही केले पाहिजे अशी आपली इच्छा आहे त्यासाठी प्रार्थना केली पाहिजे.
आपल्या प्रार्थना ह्या त्याला पृथ्वीवरील क्षेत्रात कायदेशीर हक्क देतात की त्याला जे करायचे आहे ते करावे. तसे असावे अशी त्यानेच आज्ञा केली आहे, आणि आपल्याला तत्वांना समजण्याची गरज आहे ज्या द्वारे देव पृथ्वीवरील क्षेत्रात कार्य करण्याची निवड करतो.
जेव्हा ख्रिस्ती लोक एकत्र असतात, तेव्हा अंधाराचे राज्य पुष्कळ लोकांवरून त्याची पकड गमावेल आणि आपले राष्ट्र परिवर्तीत होईल. आपल्या शाळा, राजकारण, आरोग्यसेवा, सैन्य, शिक्षण, व्यवसाय, प्रसारमाध्यमे आणि कुटुंबे या परिवर्तनाचा आनंद घेतील.
चर्च दोन प्रकारात वर्गीकरण करता येऊ शकते:
१. सार्वत्रिक चर्च
सार्वत्रिक चर्चमध्ये सर्व राष्ट्रांमधील सर्व विश्वासणारे असतात.
२. स्थानिक चर्च
स्थानिक चर्च हा भौगोलिक स्थानामधील लोकांचा (विश्वासणाऱ्यांचा) गट आहे जे एकत्र जमा होतात की उपासना, प्रार्थना, सहभागीता करावी आणि देवाबद्दल शिकावे.
चर्चला पुढे दिलेल्या नावांनी देखील संबोधले जाऊ शकते ..
१. देवाचे घराणे (१ तीमथ्य. ३:१५)
२. ख्रिस्ताची वधू (प्रकटीकरण १:६-९; २१:२; २ करिंथ. ११:२)
३. ख्रिस्ताचे शरीर (इफिस. १:२२-२३)
४. देवाचे मंदिर (१ पेत्र. २:५; इफिस. २:१९-२२)
५. देवाचा कळप (१ पेत्र. ५:२-३)
६. परमेश्वराचा द्राक्षमळा (यशया ५:१-७)
७. विश्वासाचे घराणे (गलती. ६:१०)
चर्चच्या जबाबदाऱ्या
चर्चच्या जबाबदाऱ्या ह्या केवळ उपासनेपुरतेच मर्यादित नाहीत; त्यापेक्षा अधिक आपल्याला आपल्या समाजावर प्रभाव करायचा आहे. तर मग, चर्चच्या काही जबाबदाऱ्या काय आहेत?
१. उपासना
“स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; आपल्या अंत:करणात प्रभूला गायनवादन करा.” (इफिस. ५:१९)
२. प्रभाव
आपल्याला आपल्या समाजावर जबरदस्तीने नाही तर त्यांना योग्य आदर्श दाखवण्याने प्रभाव टाकायचा आहे.
“कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो.” (१ तीमथ्य. ४:१२)
“१४ तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. १५ दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. १६ त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू दया की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय. ५:१४-१६)
३. जीवने परिवर्तीत करणे
आपल्याला लोकांना अंधाराच्या राज्यातून प्रकाशाच्या राज्यात आणायचे आहे. आपल्याला लोकांना ख्रिस्ताची सुवार्ता आणि देवाच्या राज्याची साक्ष द्यायची आहे. सुवार्तेमध्ये जीवने परिवर्तीत करण्याचे सामर्थ्य आहे.
“कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला-प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला-तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.” (रोम. १:१६)
४. सैतानाच्या कामांना नष्ट करणे
आपल्याला लोकांच्या जीवनातून सैतानाच्या कार्यांना आंधळे करायचे, काढून टाकायचे आणि नष्ट करायचे आहे. आपल्या समाजाला देव, आरोग्य, सुरक्षितता, सुटका आणि मदतीची आवश्यकता आहे. जर आपण पोकळीमध्ये उभे राहिलो नाही, तर अविश्वासणारे जे काही सैतान त्यांच्या जीवनात करत आहेत त्याचा प्रतिकार करू शकणार नाहीत.
परंतु लोक जेव्हा सतत पाप करत राहतात, तेव्हा हे दाखवते की ते सैतानाचे आहेत जो प्रारंभापासून पाप करत आहे. परंतु देवाचा पुत्र आला की सैतानाची कृत्ये नष्ट करावीत.
५. मध्यस्थी
राजे आणि जे अधिकारात आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास आपल्याला सूचना दिली आहे. ते सैतानाचे प्राथमिक लक्ष्ये आहेत. जे अधिकारात आहेत त्यांना जर तो धरू शकला, तर तो त्यांना चुकीचे कायदे बनवण्यास सांगू शकतो जे पृथ्वीवरील विश्वासणारे आणि देवाच्या राज्यावर परिणाम करू शकतात. आपल्या प्रार्थना त्यांना संरक्षण देऊ शकतात आणि याची खात्री देखील करू शकतात की त्यांनी राष्ट्रावर आणि चर्चसाठी देवाची इच्छा पूर्ण करावी.
“१ तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुती करावी; २ राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. ३ हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चागले व स्वीकारण्यास योग्य आहे. ४ त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहचावे. (१ तीमथ्य. २:१-४)
६. प्रितीमध्ये चाला
आपल्याला विश्वासणाऱ्यांच्याप्रती प्रीतीत चालायचे आहे. आपल्याजवळ जे आहे ते त्यांच्याजवळ नाही, देवाची प्रीती. जितके अधिक आपण देवाची प्रीती त्यांना दाखवतो, तितकेच अधिक ते देवाकडे आकर्षित होतील.
ख्रिस्ताच्या आदर्शाचे अनुसरण करत, प्रीतीने भरलेले जीवन जगा. त्याने आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. (इफिस. ५:२)
७. अधिकार
ख्रिस्ताजवळ पृथ्वीवर देवाचे राज्य स्थापन करण्याचा आणि वाढवण्याचा अधिकार आहे.
“पाहा, मी तुम्हांला साप आणि विंचू ह्यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे, तुम्हांला काहीएक बाधणार नाही.” (लूक. १०:१९)
विश्वासणारे म्हणून, आपण आपल्या राष्ट्राकरता प्रार्थना करण्याच्या जबाबदारीसाठी उभे राहिले पाहिजे. आपल्या राष्ट्राची शांती आणि प्रगती ही आपल्या स्वतःच्या शांती आणि प्रगतीकडे नेईल.
नरकाचे द्वारे शक्य तितक्या प्रत्येक माध्यमांनी चर्चबरोबर लढाई करत आहे, परंतु आपण प्रभूमध्ये आणि त्याच्या समर्थ शक्तीने मजबूत असले पाहिजे आणि विश्वासाचे चांगले युद्ध लढावे.
पुढील अभ्यासासाठी: इफिस. १:२२-२३; १ करिंथ. १२:१२-२७

प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. पित्या, येशूच्या नावाने भारतात तुझे चर्च बलशाली कर. (मत्तय. १६:१८)
२. पित्या, या राष्ट्रासाठी प्रार्थना करण्यासाठी प्रार्थना करण्याचे ओझे येशूच्या नावाने मला दे. (१ तीमथ्य. २:१-२)
३. मी इतर ख्रिस्ती लोकांसोबत माझ्या विश्वासाने सामील होतो, आणि हे शहर आणि या राष्ट्रावरील अंधाराच्या बालेकिल्ल्यांना आम्ही येशूच्या नावाने कमकुवत करतो. (२ करिंथ. १०:४)
४. हे परमेश्वरा, भारतातील चर्चवर तुझ्या प्रीतीचा वर्षाव कर, म्हणजे आम्ही पृथ्वीवर तुझ्या राज्याच्या वाढीसाठी ऐक्यात असावे आणि एकत्रित काम करावे असे येशूच्या नावाने होऊ दे. (योहान. १७:२१)
५. शहर आणि राष्ट्रावर, ख्रिस्तासाठी आम्ही नवीन मुलुख हस्तगत करण्यासाठी येशूच्या नावाने हक्क दाखवतो. (यहोशवा १:३)
६. कोणतेही कायदे जे धार्मिक तत्वे, मुल्ये आणि चर्च विरोधात आहेत, त्यांना येशूच्या नावाने उलट कर. (नीतिसूत्रे २९:२)
७. आमचे शहर आणि राष्ट्रावर आम्ही देवाची शांती येशूच्या नावाने मोकळी करत आहोत. (फिलिप्पै. ४:७)
८. पित्या, आमचे शहर आणि राष्ट्रावर येशूच्या नावाने तुझी इच्छा पूर्ण होवो. (मत्तय. ६:१०)
९. पित्या, पास्टर मायकल, त्याचे कुटुंबीय आणि त्याचा संघ यांना सर्व परिस्थितीत आणि सर्व समयी देवाचे वचन प्रचार करण्यासाठी येशूच्या नावाने धैर्य आणि सामर्थ्य प्रदान कर. (प्रेषित. ४:२९)
१०. पित्या, येशूच्या नावाने, मी विनंती करतो की करुणा सदन चर्चच्या उपासनेंमध्ये शक्तिशाली चिन्हे, अद्भुते आणि चमत्कार घडू देत जी मानवी ज्ञान आणि समजेस चकित करेल आणि वैज्ञानिक जगाला स्तब्ध करतील. (प्रेषित. २:२२)
११. पित्या, येशूच्या नावाने, मी विनंती करतो की पास्टर मायकल, त्याचे कुटुंबीय आणि त्याचा संघ यांना अलौकिक शहाणपण, समज आणि ज्ञानाने आशीर्वादित कर की नवीन कार्यक्रम व कार्यांना विकसित करावे जे पुनरुज्जीवनासाठी प्रेरक असतील आणि चर्चची वाढ करेल. (याकोब १:५)
Join our WhatsApp Channel
Most Read
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती● अद्भुततेस जोपासणे
● परमेश्वरासाठी तहानेले झालेले
● पवित्रतेचे दुहेरी पैलू
● दिवस ३६:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● काहीही लपलेले नाही
● दिवस १६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या