डेली मन्ना
दिवस २०: ४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Saturday, 30th of December 2023
37
28
1057
Categories :
उपास व प्रार्थना
पातळी बदल
“परमेश्वर तुमची अधिकाधिक वाढ करो, तुमची व तुमच्या मुलांची वाढ करो.” (स्तोत्र. ११५:१४)
पुष्कळ लोक अडकून जातात; त्यांना पुढे जायचे असते पण ते समजू शकत नाही की त्यांना काय मागे ओढून धरत आहे. आज, तो अदृश्य अडथळा येशूच्या नावाने नष्ट केला जाईल.
देवाने आपल्याला पुढे जाण्यासाठी निर्माण केले आहे; आपल्याला एकाच ठिकाणी कायमचे राहण्यासाठी निर्माण केलेले नाही. “परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.” (नीतिसूत्रे ४:१८)
कोणते लोक आहेत ज्यांना पातळीत बदल हवा आहे?
कोणीही जो त्याच ठिकाणी बऱ्याच काळापासून राहिलेला आहे.
कोणीही ज्याला दीर्घकाळापासून लाभ आणि आशीर्वादापासून वंचित ठेवले आहे.
ज्यांनी इतरांची विश्वासुपणे सेवा केली आहे आणि त्यांच्या योग्य
जागेसाठी ते दैवीरित्या पात्र आहेत.
- ज्यांना इतरांनी फसविले आहे.
- जे आयुष्याच्या मागील ठिकाणी आहेत.
- ज्यांना निकामी म्हणून पाहिले गेले आहे.
- ते ज्यांना कोणीही साहाय्यक नाही.
- ते जे संघर्ष आणि परिश्रम करत आहेत.
- ते जे पृथ्वीवर देवाचे राज्य वाढवण्याची इच्छा बाळगून आहेत.
ज्यांनी पातळीत बदल अनुभवला त्यांची उदाहरणे
१. मर्दखय
मर्दखयाची प्रतिष्ठा रातोरात बदलली; हे काहीतरी होते ज्याची त्याने अपेक्षा देखील केली नव्हती; ते दैवी होते. (एस्तेर ६:१-१२, ९:३-४ वाचा)
२. अलीशा
एलीयाचा पडलेला झगा आणि आत्म्याच्या हस्तांतरणाने अलीशाच्या आध्यात्मिक पातळीस बदलले. संदेष्ट्यांचे पुत्र त्याच्याजवळ आले आणि त्याला नमन केले कारण त्यांनी पाहिले की त्याची पातळी ही बदलली आहे. (२ राजे २:९-१५ वाचा)
३. दावीद
गल्ल्याथच्या पराभवाने दाविदाला पातळी बदलाकडे नेले. जीवनाची युद्धे ही तुमचा नाश करण्यासाठी नाहीत; ते तुमच्या पातळी बदलाची घोषणा करण्यासाठी आहेत.
शौलाने त्या दिवशी त्याला आपल्याकडे ठेवून घेतले, आणि तेथून पुढे त्याला त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही. (१ शमुवेल १८:२)
“तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले.” (२ शमुवेल ७:८)
४. पौल
पौल, ज्याने चर्चला दहशत घातली होती; त्याने पातळीमध्ये बदल अनुभवला आणि राज्यासाठी प्रेषित झाला. “तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.” (१ तीमथ्य. १:१६).
५. योसेफ
योसेफ एक मोठ्या पदावर पोहचला ज्यासाठी तो मानवी प्रमाणानुसार पात्र नव्हता. एका अनोळखी देशात, देवाने त्याला प्रमुख बनवले. (उत्पत्ती ४१:१४-४६ वाचा)
पातळीत बदल कसा अनुभवावा?
देव प्रत्येकाची पातळी बदलण्यास तयार आहे, परंतु तो केवळ त्याच्या वचनानुसार कार्य करेल. काही विशेष तत्वे आहेत ज्यांचे कोणीही उल्लंघन नाही केले पाहिजे ज्यांना पातळीत बदल हवा आहे. पवित्र शास्त्रात ज्या लोकांनी पातळीत बदलाचा अनुभव केला त्यांनी जीवनात विविध वेळा या तत्वांना प्रदर्शित केले होते. चला आपण मुख्य तत्वांकडे पाहू या.
१. प्रामाणिकपणात जगा
देवाने दाविदाची निवड केली आणि त्याची पातळी बदलली कारण तो प्रामाणिक माणूस होता.
“त्याने आपल्या मनाच्या सरळतेने त्यांचे पालन केले, आपल्या हाताच्या चातुर्याने त्यांना मार्ग दाखवला.” (स्तोत्र. ७८:७२)
२. परमेश्वराचे भय बाळगून जगा
देवाचे भय ज्ञानाचा उगम आहे. देवाचे भय धरणे तुम्हांला पातळी बदलासाठी योग्य ठिकाणी नेईल. योसेफाची परीक्षा झाली, आणि जर तो अपयशी ठरला असता, तर तो त्या ठिकाणी पोहचला नसता.
पापाच्या सुखविलासासाठी तुमची परीक्षा होईल. देवाच्या भयाने तुमच्या मनावर राज्य केले पाहिजे, जर तुम्ही पातळी बदलाची इच्छा बाळगता. (उत्पत्ती ३९:९)
३. पातळी बदलासाठी प्रार्थना करा
देव तुमची पातळी बदलण्यास तयार आहे जर तुम्ही प्रार्थना करू शकाल.
“९याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की, त्याला प्रसवताना मला फार क्लेश झाले. १० याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा: ‘तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दु:खी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!’ त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला.” (१ इतिहास ४:९-१०)
४. तुम्हांला देवाच्या कृपेची आवश्यकता आहे
एस्तेरची पातळी बदलली कारण स्पर्धेसाठी आलेल्या इतर स्त्रियांपेक्षा अधिक कृपा मिळवली. कृपा तुम्हांला पातळी बदलासाठी पात्र ठरवू शकते.
“राजाने एस्तेरवर इतर सर्व स्त्रियांहून अधिक प्रीती केली आणि वरकड सर्व कुमारींपेक्षा तिच्यावर त्याचा अनुग्रह व कृपादृष्टी विशेष झाली. त्याने तिच्या मस्तकी राजमुकुट घातला व वश्तीच्या जागी तिला राणी केले.” (एस्तेर २:१७)
५. देवासोबत प्रामाणिक भेटीसाठी इच्छुक राहा
ही ती भेट होती जी मोशेची देवासोबत झाली जिने त्याची प्रतिष्ठा बदलली. मोशे फारोकडून रानात पळाला होता, परंतु जेव्हा त्याची देवाबरोबर भेट झाली, तो फारोचा देव झाला. (निर्गम ३:२, ४-१० वाचा)
६. इतरांच्या समस्यांसाठी उपाय बना
योसेफाने पातळीत बदल अनुभवला कारण तो फारो आणि मिसरसाठी उपाय झाला. इतरांच्या जीवनासाठी मुल्ये जोडा, जर तुम्हांला पातळीत बदलाचा आनंद घ्यायचा आहे.
७. शहाणपणासाठी आतुर असा
शहाणपणा ही प्रमुख गोष्ट आहे; आणि शलमोनाने त्यासाठीच विनंती केली होती. शहाणपण जे देवाने शलमोनाला दिले ज्याने त्याच्या पातळीला बदलले होते. (१ राजे ३:५-१५)
देव कोणाचीही कोणत्याही वेळेला पातळी बदलू शकतो; देवावर विश्वास ठेवणे सोडू नका. त्याची विश्वासुपणे सेवा करा आणि योग्य वेळी तो तुम्हांला उन्नत करेल.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्याने, येशूच्या नावाने पातळी बदलाचा अनुभव मला होऊ दे. (स्तोत्र. ७५:६-७)
२. पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की या ४० दिवसांच्या उपासात सहभागी झालेला प्रत्येक व्यक्ती उच्च पातळीवर जावा. (यशया ४०:३१)
३. येशूच्या नावाने मी अपयशाच्या आत्म्याचा अस्वीकार करतो. (फिलिप्पै. ४:१३)
४. माझ्या सर्व परिश्रमात मी फलदायक होण्यासाठी येशूच्या नावाने कृपा प्राप्त करतो. (योहान. १५:५)
५. मी व्यर्थ परिश्रम करणार नाही. तसेच माझे प्रियजन सुद्धा व्यर्थ परिश्रम करणार नाही. येशूच्या नावे (यशया ६५:२३)
६. पित्या, मला त्यांच्याशी जोड ज्यांनी येशूच्या नावाने माझ्या पुढील पातळीसाठी तयारी केली आहे. (नीतिसूत्रे १६:९)
७. पित्या, माझ्या पुढील पातळीसाठी मला प्रगतीच्या नवीन कल्पना येशूच्या नावाने प्रदान कर. (याकोब १:५)
८. विलक्षण साक्षीसाठी येशूच्या नावाने मी नवीन समज प्राप्त करतो. (रोम. १२:२)
९. पित्या, प्रगतीची नवीन द्वारे येशूच्या नावाने माझ्यासाठी उघड. (प्रकटीकरण ३:८)
१०. आर्थिक प्रगतीसाठी येशूच्या नावाने मी कृपा प्राप्त करतो. (३ योहान. २)
११. पित्या, येशूच्या नावाने माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय द्वारे उघड. (प्रेषित. १६:९)
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडा● २१ दिवस उपवासः दिवस ०३
● वातावरणावर महत्वाची समज-३
● बुद्धिमान व्हा
● तुमच्या विश्वासाची तडजोड करू नका
● परिवर्तनाची किंमत
● दिवस ०७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या