डेली मन्ना
देवदूताचे साहाय्य कसे सक्रीय करावे
Wednesday, 24th of January 2024
19
17
821
Categories :
Angels
“तू त्याची प्रार्थना केलीस म्हणजे तो तुझे ऐकेल; आणि तू आपले नवस फेडशील.” (ईयोब २२:२७)
जर तुम्ही प्रार्थनेत देवाला प्रामाणिकपणे हाक मारली, तर तो तुम्हांला तुमच्या कठीण समया दरम्यान साहाय्य करेल. तुमच्या जीवनात तेथे बदल घडून येईल. येथे पुष्कळ लोक आहेत जे दिवसभरात सर्वकाही करतात, पण प्रार्थना करत नाहीत. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा देव केवळ ऐकतच नाही तर मार्गदर्शन देखील करतो. तर ही वेळ आहे की तुम्ही प्रामाणिकपणे प्रार्थना करण्यास सुरुवात केली पाहिजे.
तुम्ही एखाद्या गोष्टीचा निर्णय आणि आदेश देखील द्याल, आणि ते तुमच्यासाठी स्थापित केले जाईल; आणि तुमच्या मार्गावर प्रकाश [देवाच्या कृपेचा] चमकेल. (ईयोब २२:२८)
शब्द जे आपण बोलतो ते आपल्या जीवनाला प्रभावित करेल आणि आपल्याला अदृश्य आध्यात्मिक जगाशी संपर्कात आणेल. नीतिसूत्रे १८:२१ मध्ये, आपण वाचतो की, “जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात.” दुसऱ्या अर्थाने, जे शब्द आपण बोलतो त्या शब्दाचे परिणाम देखील आहेत, पॅशन अनुवाद स्पष्ट करतो, “तुमचे शब्द इतके शक्तिशाली आहेत की ते मृत्यू किंवा जीवन देऊ शकतात.” याशिवाय, नवीन करारात, १ पेत्र. ३:१० मध्ये आपण वाचतो की, “कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पाहावे, अशी ज्याची इच्छा असेल, त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावेत.” आपल्या जीवनाची गुणवत्ता आणि त्याचा दीर्घ कालावधी आपण बोलतो त्या शब्दांवर अवलंबून असेल.
राजाचा आदेश आणि विशेषाधिकार! जेव्हा एखादा राजा काही आदेश देतो, तेव्हा तो देशाचा कायदा होतो. ख्रिस्तामध्ये, आपण राजे आणि याजक आहोत जे स्वर्गीय स्थानात बसलेले आहोत आणि देवाचे वचन आणि इच्छेनुसार आदेश देऊ शकतो. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आध्यात्मिक जगात एक कायदा स्थापित होतो, आणि आपण जो आदेश दिला आहे, तसे घडते.
एकदा, जेव्हा उपासना चालू होती, तेव्हा एका स्त्रीला एक फोन आला हे म्हणत, तिचा लहान मुलगा, जो जवळपास पाच वर्षाचा होता, तो काही तासांपासून हरवलेला आहे. शेजारी आणि कुटुंबाचे सदस्य त्याला सर्वत्र शोधत आहेत. त्यांना अत्यंत वाईटाची भीती वाटली. ती रडत होती, पण परमेश्वराची उपासना सतत करत होती. उपासनेच्या शेवटी, ती व्यासपीठाकडे वेगाने धावली आणि रडू लागली. त्या क्षणी, माझ्यामध्ये आत्मा उफाळत आहे असे मला वाटले, आणि मी संपूर्ण चर्चला ही घोषणा करायला लावले की तिचा मुलगा सुरक्षित मिळेल. तासानंतर, आम्हांला फोन आला की तिचा मुलगा सुरक्षित आहे. त्यांनी त्याला रहस्यमय परिस्थितीत प्राप्त केले. आम्ही आदेश दिला, आणि तो स्थापित झाला होता.
नुकतेच मी देवाच्या एका माणसाची साक्ष ऐकली की चर्चला अंतिम-समयाची कापणी करणे आणि पृथ्वीवर देवाचे गौरव प्रकट करण्यास साहाय्य करण्यासाठी अनेक योद्धा देवदूत पृथ्वीवर पाठवण्यात आले आहे असा दृष्टांत झाला. त्याने पाहिले की या देवदूतांजवळ धनुष्य आहेत पण त्यांच्या धनुष्यात तीर नाहीत. परमेश्वराने त्याला सांगितले की, आपण, चर्च आहोत, ते देवाच्या वचनाची घोषणा अधिकाराने करतो, आपण त्यांच्या धनुष्यात तीर लावतो, जे अंतिम-समयाचे पुनरुज्जीवन आणण्यासाठी संपूर्ण पृथ्वीवर सोडतील. इब्री. १:१४ म्हणते की, परमेश्वराचे देवदूत हे, “ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे आहेत”. देवदूताचे कार्य हे जे शब्द आपण घोषित करतो त्याने सक्रीय केले जाते!
आणखी एक वचन जे याची पुष्टी करते ते मत्तय. ६:१० आहे, जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले हे म्हणत, “तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो!”
देवाच्या वचनावर आधारित आदेश आणि घोषणेद्वारे आपण स्वर्गाला पृथ्वीवर आणू शकतो.
हे महत्वाचे आहे की आपले शब्द, घोषणा आणि पापकबुली हे आपण जे पाहतो, ऐकतो, किंवा अनुभव करतो त्यावर आधारित नाही पण देव त्याच्या वचनात काय म्हणतो त्यावर आधारित आहे.
प्रार्थना
१. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, येशूच्या नावाने मला माझ्या जीवनात कोणत्याही चांगल्या गोष्टींचा अभाव असणार नाही. (स्तोत्र. २३:१)
२. परमेश्वर माझ्या कुटुंबाचा मेंढपाळ आहे. येशूच्या नावाने आपल्या जीवनात कोणत्याही चांगल्या घोष्टींचा आपल्याला अभाव होणार नाही. (स्तोत्र. २३:१)
३. मी मस्तक आहे, पुच्छ नाही. येशूच्या नावाने मी नेहमीच वर राहीन तळावर नाही. (अनुवाद २८:१३)
४. माझ्या शत्रूंचे जाळे येशूच्या नावाने माझ्या शत्रुंनाच धरेल. (स्तोत्र. ७:१४-१५)
५. जोपर्यंत मी या पृथ्वीवर जिवंत आहे, येशूच्या नावाने कोणतीही शक्ती माझ्या विरोधात उभी राहण्यास सक्षम होणार नाही. जसे परमेश्वर मोशेबरोबर होता, तसेच तो माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांबरोबर असेन. येशूच्या नावाने तो मला सोडणार नाही आणि माझा त्याग करणार नाही. (यहोशवा १:५)
६. खात्रीने, चांगुलपणा, दया आणि अखंड प्रेम माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांसोबत संपूर्ण आयुष्यभर असेल, आणि माझ्या आयुष्याचा कालावधी आणि देवाचे घर [आणि त्याची उपस्थिती] येशूच्या नावाने माझे निवासस्थान होईल. (स्तोत्र. २३:६)
७. देवाच्या घरात मी एका हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; देवाच्या प्रेमळ-दयाळू, आणि देवाच्या दयेवर मी येशूच्या नावाने पूर्णपणे विश्वास ठेवतो आणि आत्मविश्वासाने कायमचे विसंबून राहतो. (स्तोत्र. ५२:८)
८. जेथे इतरांचा नाकार केला गेला आहे, तेथे येशूच्या नावाने माझा स्वीकार आणि सन्मान केला जाईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचे प्रत्यक्ष गुणवैशिष्ट्ये● विश्वास, आशा आणि प्रीति
● दिवस १९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● अद्भुततेस जोपासणे
● विश्वासासह विरोधकांना सामोरे जाणे
● देवाचे वचन वाचण्याचे 5 लाभ
● नकारावर प्रभुत्व मिळवावे
टिप्पण्या