डेली मन्ना
कर्जामधून बाहेर या: किल्ली# १
Saturday, 10th of February 2024
26
20
858
Categories :
कर्ज
एकदा संदेष्ट्याच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गाऱ्हाणे केले; ती म्हणाली तुझा सेवक, माझा नवरा, मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांस दास करून नेण्यास आला आहे. (२ राजे ४:१)
1. कर्ज तुम्हाला गुलाम बनविते
२ राजे ४:१ मध्ये, आपण पाहतो की एक देवाचे लेकरू हे कर्जात आहे. ती सावकारास तिच्या मुलांना सुद्धा गमाविण्याच्या स्थितीत आहे. कर्ज तुम्हाला गुलाम बनवेल व जे तुम्हाला देणे आहे त्यापेक्षा अधिक दयावयास लावेल. कर्ज हे तुम्हाला आज काम करावयाला लावेल की कालचे भरावे.
काही हे कर्जात आहेत व पेत्राकडून उसणे घेत आहे की पौलाला दयावे. कर्जाने संबंध, कुटुंबे, चर्च व पाचारणास नष्ट केले आहे. काही एक क्रेडीट कार्ड वापरतात की दुसऱ्या क्रेडीट कार्ड साठी भरावे. ह्या सैतानी चक्राला तोडले पाहिजे म्हणजे परमेश्वराने जे असण्यासाठी व करण्यासाठी तुम्हाला पाचारण केले आहे ते तुम्ही पूर्ण करू शकावे.
2. कर्जआरोग्यावर परिणाम करते
येथे अनेक लोक आहेत जे कर्जामुळे झोपू शकत नाही. येथे लोक आहेत ज्यांनी कर्जामुळे त्यांचे आरोग्य गमाविले आहे, ब्लडप्रेशर, डोकेदुखी.
काही लोक मरण पावले आहेत हे याकारणासाठी नाही कीत्यांची वेळ झाली होती परंतु कर्जाचा दबाव व तणावामुळे असे झाले. काहींनी आत्महत्या केली, काहींनी स्वतःला व्यसनात बुडवून टाकले. मला ह्या गोष्टी माहीत आहेत कारण मी सुद्धा माझ्या जीवनात एकदा त्याठिकाणी होतो. मी परमेश्वराला त्याच्या कृपे साठी धन्यवाद देतो ज्याने मला मुक्त केले. आता तीच कृपा तुम्हाला सुद्धा सोडवू शकते.
3. कर्ज तुमच्या चेहऱ्यावर परिणाम करते
कर्ज एका तरुण मुली ला एका वयस्कर स्त्री सारखे भासवते आणि एक तरुण पुरुषास वयस्कर मनुष्यासारखे.
4. कर्ज तुमची प्रतिष्ठा काढून घेते
उसणे घेण्यामध्ये येथे काहीही प्रतिष्ठा नाही. जेव्हा तुम्ही उसणे घेता, तेव्हा तुम्हांला गोष्टी सांगाव्या लागतात, (कधी कधी वैयक्तिक गोष्टी), म्हणजे त्यांनी तुमच्यावर दया करावी व तुम्हाला उसणे दयावे. मला काही निश्चित पुरुष व स्त्रिया ठाऊक आहेत ज्यांना त्यांच्या महत्वाशी तडजोड करावी लागली, त्यांची प्रत्यक्ष प्रतिष्ठा म्हणजे ते पैसे मिळवू शकतील.
लोक ज्यांनी त्यांना पैसे उसणे दिले त्यांना अपशब्द बोलले.
धनिक मनुष्य निर्धनावर सत्ता चालवितो, ऋणको धनकोचा दास होतो. (नीतिसूत्रे २२:७)
5. कर्ज तुम्हाला आध्यात्मिकदृष्टया परिणाम करते
काही लोक फक्त बडबड करणारे ख्रिस्ती आहेत परंतु त्यांच्या कर्जामुळे शत्रू त्यांच्या जिभेचा उपयोग खोटे बोलणे व चलाखी करण्यासाठी वापरतो. असे प्रार्थना सुद्धा करू शकत नाही.
भीतीने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आहे. कर्ज हे त्रास देणारे व नष्ट करणारे आहे.
तथापि, मला तुम्हांला सुवार्ता दयायची आहे. परमेश्वराला हे नाही पाहिजे की त्याची मुले कर्जबाजारी व्हावी. त्याचे वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते कीत्याचे लोक इतरांना उसणे देतील आणि हे याउलट होणार नाही. (अनुवाद१५:६)
# किल्ली नंबर १
कर्जातून बाहेर येण्यासाठी प्रार्थना करणे
प्रार्थनाहे एक आध्यात्मिक शस्त्र आहेपरंतु त्यास एका विशेष निशाणाकडे नेम धरावयाचे व ते सोडावयाचे असते, जशी एक बंदूक सतत, करीत राहते जोपर्यंत परिणाम पाहत नाही.
ध्येयरहित प्रार्थना काहीही परिणाम प्राप्त करणार नाही.
आता कृपाकरून समजा, कर्जातून बाहेर येण्यासाठी प्रार्थना करणे असे म्हणण्याचा माझा काय अर्थ आहे. परमेश्वर हा आपला पुरवठा करणारा आहे आणि तो निश्चितच कर्जातून बाहेर येण्यास तुम्हाला साहाय्य करेल. काहींसाठी, तो चमत्कारिकरित्या संधींचे दार उघडेल जे तेथे अस्तित्वात आहे असे दिसत सुद्धा नव्हते. काहींसाठी तो क्रियाशील कल्पना देईल. काहींसाठी, हे चमत्कारिकरित्या पैसे प्राप्त करणे असेल, काहींसाठी नोकरीची संधी, व्यवसाय संधी. एक गोष्ट जी तुम्हाला करण्याची गरज आहे ती ही कीपरमेश्वरा द्वारे पुरविलेल्या ह्या संधींवर कार्य करावे.
अंगीकार
प्रत्येक प्रार्थना अस्त्र कमीतकमी एका मिनिटा साठी म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्रा कडे वळा.
१. माझे जीवन व माझ्या कुटुंबाच्या जीवनातून करू व गरिबी चे डोंगर हे अग्निद्वारे जळून जावो, येशूच्या नांवात.
२. सैतानी शक्ति जी माझीआर्थिकता व संपत्ति ला खावून टाकत आहे ती अग्नीच्या द्वारे जळून जावो, येशूच्या नांवात.
३. आर्थिक सीमेची बंधने माझ्या जीवनातून तुटून जावो, येशूच्या नांवात.
४. परमेश्वर जो माझ्या संपन्नते मध्ये हर्ष करतो, माझ्या हाताच्या कार्यास संपन्न करो, येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दैवीव्यवस्था-२● तुमचा आशीर्वाद बहुगुणीत करण्याचा खात्रीशीर मार्ग
● तुमचा गुरु कोण आहे- II
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- १
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -३
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-५
● आध्यात्मिक साहस
टिप्पण्या