एकदा मी प्रार्थना करण्याच्या कार्यात फोन घेत होतो. एका स्त्रीने मला फोन केला व म्हटले एक सैतान तिला रात्री कसेत्रास देत आहे. मी नम्रपणे तिला सल्ला दिला की झोपायला जाण्याअगोदर बायबल वाचावे.
ताबडतोब तिने प्रत्युत्तर दिले की ती न चुकता झोपण्याअगोदर तिचे बायबल उशीखाली ठेवत आहे. जरी हे काहींसाठी विनोदी असे वाटेन, येथे अनेक आहेत जे त्यांचे बायबल वाचण्याकडे दुर्लक्ष करतात.
अनेकांजवळ त्यांच्या घरात किंवा त्यांच्या फोन मध्ये विविध भाषांतरांचे बायबल आहेत परंतु ते वाचण्यासाठी ते कधीही वेळ काढत नाहीत. सैतान हा तुमच्याजवळ बायबल असणे किंवा बायबल धरून असण्याबद्दल घाबरत नाही परंतु जेव्हा तुम्ही बायबल वाचण्यास आणि ते काय सांगते त्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करता तेव्हाच सैतानाची घाबरगुंडी उडते.
ते संकटसमयी परमेश्वराचा धावा करितात, आणि तो त्यांस क्लेशातून मुक्त करितो. (स्तोत्र १०७:१९)
वरील वचन सांगते की देवाचे लोक जेव्हासंकटात परमेश्वराचा धावा करतात, आणि तो त्यांचा बचाव करतो. परमेश्वर त्याच्या लोकांचा बचाव कसा करतो? पुढील वचनांकडे पाहा.
तो आपले वचन पाठवून त्यांस बरे करितो, नाशापासून त्यांचा बचाव करितो. (स्तोत्र १०७:२०)
बायबल म्हणते, तो त्याचे वचन पाठवितो व त्यांस बरे करतो वनाशापासून त्यांचा बचाव करितो. आता, परमेश्वरास जेव्हा तुम्हाला बरे करावयास पाहिजे असते, तेव्हा तो काय करतो? तो त्याचे वचन पाठवितो. परमेश्वर तुम्हाला तुमच्या विनाशापासून वाचविण्याअगोदर, तो त्याचे वचन पाठवितो.
हेच तर कारण आहे की तुम्ही तुमचे बायबल (देवाचे वचन)वाचण्याची सवय दररोज काकेली पाहिजे.
ह्याकारणामुळेच तुम्ही तुमची दररोजची भाकर वाचण्याकडे दुर्लक्ष नाही केले पाहिजे. (वचन पाठविण्याअगोदर मी नेहमी प्रार्थना करतो.). देवाच्या वचनात सामर्थ्य आहे की तुम्हाला बरे करावे व तुमची सुटका करावी.
आमच्या एका प्रार्थना सभे दरम्यान, मी एका स्त्री साठी प्रार्थना करत होतो जिला मुलबाळ नव्हते. मी जेव्हा प्रार्थना करीत होतो तेव्हा मी देवाच्या आश्वासनावर हक्क दाखवीत होतो.
आणखी एका स्त्रीने संपूर्ण प्रसंग फोन वर रेकॉर्ड केला व तिच्या एका मैत्रिणीला पाठविले जिला जवळजवळ दहा वर्षापासून मुलबाळ नव्हते.
ही स्त्री प्रतिदिवशी ते रेकॉर्डिंग ऐकत असे आणि त्याबरोबर वचनावरज्याचा मी उपयोग केला होता, त्यावर हक्क दाखवीत प्रार्थना करीत राहिली. काही महिन्यानंतर, ह्या स्त्रीला चमत्कारिकपणे गर्भ राहिला. आमच्या डब्ल्यू ३ परिषदे मध्ये तिच्या मैत्रिणीने ती साक्ष सुद्धा दिली. तुम्ही पाहा, हे ते देवाचे वचन होते ज्याने तिची परिस्थिती बदलली. देवाच्या वचनाच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका.
माझ्या मुला (मुली), माझ्या वचनाकडे लक्ष लाव; माझ्या सांगण्याकडे कान दे.
ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको;
ती आपल्या अंत:करणात ठेव.
कारण ती ज्यांस लाभतात, त्यांस ती जीवन देतात
आणि त्याच्या संबंध देहाला आरोग्य देतात. (नीतिसूत्रे ४:२०-२२)
प्रार्थना
पित्या, मला क्षमा करा जर मी तुझ्या वचनाकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केले आहे. मला कृपा पुरीव की तुझे अनमोल वचन दररोज वाचावे व त्यावर मनन करावे. वास्तवात तुझे वचन माझ्यासाठी जीवन व आरोग्य असे आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या अंत:करणाचे रक्षण कसे करावे● महाकाय लोकांचे वंशज
● तुमची प्रमाणता उंचवा
● तुमच्या भविष्यासाठी देवाची कृपा आणि उद्देश स्वीकारणे
● शोधण्याची आणि सापडण्याची कथा
● येशूचे रक्त लावणे
● तुमचा कमकुवतपणा परमेश्वराला दया
टिप्पण्या