डेली मन्ना
टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – २
Monday, 25th of March 2024
25
15
919
Categories :
बदल
आपल्या जीवनात टिकणारे बदल कसे आणावे, याविषयी आपण शिकत आहोत.
२. परमेश्वरावर(आणि त्याच्या वचनावर)तुमचे लक्ष केंद्रित करा. तुम्ही आतून बाहेरून बदलून जाल.
जर तुम्हाला खरेच तुमच्या जीवनात टिकणारे बदल हवे असतील, तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल, तुमचे ध्यान परमेश्वर व त्याच्या वचनावर लावावे लागेल. तुमच्या जगण्याचे प्रमाण उंचाविण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांचे प्रमाण उंचवावे लागेल.
सत्य हे आहेकी अनेक लोकांना त्यांच्या जीवनात खोलवर काय बरोबर नाही हे ठाऊक आहे. तथापि, ज्याप्रमाणे ते विचार करतात त्यानुसारज्यागोष्टी ते नेहमीच करतात त्याच करण्यात त्यांचा शेवट होतो. ते त्यांच्या विचारानुसार त्यांच्याकार्यास योग्य ठरवितात. वर्षे निघून जातात आणि मग फार उशीर झालेला असतो.
टिकणारे बदल आणण्यासाठी,ख्रिस्ताच्या जीवनानुसार तुमच्या जीवन-पद्धती किंवा आदर्श तुम्हांलाअनुसरावा लागेल, जो आपले आदर्श उदाहरण आहे.तुम्हाला जुन्या गोष्टीला, कमकुवत विचार पद्धतीला,नवीन सिद्धांतानुसार बदलावे लागेलजे वचनात आहे-पवित्र शास्त्र.
चला मला तुम्हाला एक उदाहरण देऊ दया. एके दिवशी, मी वचन वाचीत होतो, मी हे वचन पाहिले,
"तोतुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करितो; म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते." (स्तोत्र १०३:५)
ह्या वचनाने मला हे सांगतम्हटले, की जर मला चांगल्या आरोग्याचा आनंद घ्यायचा आहे, तर जे अन्न माझ्या तोंडातून जात आहे त्याची मला योग्य काळजी घेण्याची गरज आहे. त्याचदिवसापासूनच, मी माझ्या खाण्याच्या सवयी मध्ये तीन लहान बदल केले.
- कोणतेही कार्बनयुक्त द्रव पिणार नाही.
- आयस्क्रीम खाणार नाही.
- मी प्रयत्न करेन व सर्व वेळेला साखर टाळेन.
अनेकांना वरील गोष्टी फारच सामान्य वाटत असतील (आणि काहींना भीतीदायक वाटत असतील), परंतु वास्तविकता ही, त्याने व्यक्तिगतरित्या मजवरमोठा फरक केला. हे केवळ एक उदाहरण होते जे मी तुम्हाला सांगितले की तुम्हाला साहाय्य करावे की टिकणाऱ्या बदलाकडे तुमचा प्रवास सुरु करावा.
तुम्ही जसे तुमच्या शरीरास प्रशिक्षण दयावे, प्रार्थनावगैरे अशा क्षेत्रामधील विचाराच्या प्रमाणात वाढ करू शकता. तुमच्या जीवनाची छाप व प्रभाव हे तुमच्या विचारांच्या प्रमाणाचे प्रदर्शन आहे. कोणीही त्यांच्या विचारांचे प्रमाण उंचावू शकता याची पर्वा न करता की त्यांच्या बैंक मध्ये किती पैसे आहेत. हे पैशा विषयी नाही तर ते वैचारिकस्थितीविषयी आहे.
खरा बदल हा नेहमीच आतून बाहेर आहे. काहीतरी आतून बदलावे लागते, आणि केवळ मग तो बदल सर्वाना बाहेर दिसून येईल.
सर्व काही-म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्व काही-त्या जुन्या मार्गाच्या जीवनाशी जुळलेले आहे. ते सडलेले आहे आणि पूर्णपणे संपलेले आहे. त्याच्यापासून मुक्त व्हा! आणि मग पूर्णपणे नवीन मार्ग घ्यावा-देवाने-घडविलेले जीवन, आतून बदल झालेले एक नवीन जीवन आणि तुमच्या आचरणात स्वतः कार्य करीत आहे जेव्हा परमेश्वर अचूकपणे त्याचे चरित्र तुमच्यामध्ये निर्माण करीत आहे. (इफिस ४:२२-२४)
जेव्हा आपण नवीन वस्त्र विकत घेत असतो, आपण नवीन वस्त्र परिधान करण्याअगोदर, आपल्याला आपली जुनी वस्त्रे काढून टाकावी लागतात. आपण जुन्या वरच नवीन वस्त्रे केवळ घालू शकत नाही. हे तसे केवळ होत नाही. त्याप्रमाणेच, टिकणारा बदल आणण्यासाठी, आपल्याला कदाचित आपल्या विचारांचे प्रमाण बदलावे लागेल की त्याच्या वचनाशी साम्य करावे. याचा अर्थ हा की नकारात्मक विचारांना वजुन्या मार्गाने विचार करण्यास सोडून दयावे.
हे कदाचित काहींना अधिक काम असे दिसत असेन. तथापि, त्या परिणामाचा विचार करा जे तुमच्या जीवनाचा तुमच्या भोवतालच्या लोकांवर असेल. इतिहास महान लोकांच्या उदाहरणास कालक्रमाने दाखविते ज्यांनी त्यांच्या जगण्याचे प्रमाण त्यांच्या विचारांचे प्रमाण उंचाविण्याद्वारे वाढविले होते.
काही महिन्याच्या वेळेत तसेच तुमच्या विषयी सुद्धा म्हटले जाऊ शकते.
४० दिवसांची बायबल वाचन योजना
मार्क १२-१६; लूक १
प्रार्थना
पित्या, मी प्रार्थना करतो कीमी माझ्या आंतरिक मनुष्यत्वात सामर्थ्याने तुझ्या आत्म्याद्वारे कदाचित समर्थ केला जावो. मी प्रार्थना करतो की विश्वासाद्वारे ख्रिस्त माझ्या अंत:करणात निवास करो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● धार्मिकतेच्या आत्म्याला ओळखावे● अगापेप्रीति मध्ये वाढणे
● दिवस ०८:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुमची प्रमाणता उंचवा
● युद्धासाठी प्रशिक्षण - २
● दिवस ०८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● विचार करण्यास वेळ घ्या
टिप्पण्या