अनेक मते आहेत की मंडळीचे आध्यात्मिक वातावरण हे केवळ सेवकाच्या खांद्यावरच अवलंबून असते.
प्रभु येशूने त्याच्या सेवाकार्यादरम्यान अनेक विलक्षण व असामान्य चमत्कार केले. तथापि, जेव्हा तो नासरेथ येथे पुन्हा आला, त्याच्या स्वतःच्या गावी, तो तेथे अनेक महान चमत्कार करू शकला नाही. कल्पना करा, प्रभु येशू स्वतः, देवाचा पुत्र, तेथे महान परिणाम निर्माण करू शकला नाही. हे त्याच्या सेवाकार्यात अभिषेकच्या अभावाच्या कारणामुळे नव्हते, परंतु तेथे असणाऱ्या अविश्वासाच्या वातावरणाच्या कारणामुळे असे झाले. "तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत." (मत्तय १३:५८)
जर आपल्याला आपल्या मंडळी मध्ये आध्यात्मिक वातावरण सुधारावयाचे आहे, आपण पुढाऱ्यांसह एक संघ म्हणून समन्वयात वेळोवेळी मध्यस्थी मध्ये भाग घेत कार्य केले पाहिजे. हे मग आपला विश्वास प्रचारकाच्या विश्वासाबरोबर जुळेल की येशूच्या नांवाची महती वर्णावी व विश्वासाचे वातावरण बनवावे जेथे पवित्र आत्मा सामर्थ्याने कार्य करतो.
जर आपल्याला आपल्या घरामध्ये आध्यात्मिक वातावरण सुधारावयाचे आहे तर मग आपण एक कुटुंब असे नियमितपणे एकत्र परिश्रम घेऊन प्रार्थना करणारे झाले पाहिजे.
येथे विचार करण्याचे आणखी एक क्षेत्र आहे. जेव्हाकेव्हा आपल्याला कोणते विमान किंवा कोणत्या रेल्वेने प्रवास करावयाचा असतो, आपण नेहमी याची खात्री करतो की आपण वेळेच्या आत मध्ये तेथे आहोत. तथापि, जेव्हा चर्च चा विषय येतो, अनेक जण यांस केवळ एक औपचारिक कार्य असे समजतात व उपासनेला उशिरा येतात.
उपासनेमध्ये भाग घेऊन, आपण ते वातावरण निर्माण करण्यास साहाय्य करतो जे पवित्र आत्म्याच्या भरपुरीने पूर्ण मग्न झालेले आहे. हे अशा वातावरणात लोकांची अंत:करणे ही देवाच्या अंत:करणाकडे पुन्हा एकदा वळतात. हे ते उपासनेचे वातावरण आहे जेथे लोक त्यांच्या पहिल्या प्रीतीकडे-प्रभु येशू कडे पुन्हा वळतात. कोणत्याही कारणासाठी उपासना गमावू नका.
मला तुम्हांला एक गहन समज सांगावयाची आहे.
व्यक्ति जेव्हा सांघिक उपासनेचा हिस्सा होऊ लागतो, असा व्यक्ति त्याच्या किंवा तिच्याबरोबर उपासनेचे वातावरण घेऊन चालतो जरी उपासना संपून खूप वेळ होऊन गेला आहे. असे व्यक्ति उपासना संपल्यावर सुद्धा त्याठिकाणावर छाप व प्रभाव टाकण्यास सुरु करतात ज्याठिकाणी ते भेट देतात.
देवदूत परमेश्वराची दिवसरात्र उपासना करीत आहे. जेव्हा अशा देवदूताने बेथसैदा येथील पाण्याला हलविले, स्वर्गातील वातावरणाने बेथसैदाच्या पाण्याला स्पर्श केला. जो कोणी प्रथम त्या पाण्यात उतरला तो बरा झाला व त्याची सुटका झाली.
मी आदेश व घोषणा देत आहे, जेथेकोठे तुम्ही जाल, तुम्ही तुमच्यासोबत उपासना व मध्यस्थीच्या वातावरणास घेऊन जाल जे अद्भुत नवीन वाटचाल आणेल. हे वचन प्राप्त करा.
टीप: जर दररोजची भाकर ही तुम्हाला आशीर्वाद अशी झाली असेन, तर तुमच्या कुटुंबाचे सदस्य व मित्रांना नोहा ऐप ला जुडण्यास प्रोत्साहन दया. ही दररोज ची भाकर त्यांना दया.
अंगीकार
मी घोषणा करतो की परमेश्वराचा आत्मा मजवर व माझ्यामध्ये आहे. मी त्याच्या उपस्थितीला घेऊन जाणारा वाहक आहे. जेथेकोठे मी जातो, परमेश्वर मजसोबत जातो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● जगण्याचे चिन्ह (पद्धत)● दिवस ०८:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दिवस ०२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● मृतामधून प्रथम जन्मलेला
● चांगले युद्ध लढ
● शर्यत जिंकण्यासाठी दोन पी
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
टिप्पण्या