“मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो आहे, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.” (प्रकटीकरण ३:२१)
प्रकटीकरण ३:२१ मध्ये, जे विजय मिळवतात त्यांच्यासाठी प्रभू येशू एक आश्चर्यकारक आश्वासन देतो : “मी त्याला आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन.” ख्रिस्ताच्या विजयाने विश्वासणाऱ्यांना अविश्वसनीय विशेषाधिकार आणि अधिकार जो दिला आहे त्याबद्दल हे आश्वासन बोलते. ख्रिस्ताबरोबर बसणे म्हणजे काय याचा आपण उलगडा करू या.
ख्रिस्ताबरोबर त्याच्या राजासनावर बसलेले आहोत ही कल्पना त्याच्याबरोबरच्या आपल्या स्थानाचे एक शक्तिशाली चित्र आहे. इफिस. २:५-६ मध्ये, प्रेषित पौल लिहितो, “ ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले, आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसवले” ही वचने हे स्पष्ट करतात की ख्रिस्ताबरोबर बसणे ही केवळ भविष्यातील आशा नाही, परंतु वर्तमान सत्यता आहे.
जेव्हा प्रभू येशूने त्याच्या पुनरुत्थानाद्वारे पाप आणि मृत्यूवर विजय मिळवला, तेव्हा त्याने आपल्या विजयाची खात्री देखील दिली. आता आपण ख्रिस्ताबरोबर सहवारीस आहोत, त्याच्या विजयात सहभागी आहोत (रोम. ८:१७). राजासनावर त्याच्याबरोबर बसलेले असणे आध्यात्मिक क्षेत्रात आपला अधिकार आणि वर्चस्वाला सूचित करते. याचा अर्थ आपल्याला शक्ती आहे की परीक्षेवर विजय मिळवावा, शत्रूच्या योजनांचा प्रतिकार करावा, आणि ख्रिस्ताने आधीच जो विजय आपल्याला दिला आहे त्यामध्ये आयुष्य व्यतीत करावे.
तथापि ख्रिस्ताबरोबर बसलेले असण्याचे हे स्थान हे काहीतरी नाही जे आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवलेले आहे. ते कृपेचे दान आहे, येशू वरील विश्वासाने ते शक्य केले आहे. आपण त्याच्याबरोबर बसलेले आहोत, आपल्या स्वतःच्या योग्यतेमुळे नाही, तर वधस्तंभावरील त्याच्या पूर्ण केलेल्या कामामुळे. जेव्हा आपण ख्रिस्ताबरोबर राहतो, आणि त्याच्या जीवनाला आपल्यातून प्रवाहित होऊ देतो, तेव्हा त्याच्याबरोबर राज्य करण्याच्या सत्यतेचा आपण अनुभव करू शकतो.
तुम्ही ख्रिस्ताबरोबर त्याच्या राजासनावर बसलेले आहात या अविश्वसनीय सत्यावर मनन करण्यासाठी वेळ द्या. ही सत्यता तुम्ही सामोरे जाणाऱ्या आव्हानांबद्दल तुमचा दृष्टीकोन कसा बदलते ? लक्षात ठेवा की कोणत्याही अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुमच्याजवळ ख्रिस्ताचा अधिकार आणि सामर्थ्य आहे. विजयाच्या स्थानावरून जगा, हे जाणून की स्वर्गीय क्षेत्रात तुम्ही त्याच्याबरोबर बसलेले आहात. आत्मविश्वास, शांती आणि उद्देशाने या सत्याला तुमच्या जीवनात भरू द्या.
प्रार्थना
प्रभू येशू, तुझ्या राजासनावर, तुझ्याबरोबर बसलेले असण्याच्या विशेषाधिकारासाठी तुझे आभार. तू मला दिलेला अधिकार आणि विजयात चालण्यासाठी या सत्याच्या खरेपणात जगण्यासाठी मला मदत कर. माझ्या जीवनाने तुझ्या राज्याला प्रतिबिंबित करावे आणि तुझ्या नावाला गौरव आणणारे व्हावे असे होऊ दे. येशूच्या नावाने आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तो तुमच्या जखमांना बरे करू शकतो● अशी संकटे का?
● काय तुम्ही एकाकीपणाचा संघर्ष करित आहात?
● परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया
● सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर भेट
● इतरांची सेवा करण्याद्वारे आशीर्वाद जो आम्ही अनुभवितो
● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
टिप्पण्या