डेली मन्ना
महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
Saturday, 11th of May 2024
20
15
634
Categories :
जीवनाचे धडे
मी एकदा प्रामाणिकपणे एका पूर्व भारतीय वृद्धास विचारले की त्याचे घोडे कोणी मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर आनंदाने फेरी मारण्यास नेले. "घोड्याच्या डोळ्याभोवती कापड का बांधले जाते?" त्यास घोड्यांचे चांगलेच ज्ञान होते आणि त्याने प्रत्युत्तर दिले, "घोडयांच्या डोळ्याभोवती बांधलेले कापड भूमीक्षेत्राचे संपूर्ण दृश्य घोड्यापासून कमी करते आणि हे मग घोड्याला रस्त्यावर लक्ष केंद्रित करू देते. डोळ्याभोवतीचे कापड घोड्याला तणावपूर्ण स्थितीत शांत ठेवते." दु:खद भाग हा की आपण मानव डोळ्याभोवती कापड बांधीत नाही.
आमचे डोळे आमच्या आतील इच्छेद्वारे निर्देशित केले जातात. आमचे डोळे हे इतके प्रभावी आहेत की आमच्या संपूर्ण जीवनाला मार्गदर्शन करण्यात त्यांचा भाग असतो. जेव्हा डोळे हे भटकू लागतात, विनाश हा त्यापाठोपाठ येत असतो.
डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल, ह्यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा! (मत्तय ६:२२-२३)
सुदृश डोळे हे देवाच्या सिद्धांताद्वारे कार्य करतात आणि ते जे शुद्ध व सत्य आहे त्यानुसार ते ज्वलंत राहतात. याउलट, कमकुवत डोळे हे इतर सर्व गोष्टींनी इतके भरलेले असतात जे जगाला दयायचे असते ज्यामुळे ते ख्रिस्ताला ना ही त्याच्या अद्भुत कार्याला पाहू शकत नाही.
दावीद फारच गरीब कुटुंबातून मोठा झाला परंतु त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात दैवी शिस्त पाळण्यात त्याने पुरेशी काळजी घेतली नाही. एका संध्याकाळी घराच्या छप्परावरून (राजवाड्याच्या छतावरून) त्याने एका स्त्रीला अंघोळ करताना पाहिले, आणि दिसण्यास ती स्त्री फार सुंदर होती. (२ शमुवेल ११:२)
वाक्प्रचार की "त्याने स्त्रीला पाहिले", यामध्ये ही कल्पना आहे की दाविदाने स्त्रीला पाहिले व तिच्याकडे फार वेळ निरखून पाहिले. ती फक्त एक झलक नव्हती परंतु त्याऐवजी भटकणारे दुसरे पाहणे होते. भटकणारे डोळे हे तुम्हाला चुकीचे विचार करावयास लावेल. ते तुम्हाला आतून दूषित करेल व मग अनावश्यक गोष्ट घडेल- दावीद पापामध्ये पडला.
जर तुमचे डोळे हे सुदृढ असतील व नंतर भटकले असतील, तर मग येथे हे आहे जे तुम्ही केले पाहिजे. प्रतिदिवशी, दररोज सकाळी जोपर्यंत वचन तुमच्या मनात भरून जात नाही असे वाचण्याद्वारे देवाचे नवीन दृष्टांत प्राप्त करा.
दुसरे, उपासने मध्ये वेळ घालवा. परमेश्वराची उपासना करणे हे तुमच्या आत्मिक मनुष्यास देवाच्या प्रीतीने भरून टाकले व जे मग जगाची प्रीति काढून टाकेल.
ईयोबास भटकणाऱ्या डोळ्यांचा धोका ठाऊक होता आणि त्याने बुद्धिमानपणे लिहिले, "मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?" (ईयोब ३१:१)
हा एक सरळ परंतु गंभीर निर्णय आहे जो परीक्षा येण्याअगोदर फार पूर्वी प्रत्यक्षात घेतला पाहिजे. तुमच्या डोळ्यांना विचारपूर्वक प्रशिक्षण दया की जे काहीही तुम्हाला अयोग्य दिसते त्यापासून लक्ष काढून घ्यावे. पहिले पाहणे हे पापमय नाही. हे ते भटकणारे व निरखून पाहणे जे तुम्हाला वाईट मार्गावर नेईल.
प्रार्थना
पित्या, माझे डोळे शुद्ध कर. मला मोहापासून राख व मला सामर्थ्य दे की दुसऱ्या वेळी पाहू नये. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडा● शत्रू गुप्त आहे
● वचनामध्ये ज्ञान
● बदलण्याची वेळ
● आतील खोली
● ते व्यवस्थित करा
● दानधर्म करण्याची कृपा - ३
टिप्पण्या