देवाच्या बहुगुणी स्वभावात प्रवेश करण्याची एक किल्ली व योग्य मार्ग हा विश्वासाच्या सामर्थ्याद्वारे आहे. आज अनेक ख्रिस्ती लोकांनी ह्या किल्ली ला अप्रभावी व अप्रत्यक्ष असे मानले आहे कारण त्यांनी नेहमीच चुकीने व योग्य समज शिवाय ते लागू केले आहे. विश्वास हीच केवळ एक योग्य किल्ली आपल्याला दिली आहे की देवाच्या राजासनाजवळ जावे, कार्यरत करावे व आपल्याला जे काही पाहिजे ते प्राप्त करावे. विश्वासावाचून देवाचा आशीर्वाद व मान्यता मिळविण्यास आपण सदैव निष्प्रभच राहणार आहोत. (इब्री ११:६)
जेव्हा एक ख्रिस्ती विश्वासामधील सामर्थ्यावर शंका घेतो, तो मग सैतानाच्या छळास उघडा होतो. जेव्हा सैतान सतत त्याचा छळ करतो, तो मग ख्रिस्ता मधील त्याच्या वारसा ला विसरतो. विश्वासणारे म्हणून, विश्वास ही आपली किल्ली आहे की देवाच्या सर्व गोष्टीत व त्याच्या आश्वासनात प्रवेश मिळवावा. परंतु हे कसे कार्य करते हे आपण प्रथम समजले पाहिजे. कल्पना करा तुमच्या देशात चालणारे चलन घेऊन तुम्ही दुसऱ्या देशात प्रवास करीत आहात, तुम्ही काही व्यवहार करू शकाल काय? नाही! तुम्हाला प्रथम त्या चलनास त्या नवीन देशाच्या चलना मध्ये बदल करण्याची गरज लागेल. विश्वास हे स्वर्गाचे चलन आहे. जर तुम्हाला आध्यात्मिक व्यवहार करावयाचे आहे, तर तुम्हाला विश्वासाने कार्य करावे लागेल.
जसे एखाद्या अनोळखी देशात चलन शिवाय तुम्ही हतबल होता, जर तुम्हाला विश्वासाचा अभाव असेल, तर तुम्ही हतबल व संभ्रमात राहाल. देवाची लेकरे म्हणून, विश्वासाद्वारे आपल्याला जे सर्व काही पाहिजे ते आपण प्राप्त करू शकतो (ते म्हणजे देवाच्या इच्छेशी सलग्न राहिल्याने). जसे तारण हे विश्वासाद्वारे प्राप्त केले जाते, त्याप्रमाणे आपण सर्व काही प्राप्त करतो. विश्वासाचे सामर्थ्य तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकारा केल्या क्षणी संपत नाही. तर मग ह्या विश्वासाद्वारे कार्य करण्यास तुम्हाला इतके अवघड का होते? पुढील वचनात बायबल आपल्याला एक विश्वासू असे जगण्यास एक सामर्थ्यशाली किल्ली देते, "नीतिमान विश्वासाने जगेल" (रोम १:१७)
तुम्ही आरोग्य मिळविण्याचा शोध घेत आहात काय? ती नोकरी बढती मिळण्याची तुम्ही अपेक्षा करीत आहात काय? तुमच्या कुटुंबात तुम्हाला परिवर्तन हवे आहे काय? कुटुंबाच्या एखादया सदस्या बद्दल तुम्ही काळजी करीत आहात काय? बायबल कडे तुमच्या समस्यांसाठी उपाय आहे, उत्तम भाग हा, हा उपाय सर्व परिस्थिती मध्ये कार्य करतो. हा विश्वास आहे! आणि हा प्रार्थने द्वारे उत्तमरित्या लागू केला जातो. "म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल." (मार्क ११:२४)
प्रार्थना हे माध्यम आहे ज्याद्वारे सामर्थ्य हे कार्यान्वित व व्यक्त केले जाऊ शकते. "....कारण देवाजवळ जाणाऱ्याने विश्वास ठेवला पाहिजे ...." आपण देवाजवळ केवळ प्रार्थने द्वारेच येऊ शकतो जे आपल्या विश्वासाद्वारे प्रेरित असले पाहिजे की उत्तरे निर्माण करावी. आज त्या खात्रीने सुरुवात करा की तुम्ही ते सर्व प्राप्त करू शकता जे तुम्ही प्रार्थनेत मागता आणि पाहा गोष्टी चांगल्यासाठी घडतात. विश्वास कार्य करतो!
प्रार्थना
पित्या, विश्वासाच्या मौल्यवान दाना साठी मी तुझा कृतज्ञ आहे. तुझ्या आश्वासनांमध्ये नेहमीच विश्वास ठेवण्यास मला शिकीव व माझ्या जीवनाच्या सर्व भागात ह्या विश्वासाला लागू करण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शरण जाण्याचे ठिकाण● पृथ्वीचे मीठ
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1
● कृपेवर कृपा
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● एक गोष्ट: ख्रिस्तामध्ये खरा खजिना शोधणे
● गहनता शोधणे, केवळ प्रदर्शन नाही
टिप्पण्या