"मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले." (गलती २:२०)
प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनात नवीन जन्म होण्याच्या वेळी काय घडते ते आपले पूर्वीचा पापमय स्वभावाचे (मृत्यू) ख्रिस्ताच्या स्वभावात (जीवन) बदल होणे आहे. नवीन जन्म जो आपण प्राप्त केला ख्रिस्ताच्या उद्धाराच्या दरम्यान हे विश्वासाचे जीवन आहे. एक जीवन जेथे आपणास आपल्या भूतकाळातील चुकांद्वारे किंवा आपला पूर्वीचा स्वामी, सैतान याच्या प्रभावाखाली व्याखीत केले जात नाही. आपण नवीन सृष्टि होतो, पवित्र केलेले व न्यायोचित केलेले होतो. आपल्या जुन्या स्वभावाला मृत, व ख्रिस्ता मध्ये जीवित. (२ करिंथ ५:१७)
भरंवसा हा विश्वास बरोबर बदलता येतो, त्यास नियमाची रचना, तत्वज्ञान, मूल्य, सत्य व मनाचा विचार असे व्याखीत केले जाऊ शकते जे व्यक्तीला किंवा लोकांच्या गटाला त्यांचे आचरण, विचारांच्या देवाण-घेवाणीत व निर्णय करण्यात मार्गदर्शन करते. हे नियम जे व्यक्तिगत जीवनास मार्गदर्शन करते आणि त्यास मनुष्याच्या जीवनशैलीचे व्याखीत करणारे घटक असे म्हटले जाऊ शकते. जेव्हा लोक त्यांची जीवनशैली बदलतात आपण म्हणू शकतो की त्यांचे विश्वास हे दुरुस्त केले किंवा बदलले गेले आहेत.
विश्वासणारे म्हणून, आपल्याला विश्वासाचे जीवन जगण्यास बोलाविले गेले आहे. एक जीवन जेथे आपल्या इच्छा, महत्वाकांक्षा, ध्येये व ध्यानकेंद्रित राहणे हे सर्व आपला स्वामी, येशू ख्रिस्ता द्वारे निश्चित केले जाते. आतापासून आपल्याकडे वाव नाही की आपल्या स्वतःसाठी विचार करावा किंवा आपल्या व्यवहार साठी स्वतःहून निर्णय घ्यावेत कारण आपण आता आपला स्वामी प्रभु येशू ख्रिस्ता द्वारे चालविले जातो.
ख्रिस्ताच्या जीवनाच्या आपल्या स्वीकाराने आपणास देवाच्या राज्याचे मार्गदर्शन व नियमाच्या पूर्ण अधीनतेच्या ठिकाणी आणले आहे . ख्रिस्ती धर्माला केवळ एक धर्मा पेक्षा अधिक पण एक जीवनशैली असे व्याखीत केले गेले आहे कारण ते केवळ धर्म कृत्यांच्याही पलीकडे जाते, व त्यास जिवंत लागू करणे आवश्यक असते. (२ पेत्र १:३)
ख्रिस्ती म्हणून जो विश्वास आपण आचरणात आणतो हे केवळ एक धर्म नाही परंतु एक जीवनशैली आहे जे आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाने चिन्हित होते. मग ते सामाजिकदृष्ट्या, नैतिकदृष्टया, आर्थिकदृष्टया, बौद्धिकदृष्टया मानसिकदृष्टया वगैरे काहीही असो. ख्रिस्ती धर्म हा ख्रिस्ताच्या जीवनावर आधारित पद्धत आहे. येशूचे शिष्य हे एक ख्रिस्ती म्हणजे काय किंवा कोण असले पाहिजे त्याचे प्रथम जीवित उदाहरण होते (प्रेषित ११:२६ब). ते समजले की जीवन ते त्यांनी प्राप्त केले आहे ते विश्वासाचे जीवन होते आणि ते असे व्यक्त केले पाहिजे कारण तो एक स्वभाव झाला होता. अंत्युखीयाच्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिले आणि त्यांना ख्रिस्ती म्हटले, याचा अर्थ 'लहान ख्रिस्त".
तुम्ही एक ख्रिस्ती व्यक्ति किती वर्षांपासून आहात? तुमच्या जीवनाचे ते कोणते भाग आहेत जेथे तुम्ही ह्या नवीन जन्मास व्यक्त करण्यास परवानगी दिली आहे? प्रेषित ६:४ मध्ये, प्रेषितांनी ह्या जीवनाच्या गरजा स्पष्ट केल्या आहेत. "पण आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू." तुम्ही वचन व प्रार्थनेचे व्यक्ति आहात काय? तुम्ही विश्वासाचे जीवन जगत आहात काय?
प्रार्थना
परमेश्वरा तुझा धन्यवाद होवो, माझ्या जीवनाच्या तारणासाठी. विश्वासाचे जीवन, तुझ्यासाठी पात्र व तुझ्या वचनाचे पूर्ण पालन करणारा असे जगण्यास मला साहाय्य कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● कोठवर?
● त्याच्या सामर्थ्याचा उद्देश
● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
● समाधानाची शास्वती दिली गेली आहे
टिप्पण्या