"कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली." (योहान १:१७)
सर्वेक्षणानुसार, आजच्या जगात, अनेक धर्मांची वाढ होत आहे. अनेक हे मार्ग शोधण्याचा निरंतर प्रयत्न करीत आहे की देवाकडे पोहोचावे आणि ते अजूनही शोधत आहेत.
येथे मनुष्यामध्ये जन्मतःच स्वाभाविक इच्छा असते की देवाचा शाध घ्यावा व अत्युच्च सत्वाचा संदर्भ घ्यावा. याकारणामुळेच जेव्हा संशोधक गहन जंगलात जातात; ते तेथे उपासनेच्या काही वस्तू पाहतात. आज प्रत्येक धर्म एका अज्ञात देवाकडे मार्ग स्पष्ट करीत, नियम व आदेश स्पष्ट करीत असतो. जितके अधिक ते प्रयत्न करतात की सर्व आज्ञा पाळाव्या, तितकेच अधिक ते अपयशी होतात, देवाला प्रसन्न करण्याच्या प्रयत्नाच्या चक्रात निरंतर चालत राहतात ज्यास ते कधीही ओळखणार नाहीत.
जुन्या करारात, इस्राएली लोकांनी परमेश्वराचे मार्ग समजले नाहीत. त्यांना केवळ त्याचे कार्य व आज्ञा ठाऊक होत्या, ते त्या ठिकाणी कधीही आले नाहीत जेथे ते ह्या दैवी सत्वाला ओळखतील जो निरंतर सिद्ध असा दिसतो व अत्यंत पवित्र प्रमाण की ज्याद्वारे जगावे. (स्तोत्र १०३:७)
जुन्या करारातील निवासमंडपाच्या रचनेने पवित्र जीवन जगण्याच्या मनुष्याच्या अशक्यतेला उघड केले, नियमशास्त्रानुसार जगण्यात कायमचे अपूर्ण, अपुरे होते. एकच गोष्ट जिने त्यांना देवाच्या घनिष्ठतेत आणले असते, जिने त्यांना त्याच्यापासून अत्यंत दूर नेत त्याकडे जाणे अशक्य असे केले. नियमशास्त्र सतत लोकांना त्यांचा कमकुवतपणा व अयोग्यता दाखवीत होता की देवाच्या प्रमाणाइतके कधीही योग्य ठरले जाऊ शकत नाही. बायबल नियमशास्त्राला शाळेचे शिक्षक असे म्हणतो. (गलती ३:२५)
प्रभु येशूच्या येण्याने देवाच्या व्यक्तित्वाच्या समजे कडे एक बदल आणला. येशूने त्याच्याबरोबर विश्वास व कृपा आणली. विश्वास हे साधन आहे की देवाबरोबर संबंध जोडावे व कृपा हे ते व्यासपीठ आहे जेथे ते साधन वापरावे. विश्वासाने देवाच्या व्यक्तित्वाविषयी समज आणली, नियमशास्त्राप्रमाणे नाही, ज्याने अनेक गोष्टी अज्ञात अशाच ठेवल्या, देवाच्या शिकवणीस जीवन व शांति शिवाय केले. गलती ३:२३ आपल्याला सांगते की, "हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले होते."
प्रभु येशू समेट व न्यायीकरण साठी व्यासपीठ पुरवितो जेथे आपण कोणाही मध्यस्था शिवाय देवाकडे निडरपणे जाऊ शकतो. जे केवळ येशू द्वारेच सर्व मनुष्यांचे तारण होऊ शकते व त्यांस सिद्ध केले जाऊ शकते.
म्हणून विश्वासाद्वारे आपण ह्या शक्तीला प्राप्त करू शकतो आणि कृपे द्वारे आपण त्याच्या व्यक्तित्वाला: त्याच्या मार्गांना अधिक जाणू शकतो.
प्रार्थना
मनुष्यजाती साठी कृपा जी तूं आणली त्यासाठी प्रभु येशू तुझे आभार. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग● आत्मसमर्पणात स्वातंत्र्य
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
● दिवस १० :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● प्रीति-जिंकण्याची योजना -२
● भविष्यात्मक वचन प्राप्त केल्यानंतर काय करावे?
● देवाला प्रथम स्थान देणे # 1
टिप्पण्या