"त्याच्यावर तुम्ही 'आपली' सर्व 'चिंता टाका' कारण तो तुमची काळजी घेतो. (१ पेत्र ५:७)
पवित्र शास्त्र हे सांगत नाही की, तुम्ही चिंते मधून जाणार नाही. ते म्हणते, जेव्हा तुम्ही चिंते मधून जाता, तेव्हा त्यास देवावर टाका.
येथे काही गोष्टी आहेत ज्या नेहमीच हाताबाहेर असतात परंतु देवाच्या हातात असतात. माझ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शुभवर्तमान यात्रे दरम्यान, प्रामाणिकपणे म्हटल्यास मी फारच उत्साहित होतो. जोडपे जे माझ्या प्रवासाला आर्थिक साहाय्य देत होते त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितले की व्हिसा अर्ज हा अडचणीत आला आहे. त्यांनी मला ह्याबाबतीत प्रार्थना करण्यास सांगितले. संपूर्ण गोष्टीविषयी चिंता ह्या माझ्या मनात फार त्वरित घडत चालल्या होत्या. मी त्या विषयाबाबत प्रार्थना करू लागलो. जवळजवळ २ तासानंतर, अचानक मी पवित्र आत्म्याची हळुवार वाणी ऐकली हे म्हणत, "पुत्रा, मी त्याची काळजी केली आहे." सर्व चिंता मजमधून निघून गेल्या व त्याची शांती जी सर्व समजेपलीकडे आहे त्याने मजवर ताबा घेतला.
"ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्यास तूं पूर्ण शांति देतोस, कारण त्याचा भाव तुजवर असतो" (यशया २६:३).
जीवनाच्या समस्या ह्या आपल्याकडून अधिक मागणी करीत असतील- शारीरिकदृष्टया, भावनात्मकदृष्टया व आध्यात्मिकदृष्टया. तरीही, जेव्हा आपण विषयांना प्रार्थने मध्ये परमेश्वराकडे नेण्यास शिकतो, व संपूर्ण दिवसभर त्याजवर लक्ष केंद्रित करून राहतो हा भरंवसा ठेवून की तो काळजी घेईल, आपण विश्रांती प्राप्त करू. मला एक गीत आठवते: "स्वतःला मजमध्ये मोकळे करा आणि तुम्ही स्वतःला प्राप्त कराल....(संपूर्ण दिवसभर गात राहा).
४० दिवसांची बायबल वाचन योजना
रोमकरांस १-७
प्रार्थना
पित्या, ह्याविषयाबाबत मजमधून सर्व चिंता दूर कर. असे होवो की तुझे वचन मला हर्ष आणो. तुझ्या शांतीने मला घेरून राहा. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे● अगापेप्रीति मध्ये कसे वाढावे
● कृपेचे दान
● दबोरा च्या जीवनाकडून शिकवण
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
● दिवस २१:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● आई-वडिलांचा मान राखणे (दिवस ८)
टिप्पण्या